भरपूर लोकांना दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करायला आवडते. पण कॉफीमुळे रिलॅक्स वाटते आणि तणाव कमी होतो. मात्र कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीचे अतिसेवन केल्याने किंवा रिकाम्या पोटी कॉफी पिण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये भरपूर कॅफेन असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यामुळे एखाद्या व्यक्तीला हाय स्ट्रेस होऊ शकतो. तसेच मूड स्विंग्सही निर्माण होऊ शकतात. कॉफीचा शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि कोणत्या वेळी कॉफी पिणे योग्य ठरते ते जाणून घेऊया. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो. सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. कॉफी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला होता तो मोर्चा संपताच उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलतांना महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोनश़ॉटलायकदेखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा असफल मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते. परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला आता सुरुवात झाली असून आज पहिल्यांदा लाल, भगवं, हिरवं, निळं तुफान धडकलं आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला सुरुवात झाली आहे. भायखळा येथून हा मोर्चा निघाला आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे या मोर्चात सामील झाले असून पायी चालत आझाद मैदानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही पायी चालत निघाले आहेत. या मोर्चात हजारो लोक एकवटले असून बघावं तिकडं लोकच लोक दिसत आहेत.…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बहाळ येथील व्यावसायिक संदीप रामभाऊ पाटील (वय ३४) यांचे सात दिवसापूर्वी अपघातात निधन झाले. पतीच्या निधनाचा विरह व दु:ख, वियोग पत्नीला सहन न झाल्याने तीने पतीच्या पाठोपाठ सातव्या दिवशीच आज दि.१६ रोजी सकाळी ५:३० वाजता विषारी किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी व मन सुन्न होणारी घटना घडली. बहाळ ता.चाळीसगाव येथील रहिवासी असलेले संदीप रामभाऊ पाटील यांचे दि.१० रोजी सुरत येथे लिंबू घेऊन जात असतांना रात्री १०:४५च्या सुमारास खडकी फाटया जवळ त्यांच्या मालकीच्या माल वाहतूक गाडीला भीषण अपघात होऊन झाला. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. यात…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातून दोन अल्पवयीन मुलीना वेगवेगळ्या ठिकाणाहून पळवून नेण्यात आले असून दोन तरुणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी शहरातील पारोळा रस्त्यावरील साई गजानन नगर मध्ये आपल्या मावशीकडे १२ वी चा फॉर्म भरण्यासाठी आली होती. १० रोजी संध्याकाळी ५ वाजता मुलीने आपल्या मावशीला कपडे शिवून येते असे सांगून घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून अली नाही. मुलीच्या पुणे येथील चाळी मागे असिफ तडवी हा तिला भेटायला दोन तीन वेळा आला असल्याने त्यानेच आमिष दाखवून पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिल्याने अमळनेर पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बहादरपूर नाका…
ढालसिंगी येथील घटना ;पहूर पोलिसात गुन्हा दाखल जामनेर : प्रतिनिधी वीटभट्टीवर काम करणाऱ्या पती-पत्नीच्या भांडण सोडविताना वीट भट्टी मालकाने मजुराचा खून केल्याची खळबळ जनक घटना ढालशिंगी ( ता . जामनेर ) येथे घडली .याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात वीट भट्टी मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे . लहानु चांदखा तडवी ( वय २५ ) हा तरुण त्याची पत्नी व मुलाबाळांसह तोंडापूर ते ढालसिंगी जवळील हर्षल पवार यांच्या वीट भट्टीवर काम कुटुंबासह करत होता. १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास लहानु तडवी मरून पडलेल्या अवस्थेत होता. फिर्यादी शाहरुख रशीद तडवी त्याच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हाची नोंद केली आहे. मृतदेह लिंबाच्या झाडाजवळ…
चाळीसगाव : राजेद्र पाटील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील एका ४५ इसमाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिसांनी धाव घेत पुढील चौकशी सुरु झालेली आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मेहूणबारे येथे दुपारी १ वाजेच्या सुमारास गिरणा विद्यालयाजवळ दगडू वामन गढरी यांच्यावर अनोळखी इसमाने गळ्यावर लोखंडी कोयत्याने वार करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी त्यांचावर मारेकऱ्याने वार करीत फरार झालेला असल्याची प्राथमिक माहिती आहे तर शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु होते.
जळगाव : विजय पाटील मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारल्यानंतर तृतीयपंथींना राज्यातील पोलिस भरती प्रक्रियेत अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला होता. आता पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यात येणार आहे. तर यंदाच्या पोलीस भरतीत आता तृतीयपंथी देखील अर्ज भरू लागले आहे. तर जळगाव जिल्ह्यातून एका तृतीयपंथीने पोलीस भरतीचा अर्ज भरला आहे. जिल्ह्यातील भूसावळ येथील बेबो दीदी(किन्नर) यांनी नुकतेच धुळे येथे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अर्ज केला असल्याची माहिती दिली आहे. तर त्यांचे शिक्षण राजकुवर महाविद्यालय फर्दापूर येथे कॉमर्सच्या तिसऱ्या वर्षाला आहे. ते पोलीस भरतीचा सराव नियमित भुसावळ येथील रेल्वे ग्राउंडवर करीत आहेत. तर त्यांना या सरावासाठी त्यांना इरफान शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.…
‘तुमची मुलगी काय करते या टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेला’ ‘इन्स्पेक्टर विजय भोसले’ म्हणजे अभिनेता हरिष दुधाडे. त्यांची ‘पावनखिंड’ या चित्रपटातील ‘बहिर्जी नाईक’ ही भूमिका विशेष गाजली. सध्या तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे त्याच्या आगामी प्रॉजेक्ट बाबत प्रेक्षकांना उत्सुकता असतानाच त्याने एक आनंदाची बातमी दिली आहे. हरीश दुधाडे याने त्याच्या आयुष्याची नवी इनिंग सुरु केली असून तो लग्नबंधनात अडकला आहे. https://www.instagram.com/p/CmJPLAetQMs/?utm_source=ig_web_copy_link हरीश दुधाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. आज त्याने आपल्या बायकोसोबत फोटो शेयर केला आहे. समृद्धी निकम असे त्याच्या बायकोचे नाव आहे. यावेळी हरीश आणि त्याची बायको अत्यंत पारंपरिक पोषाखात दिसत आहेत. या फोटोला त्याने “आणि नवीन प्रवासाला…
राज्यात सध्या थंडीचा पारा वाढत आहे. तर रात्री व पहाटेच्या सुमारास नागरिक जागोजागी शेकोटी करीत उब मिळवत आहे तर यामध्ये पुरुषापेक्षा नेहमी महिलांना जास्त थंडीचा सामना करावा लागत असतो, हे तुम्हीही पाहिले असेल. मात्र असे का होते, याचा विचार कधी केला आहे का ? सहसा महिलांना नेहमीच जास्त थंडी जाणवते आणि त्यांना शाल, स्वेटर किंवा जॅकेटची गरज असते. का वाजते जास्त थंडी ? याचं खरं उत्तर म्हणजे स्त्रियांचा मेटाबॉलिज्म रेट (चयापचय दर) कमी असतो. शरीरातील मेटाबॉलिज्ममुळे उर्जेचे उत्पादन होते, ज्यामध्ये उष्णतेचाही समावेश असतो. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे 98.6 डिग्री इतकेच असते, तरीही पुरूषांना जास्त उकडतं. खरंतर पुरूषांमध्ये मसल मास…

