धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका महिलेचे मुत्रपींड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल ८ लाख रुपये खर्चे येत होता त्यांनी वेळोवेळी औरंगाबाद येथील एका रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना शस्त्रक्रिया करण्याचे सांगतिले. धरणगाव शहरातील प्रगती पाटील या महिलेचे ८ डिसेंबर रोजी हि शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांनी लागलीच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ना.पाटील यांनी त्या महिलेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांची मदत फक्त दोन दिवसात मिळवून दिल्याने या महिलेचे औरंगाबाद येथील मेडीकव्हर हॉस्पीटल डॉ.सचिन सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्र क्रिया यशस्वीरित्या पार पाडली. त्यासाठी संपूर्ण 8 लाखाचा खर्च आला तर यामध्ये ना.गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नानामुळे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी येथील चोपडा-धरणगाव रस्त्यावरील मजरेहोळजवळ, जळगावहून चोपडाकडे येणारी ट्रक (एम.एच.१८-ए.पी.४०९६) आणि चोपडा-धरणगावमार्गे जळगाव जाणारी बस (एम.एच.-२०-१४७५) यांची धडक झाली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात बसमधील २४ प्रवासी जखमी झाले. ट्रकचालक पसार झाला.अपघातातील एकूण १२ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. तर १२ जणांना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. याबाबत चोपडा शहर पोलिस स्थानकात योगेश सुभाष पाटील (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून माल ट्रक क्र.एम.एच.१८.एपी.४०९६ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पो.ना.मधुकर पवार हे करीत आहेत. जखमींमध्ये बसचालक योगेंद्र सुभाष पाटील(वय ३२), देविदास सोनवणे (वय ६०, रा.शिंदेवाडा, चोपडा), गुणवंत पुंजू वाघ (वय ५२,…
मुंबई : वृत्तसंस्था महापुरुषांसंदर्भात सातत्याने होणाऱ्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात पुण्यापाठोपाठ मुंबईतील वरळीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महापुरूषांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यांविरोधात आज मुंबईतील वरळी परिसरात बंद पाळला जाणार आहे. राज्यात महापुरुषांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत. अगोदर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते सुधांशु त्रिवेदी, प्रसाद लाड, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून विविध संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. तर राज्यपालांना पदावरुन हटवण्याचीही मागणी करण्यात आली होती. याच वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंदची…
जळगाव : प्रतिनिधी कर्ज फेडण्यासाठी दिलेले सोन्याचे दागिने परत मागितल्याच्या कारणावरून सासऱ्याने जावयाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जाखनीनगरमध्ये घडली. हा प्रकार एवढ्यावर न थांबता शालकासह पत्नी व मेहुणीने सुद्धा मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कपिल दिलीप बागडे यांनी सासरे महेश माचरे यांना कर्ज फेडण्यासाठी पत्नीचे दागिने दिले होते. हे दागिने त्यांनी सासऱ्यांकडे मागितले. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता महेश माचरे हे जावई कपिल यांच्या घरी आले. तू मला दिलेले दागिने का मागतो, ते मी तुला देणार नाही, असे बोलून त्यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉड हा जावई कपिल…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरात महात्मा फुले यांचे स्मारक झालाच पाहिजे या निमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि यावर आ.भुजबळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले व स्मारक लवकरात लवकर कसा उभारला जाईल याबद्दल सल्ला दिला, त्याबद्दल चाळीसगाव तालुका व बहुजन समाज व महात्मा फुले स्मारक समिती यांच्यातर्फे माजी मंत्री आ.भुजबळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले. शहरातील महात्मा जोतिराव फुले यांचे स्मारक व्हावे यानिमित्ताने दि १४ रोजी माजी मंत्री छगनराव भुजबळ यांची चाळीसगाव येथील महात्मा जोतिराव फुले स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव खलाने, उपाध्यक्ष उमेश महाजन, सचिव एडवोकेट अविनाश जाधव, सदस्य भगवान महाजन, सदस्य एडवोकेट राहुल माळी, सदस्य यज्ञेश बाविस्कर यांनी भेट घेत…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी व इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या रोजगार मेळाव्यात एकूण 460 तरुणांनी आपली नोंदणी करून उपस्थिती दिली. यावेळी काही नामांकीत कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष मुलाखती पार पडल्या यामध्ये एकूण 232 तरुणांचे सिलेक्शन करून त्यांना लगेच ऑफर लेटर देण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड.रविंदभैय्या पाटील,कार्याध्यक्ष विलास पाटील,महानगरअध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलिक,ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,जिल्हा समन्वयक विकास पवार,महिला महानगराध्यक्षा सौ.मंगला पाटील,ग्रंथालय सेल समन्वयक सौ.रिटा बाविस्कर,युवक अध्यक्ष रिकू चौधरी,सेवादल जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन सर,सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी,युवती अध्यक्षा…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील तरुणांना नुकतीच डाक विभागाने सुवर्ण संधी देवू केली आहे. नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट मुलाखतीद्वारे अभिकर्त्यांची (विमा एजंट) नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.२७ मंगळवारी सकाळी अकरा वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक टपाल विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे. अभिकर्ता पदासाठी पात्रता व अटी पुढीलप्रमाणे -उमेदवार दहावी अथवा समतुल्य परिक्षा पास असावा. -उमेदवाराचे वय १८ ते ५० दरम्यान असावे. -उमेदवारास संगणकाचे आणि स्थानिक ठिकाणांचे ज्ञान असावे. -उमेदवार कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा. -उत्तीर्ण उमेदवारास पाच हजार रुपये राष्ट्रीय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या राजधानीत पुन्हा एकदा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. एका १२ वीत शिकणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत मुलीच्या चेहऱ्याला गंभीर इजा झाल्याचे सांगितले जात असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेवेळी पीडित मुलगी घटनेच्या वेळी तिच्या लहान बहिणीसोबत होती. त्यावेळी या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक अॅसिड हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीतील द्वारका मोड भागात…
मुंबई : वृत्तसंस्था जगात क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकरने आपले नाव जसे जागतिक पातळीवर नेले तसेच कार्य आता त्याच्या मुलाने सुरु केले तर वावगे राहणार नाही, नुकतीच अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी रचत सचिन तेंडुलकरची मान अभिमानाने ताठ केली. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध पहिल्या डावात 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. अर्जुनने देखील सचिनप्रमाणेच आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी केली. सचिनने 1988 मध्ये गुजरातविरूद्ध हा कारनामा केला होता म्हणजे बाप से बेटा सवाई असे नक्कीच म्हणावे लागेल. गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. पहिल्या…
जळगाव : प्रतिनिधी डीपीडीसी अंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा पोलीस दलाच्या बळकटीकरणासह आपले पोलीस संकल्पनेच्या माध्यमातून ११२ वाहन खरेदीसाठी २ कोटी ६६ लाखाचा निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यात २५ बोलेरो आणि ८५ होंडा शाईन दुचाकी, १ मारुती कार व १ बोलेरो पिकअप व्हॅन आदी वाहनांचा यांचा समावेश आहे.याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ११२ वाहने लवकरच पोलीस दलात दाखल होणार आहेत. याबाबत जिल्हा पोलीस दलास नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलाचे मनोबल उंचावणार असून अधिक सक्षम होण्यास मदत होईल तसेच CCTV कॅमेऱ्यासाठी ही १० कोटीं…

