भुसावळ : प्रतिनिधी येथील शासकीय धान्य गोदामात वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी संगम मताने जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करून सरकारने दिलेल्या रेशन धान्याचा साठ्यात ७,२७,२४४, १७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन ला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असेकी, भुसावळ येथील शासकीय धान्य गोदामात विशाल नाईकवाडे तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात तत्कालीन तहसीलदार रवींद्र जोगी तत्कालीन तहसीलदार बोदवड एस यु तावडे प्रभारी तहसीलदार श्री कुमार चिंचकर तत्कालीन उपविभागीय अधिकारी भुसावळ आर एल राठोड तत्कालीन गोदाम व्यवस्थापक भुसावळ यांनी संगम मताने जाणीवपूर्वक भ्रष्टाचार करून सरकारने दिलेल्या रेशन धान्याच्या साठ्यात ३९१.९२ क्विंटल रेशनचे धान्य गहू साखर ज्वारी किंमत ७ लाख…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था वर्षाच्या अखेरीस राज्यात भीषण अपघाताची बातमी आली आहे. शाळकरी मुलींच्या सहलीची बस (ट्रॅव्हस) आज पाहटे चार वाजल्याच्या सुमारास कोसळली.या अपघातात ३ मुली गंभीर, तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या. हि घटना बारामती-पाहुणेवाडी हद्दीतील एका पुलावर घडली आहे. बारामती महिला हाॅस्पीटलमध्ये जखमी मुलींवर पुढील वैद्यकिय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले.अपघातग्रस्त यशदा ट्रॅव्हलमध्ये एकूण ४८ मुली, पाच शिक्षक प्रवास करीत होते. तसेच दोन चालकांपैकी श्रीपाद पाटील हा अपघातग्रस्त ट्रॅव्हल चालवित होता. पहाटेच्यावेळी चालकाच्या डोळ्यावर झोप लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला असावा, अथवा रस्त्यावरील पुल व वळणाचा आंदाज न आल्याने वरील अपघात घडला असावा,असा आंदाज…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून एकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सविस्तर वृत्त असे की शहरातील एरंडोल रोड वर असलेल्या रामकृष्ण नगर मधील रहिवासी रोशन शिवाजी मोरे यांच्या मालकीची दुचाकी एम.एच 19 एसी 2402 या क्रमांकाचे दिनांक 16 रोजीच्या मध्यरात्री अनोळखी चोरट्यांनी चोरून दिल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात नामदेव पितांबर महाजन (वय६०) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेगाव नाना ठाकरे हे करीत आहे
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीवर वर्षभरापूर्वी अत्याचार करीत तिला गरोदर करून त्या अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, भडगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलगी ही २०२१ मध्ये वय वर्ष 12 असे संशयित आरोपी याला माहीत असताना सुद्धा कोणास काही एक न सांगता त्याने तिच्यासोबत मंदिरात जाऊन लग्न केले त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने एका बाळास जन्म दिल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन संशयित आरोपीवर विविध कलमाअंतर्गत…
मुंबई : वृत्तसंस्था पक्ष शिवसेना, नेते बाळासाहेब ठाकरे, पक्षाची कार्यालयं आमची… मग तुम्ही काय केलं? स्वतः च्या मुलांना जन्म द्या दुसऱ्यांची मुलं खेळवू नका, सेनाभवन घेणार असं बोलणाऱ्यांनी हिंमत असेल तर स्वतः चं सेना भवन निर्माण करावं, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरही राऊत यांनी भाष्य केलंय. बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होते आहे? तिथलं सरकार कानडी संघटना मराठी भाषा मराठी माणसावर अन्याय करत आहेत. सुप्रीम कोर्टाने ठेवण्याचे आदेश पाळले जात नाहीत. हा प्रदेश केंद्रासाठी करावा तिथल्या मराठी लोकांनवरील अन्याय थांबावे थांबावे ही त्यासाठी मागणी आहे, असं राऊत म्हणालेत.…
आपल्या अभिनयाने राज्यात नेहमीच धुमाकूळ घालणारी व प्रेक्षकांना हसवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सर्वांची लाडकी आहे. तिचं सौंदर्य सर्वांना भुरळ घालण्यासाठी पुरेसं आहे. त्यातच तिच्या अभिनया तर तोडचं नाही. ती कायमच चर्चेत असते. तिचे चाहते नेहमीचं तु कधी करणार असं प्रश्न विचारत असते. तर प्राजक्ता कोणासोबत लग्न करणार याचीही सर्वांना उत्सूकता आहे. अनंत पटवा यांनी प्राजक्तासाठी येणारं २०२३ हे वर्ष कसं असणार आहे? तिच्या कुडंलीत यंदा लग्नाचा योग आहे का? तिच्याकडे काही नवीन प्रोजेक्टस येणार आहेत का? याबद्दल माहिती दिली. https://www.instagram.com/p/CmY7Jsnrr0o/?utm_source=ig_embed&ig_rid=926dba75-6140-4eb3-a468-31e805799a2e येणारे पुढिल वर्ष हे प्राजक्तासाठी चांगलं आहे असणार आहे. तिला नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता…
मुंबई : वृत्तसंस्था यंदाच्या दहावी-बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान तर बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे. सीबीएसईच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक आले आहे.राज्यातील दहावी-बारावी विद्यार्थीसाठी मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी ज्याप्रमामे 2 टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या तशा यंदा होणार नाही. यावर्षी एकाच टर्ममध्ये परीक्षा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी याबाबत निर्णय घेण्यात आला होता. गेल्यावर्षी 35 लाख विद्यार्थी 10-12 वीत बसले होते. बारावीमध्ये एकूण 92.71 टक्के तर दहावी मध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. दहावी आणि बारावीसाठी प्रॅक्टिकल…
मुंबई : वृत्तसंस्था भारत निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर केला असून सदर कार्यक्रमानुसार नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य प्रशासन) उन्मेष महाजन यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्या नंतर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती उपायुक्त उमेश महाजन यांनी दिली. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार पाच जानेवारीला अधिसूचना काढली जाईल. 12 जानेवारी पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 13 जानेवारीला अर्जाची छाननी होईल माघारी साठी 16 जानेवारी अंतिम मुदत आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया…
अकोला : वृत्तसंस्था पतीला ठार मारण्यासाठी पत्नीने ओळखीतील व्यक्तीला ३० हजार रुपयांचे आमीष दाखवून त्या व्यक्तीने गळफास देऊन पतीला ठार मारले व नजीकच्या एका जीममध्ये गळफास घेऊन मृत्यू झाल्याचे भासवले होते. मात्र, संशयावरून पोलिसांनी पत्नी आणि सुपारी किलरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना दहिहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुंडा येथे गुरुवारी उघडकीस आली. पुंडा येथील बाबर्डा मार्गावर असलेल्या जीममध्ये व्यायामासाठी लावण्यात आलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह २८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता आढळून आला होता. त्यानंतर तो मृतदेह सचिन बांगर (३५) यांचा असल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी घटनास्थळी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऋषभ पंत कारने उत्तराखंडला जात होता. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने रुडकी येथील नारसन सीमेवर हम्मदपूर झालजवळील वळणावर ऋषभ पंतची भरधाव कार रेलिंगला धडकली. त्यानंतर कारला आग लागली आणि कार उलटली. त्यानंतर काही वेळाने आग आटोक्यात आणण्यात आली. ऋषभ पंतला उपचारासाठी तातडीने दिल्लीला पाठवण्यात आले आहे. ऋषभ पंत दिल्लीहून घरी जात असताना हा भीषण अपघात झाला. ऋषभची कार रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथील एका वळणावर रेलिंगला धडकली. कार नारसन गावात आली असता कारचालकाचं गाडीवरील ताबा सुटला आणि रेलिंग तसेच खांबांना धडक देत कार पलटी झाली. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे कारला भीषण आग लागली. त्यामुळे बघता…

