Author: editor desk

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील मनवेल येथुन यावल कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्या करीता येणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बसस्थानकावर चहा विक्री करणाऱ्याने विनयभंग केला गेल्या काही दिवसापासुन तो अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता व तिच्या मोबाईल क्रमांकाची मागणी करीत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनवेल ता. यावल येथून एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी येते. बसस्थानकावरून महाविद्यालयात जातांना या अल्पवयीन मुलीचा यावल येथील बस स्थानकावरील चहा विक्रेता अशोक नानकराम दुधानी वय ४० रा.भुसावळ हा गेल्या काही दिवसांपासुन पाठलाग करीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  भुसावळ शहरातील ४७ वर्षीय सेवानिवृत्त बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाल्यानंतर त्यांना वांजोळा रस्त्यावर अडवून लुटण्यात आले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर जळगाव गुन्हे शाखेने भुसावळसह कंडारी येथील चौघा तरुणांना अटक केली आहे.प्रमोद कैलास धीवरे (27, अशोक सम्राट नगर, कंडारी), मयूर संजय अंभोरे (22, पंधरा बंगला, भुसावळ), आकाश किशोर किरतकुरे (28, अशोक सम्राट नगर, कंडारी) व हितेंद्र उर्फ किट्टू राजू बोदाला (24, झेडटीएस, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल जाधव, हवालदार कमलाकर बागुल, हवालदार अनिल देशमुख, हवालदार दीपक पाटील, संतोष मायकल, हेमंत…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या राजेश ऊर्फ दादू एकनाथ निकुंभ (धोबी), रा. पारधीवाडा, अमळनेर याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी एमपीडीएची कारवाई केली. त्याला एलसीबीने अमळनेर येथून ताब्यात घेत नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यासाठी पाठविले आहे. शहरातील राजेशविरुद्ध अमळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, आर्म अॅक्ट, दुखापत असे एकूण ११ गुन्हे दाखल असण्यासह व प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. जामीन मिळाल्यानंतर तो पुन्हा गंभीर गुन्हे करीत असल्याने अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएच्या कायद्यातंर्गत कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. अधीक्षक एम. राजकुमार यांनी पडताळणी करून सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी अमन मित्तल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामेश्वर कॉलनीमधील माहेर असलेल्या हर्षदा गणेश भगत यांचा विवाह जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील गणेश श्रावण भगत याच्याशी झाला. लग्नानंतर काही दिवस सर्व सुरळीत सुरू असताना पतीसह सासरच्या मंडळींनी पैशांसाठी हर्षदा यांचा छळ करण्यास सुरुवात केली. घर घेण्यासाठी हर्षदा यांनी माहेरून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी पतीसह सासरच्यांनी केली. पाच लाख रुपये घेऊन आणखी पाच लाख रुपये आणावेत. या कारणावरून रात्री-बेरात्री हर्षदा यांना घराबाहेर काढून देणे, शिवीगाळ करणे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करताना पावणेतीन लाखांचा गुटखा व कार असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. तांबापुरा येथील शेख इम्रान शेख जहुरोउद्दीन हा कारने (क्र. एमएच १९ एएक्स ३५१०) भुसावळ ते जळगाव या मार्गावर तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस उपनिरीक्षक गणेश चोभे, सहायक फौजदार युनूस शेख इब्राहिम, पोलिस नाईक रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, प्रमोद ठाकूर यांनी ही कारवाई केली. या पथकाने टोल नाक्याजवळ कारवाई केली. कार क्र. एमएच १९/ एएक्स ३५१० मध्ये दोन लाख ७५ हजार २६४ रुपयाचा पान मसाला व तंबाखू मिळून आला. याबाबत नशिराबाद पोलिस स्टेशनला…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील पिंपळेसिम येथे अज्ञात ४० वर्षीय प्रौढाचा मृतदेह विहिरीत आढळला असून हा मृतदेह पाण्यात फुगल्यामुळे अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे ओळख पटविणे शक्य नव्हते. दि. ३ जानेवारीला सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पिंपळेसिम येथील संतोष पाटील आला. यांच्या शेतातील विहिरीत एक मृतदेह तरंगताना आढळला. लागलीच पोलिस पाटील भगवान लक्ष्मण पाटील यांना कळवले. यानंतर घटनास्थळी धरणगाव पोलीस हजर झाले. मृतदेहाची अवस्था बघता हा इसम साधारण एक-दीड दिवसाआधी विहिरीत पडला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानंतर रात्री मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर दि. ४ रोजी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, धरणाव पोलिसांनी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगाव शहरातील गिरणा काठी जात वाळू माफियांचे धाबे दणाणले होते तर आज धरणगाव शहरात एका ठिकाणी छापेमारी करत रेशन दुकानदारकांचे धाबे दणाणले आहे. मिळालेली माहिती अशी की शहरातील दोन गोडाऊन वर आज दिनांक ४ रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या पथकाने एका गोडाऊन वर छापा मारीत त्या ठिकाणी मोठ्या जागेत धान्य आढळून आले तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आढळून आला. जिल्हाधिकारी मित्तल यांच्या पथकाने हे गोडाऊन सील करतात त्यांनी लागलीच दुसऱ्या गोडाऊन वर धडक देत त्या ठिकाणी मोठ्या परिसरात धान्यसाठा आढळून आला त्यामुळे ते गोडाऊनही जिल्हाधिकाऱ्यांनी सील केले. जिल्हाधिकारी अमन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहेत. सहज उपलब्ध होणाऱ्या पैशांमुळे अनेक तरुण अवैध धंद्यांच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून पोलीस प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन अवैध धंदे तात्काळ बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव विभाग अध्यक्ष कमलेश देवरे यांनी केली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद करण्यात आले की, शहरातील अवैध धंद्यांमुळे अनेक तरुणांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती आहे. अवैध धंद्याच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे शहरात खुनाच्या घटना घडल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने ही बाब…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  मित्रासोबत गप्पा मारत उभ्या असलेल्या विद्यार्थीनीचा अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर उजेडात आला आहे. या प्रकरणी विद्यार्थीनीने चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अ‍ॅल्युमिनी हॉलच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावर घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. चतुःश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये दीपक सौदे याच्याविरुद्ध तरुणीच्या फिर्यादिनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिस त्या तरुणाची चौकशी करीत आहेत. सीसीटिव्हीचा आधार घेऊन पोलिस चौकशी करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. हा प्रकार 31 डिसेंबरच्या रात्री घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी तरुणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिच्या मित्रासोबत ती विद्यापीठातील…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून मानले जाणारे भैय्या मराठे सर यांची नुकतीच बाळासाहेबांचे शिवसेनेच्या युवा सेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आली आहे. बोरगाव येथील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक भैय्या मराठे सर याची बाळासाहेबांचे शिवसेनेच्या युवा सेना जिल्हा उपसंघटकपदी निवड करण्यात आलेली असून त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, जि प सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले.

Read More