जमशेदपूर : वृत्तसंस्था राज्यात काय देशात कुठेही जा तुम्हाला कुठेही राहण्यासाठी oyo च्या माध्यमातून राहण्याची सोय लागलीच होत असते. या oyo च्या रूम जास्त करून तरूण आणि तरुणींमध्ये याची मोठी क्रेज आहे. त्यामुळे याठिकाणी जाणारेहि तरुणच असतात याचाच प्रत्यय पुण्यातील एका तरुण-तरुणीला आला. त्यांनी घटना बघून त्यांच्या सह परिसरातील लोकांना हादराच बसला. एका तरुणाने OYO रुम बूक केली आणि खोलीत जाताच त्याला धक्का बसला. त्याने खोलीत असं काही पाहिलं की यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या जमशेदपूर येथे पुण्यातील प्रेमीयुगुल गेले होते. लॉजच्या खोलीत जाताच तरुणाला बेडखाली २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. झारखंडमधील जमशेदपूर येथील आदित्यपूर पोलीस…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या विधानाविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचा व्हिडीओ शेअर केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला होता. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं, “देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही.” पण हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओवरुन भाजपासह मराठा संघटनाही आक्रमक झाल्या आहे. संभाजीराजे छत्रपती यांचया स्वराज्य संघटनेने याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर…
मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला पण तो व्हिडीओ मराठा मोर्चाचा आहे. हा व्हिडिओ महामोर्चाचा नसून मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाही संजय राऊतांविरोधात आक्रमक झाला आहे. या व्हिडिओप्रकरणी आज शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर नॅनो मोर्चा म्हणून टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर म्हणून संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र…
मुंबई : वृत्तसंस्था कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं चढ-उतार होत असूनही देशातील पेट्रोल-डिझेल मात्र स्वस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज कच्चं तेल 80 डॉलरच्या खाली आहे आणि भारतातही चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलर्सच्या खाली आहे. आज ते प्रति बॅरल 79.72 डॉलर्सच्या दरावर आहे. याशिवाय, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 74.90 डॉलर आहे आणि अशा स्थितीत ती केवळ 75 डॉलरच्या खाली आहे. दररोज सकाळी जारी होतात नवे दर भारतातील सरकारी तेल कंपन्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता…
जळगाव : प्रतिनिधी चुलत भाचीच्या लग्न समारंभाला नाशिक येथून आलेल्या दीपाली चेतन विसपुते यांच्या पर्समधून दागिने व रोकड, असा एकूण ६८ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. ही घटना बुधवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये घडली. महिलेचा भाऊ संदीप देवरे याने रविवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने पर्समधून ४ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची मोतीनथ, ७ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, ११ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅमचे सोन्याचे झुमके, १४ हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅमच्या सोन्याचे कानातील साखळ्या, ४…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील अंतूल्री येथे एका शेतकरीच्या घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी देविदास सुकदेव पाटील (वय ५५) यांचे मालकीच्या घरातून दि १८ रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलुप तोंडून घरात प्रवेश करीत घरातील २ लाख २० हजार रुपयांचे सोने व चांदीचे दंगीने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी विजया वसावे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जळगावातून जाणाऱ्या ममुराबाद रोडवरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात देविदास दशरथ पाटील (५६, रा. ममुराबाद) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात धडक देणारे दुचाकीस्वार मयुर डिगंबर डांगे (२३) व ऋषी आबा महाले (२१, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे देविदास पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. ते दाणाबाजारात हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते (एमएच. १९. डीजे. ३६०९) दुचाकीने ममुराबादकडे जात होते. तर मयुर डांगे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा रविवार, १८ रोजी होणार आहे. जिल्हा दुध संघाची निवडणूक झाल्यानंतर चेअरमनपदाची निवड १८ आज होत असल्याचे त्या पाश्वभूमीवर शनिवारी नुतन संचालकांची बैठक झाली. बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यत हि बैठक चालली. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत व मुक्ताई नगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळवलेल्या मंगेश चव्हाण यांचीच चेअरमनपदी निवड होणार असे संकेत होते. त्यानुसार चव्हाण यांच्याच नावावर…
मुंबई : वृत्तसंस्था महाविकास आघाडी सरकारचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, आजच्या महामोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे-फडणीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना पाहणार नाही. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकणार नाही. हे सरकार उलथवून टाकू. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार संजय…
औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालेली आहे रागाच्या भरात कोण काय करेल हे कुणीही सांगू शकत नाही. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा जीव घेतला आहे. वडिलांच्या छातीवर बसून केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू आहे. तर परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती मिळताच आरोपी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशरफ खॉन आमीन खॉन (वय 65 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, असद अशरफ खॉन (वय 35 वर्षे) असे बापाचा जीव घेणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिडकीन गावातील आझाद चौकात राहणारे अशरफ खॉन यांच्यावर…

