मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी यांनी वेळोवेळी बेताल वक्तव्य करीत राज्यातील सामाजिक व्यवस्था बिघडविण्याचे काम करीत असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने मुंबईत मोठे आंदोलन उभे केले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनावर बंदी आहे का?, तसे असेल तर सरकारने ते जाहीर करावे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तर उद्याचा मोर्चाला परवानगी नाकारण्याची हिंमत कुणीही करणार नाही, कारण उद्याचा मोर्चा हा विरोधकांचा नसून महाराष्ट्र प्रेमींचा आहे, जर मोर्च्याला परवानगी नाकरली तर सरकार महाराष्ट्र द्रोही ठरेल असे राऊतांनी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील सावखेडा खु येथील ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध लोकनियुक्त सरपंच पदी श्रीमती ज्योती जितेंद्र पाटील यांची निवड झाली असल्या आज त्यांनी पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांची भेट घेतली. या वेळी उपस्थित विकास उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर, सोसायटी चेअरमन जितेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,ग्रामपंचायत सदस्य सदस्य अलकाबाई पाटील,विद्या पाटील, सरला पाटील, सुनीता सपकाळे, रेखा सपकाळे, राजेंद्र सपकाळे, राकेश कोळी उपस्थित होते
अमळनेर : प्रतिनिधी लोकमान्य विद्यालयाच्या गुजरात येथे सहलीला गेलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा सकाळी चालकाच्या नजर चुकीने विजेच्या खांब्याला धडकल्याने ट्रॅव्हल जागीच पलटी होऊन अपघात झाला त्यात चार ते पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठा विघ्न टळला आहे. हा अपघात झाला नंतर ट्रॅव्हल चालक घटना स्थळावरून फरार झाला आहे. शहरातील लोकमान्य विद्यालयाची शैक्षणिक सहल गुजरात राज्यात गेली होती तेथील खाजगी ट्रॅव्हल कंपनी ची .विश्वकर्मा टुरिस्ट अँड ट्रॅव्हल्स कंपणीची खाजगी बस क्र. आर जे 09 पी ए 3075 ने पावागड कडे जात असतांना आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुकरमुंडा ह्या गावाजवळ चालकाच्या चुकीमुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खांब्याला धडकून ट्रॅव्हल जागेवर पलटी…
अमळनेर : प्रतिनिधी अंगणात खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात धरून अश्लील बोलणाऱ्या व वारंवार पाठलाग करणाऱ्या पातोंडा येथील एका तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय दिलीप बाविस्कर (पातोंडा ) हा गेल्या १५ दिवसांपासून शाळेत येता-जाताना पाठलाग करत होता. त्यामुळे ती शाळेत जात नव्हती. तसेच अजय हा दुकानावर व चक्कीवर जाताना पाठलाग करून त्रास द्यायचा. ९ रोजी अल्पवयीन मुलगी व तिच्या मामाची मुलगी अंगणात बॅडमिंटन खेळत असताना अजयने तिचा हात धरून अश्लील शब्दात तिला बोलला. मुलीचे नातेवाईक मयत झाल्याने तिने उशिरा फिर्याद दिल्यावरून अजय बाविस्कर…
जळगाव : प्रतिनिधी कापूस भरून निघालेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या वाहनाने कट मारला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक ममुराबाद ते विदगाव रस्त्यावरील हातेड नाल्याच्या वळणावर उलटल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात राज रवींद्र भिल अहिरे (२०, रा. मुकटी, जि. धुळे) या तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील चालकासह ७ मजूर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. धुळे जिल्ह्यातील मुकटी येथील ट्रक (एमएच १८ एए १०८०) कापूस घेण्यासाठी गुरुवारी सकाळी मजुरांना घेऊन यावल तालुक्यात आला होता. डांभुर्णी येथे शेतकऱ्यांकडून कापूस भरल्यानंतर दुपारच्या सुमारास तो मुकटी येथे जाण्यासाठी निघाला. दुपारी ४…
जळगाव : प्रतिनिधी सुरेशदादा जैन यांनी राजकारणात अनेकांना मार्गदर्शन केले असून मी देखील त्याचे बोट पकडून राजकारणात आलो. त्यांनी राजकारणात पुन्हा यावे की नाही हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे. परंतु, त्यांनी राजकारणात यावे; अशी प्रतिक्रीया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना न्यायालयाने अंतिरित नियमित जामीन मिळाला. यानंतर तब्बल तीन वर्षानंतर बुधवारी रात्री त्यांचे जळगावात आगमन झाले. आज सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आमच्याकडे ही लक्ष द्यावे सुरेशदादा बऱ्याच दिवसानंतर त्यांचे जळगाव शहरात आगमन झाले आहे. राजकरणानंतर त्यांनी आता कुटुंबियांकडे लक्ष देणार आहे.…
अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट वादात सापडला आहे. अयोध्य्याचे महंत राजू दास यांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकंच नव्हे तर त्यांनी म्हटलंय, “मी प्रेक्षकांना विनंती करतो की ज्या थिएटरमध्ये पठाणचा चित्रपट दाखवला जाईल, त्याला जाळून टाका.” राजू दास यांनी बॉलिवूड आणि शाहरुखवर सनातन धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप केला. “बॉलिवूड आणि हॉलिवूड सतत या प्रयत्नात असतात की कशा पद्धतीने सनातन धर्माची मस्करी करावी, कशा प्रकारे हिंदू देवी-देवतांचा अपमान करावा. पठाण चित्रपटात दीपिका पदुकोणने बिकीनी घालून साधुसंतांच्या आणि राष्ट्राच्या भगव्या रंगाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. हे दु:खद आहे”, असं अयोध्याचे महंत राजू दास म्हणाले. “भगव्या…
मुंबई : वृत्तसंस्था कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी वारंवार वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम केल्याचा घणाघातही त्यांनी केला. सीमाभागामध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी दोन्ही राज्यांनी दिल्लीत ठरवल्याप्रमाणे वागले पाहिजे. सीमावादाच्या आंदोलनामागचा मास्टरमाइंड शोधावा, अशी मागणी गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत केली आहे. अजित पवार म्हणाले की, सीमावाद पेटवणारा सूत्रधार कोण आहे, हे का घडले, असा विरोध का आणि आंदोलन का झाले? यात जाणीपूर्वक कोणी ट्विटवर बातम्या सोडल्या आणि त्यातून लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या भावनांचा उद्रेक झाला. उद्रेक होऊन या सगळ्या गोष्टी घडल्या, हे सारे समोर आले पाहिजे. आता काही जणांना असे वाटते की, हे कोणीतरी विरोधकांनी केले.…
जळगाव : प्रतिनिधी शहरात आज दि.१५ डिसेंबर रोजी येथे दोन डिसेंबर पासून तर पाच जानेवारीपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात जनमानसांमध्ये आयुर्वेदा विषयी आस्था वाढावी म्हणून प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन वैद्य प्रता जोशी धुळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राची यात्रा करत करत हा रथ १५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे पोहोचला. जळगाव येथे ही रथयात्रा काव्यरत्नावली चौक पासून शिवाजी पुतळ्यापर्यंत निघाली आहे . या रथयात्रेच्या आयोजनामध्ये सुरुवातीला उत्कृष्ट लेझीम पथक त्यानंतर शहनाई वादन , वनस्पती दर्शन , आयुर्वेद ग्रंथ पालखी, आयुर्वेद रथ व तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व वैद्य मंडळी यांचा समावेश होता . जळगाव जिल्ह्यातील अकरा वैद्यांचे, की ज्यांनी आपले…
अमरावती : वृत्तसंस्था मित्र एकत्र आले कि कोणती मस्करी करीत हे सांगता येत नसते पण कधी कधी हि मस्करी सुद्धा खूप महागात पडत असते. ज्यामधून एखाद्या मित्राला त्रास होवून दुर्देवी घटना हि घडू शकते अशीच एक धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे घडल्याने मैत्री या गोड शब्दाला काळिमा फासला गेला आहे. तीन मित्र एकत्र येत मस्करी सुरु असतांना एकाने आरोपीने अचानक आपल्या सोबत असलेल्या मित्रावरच अनैसर्गिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे दुसऱ्या एका मित्राने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन दोन जणआंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

