Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.शहाजी बापूंची अजित पवारांवर टीका
    राजकारण

    आ.शहाजी बापूंची अजित पवारांवर टीका

    editor deskBy editor deskJanuary 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा : वृत्तसंस्था 

    शिंदे गटाच्या एका आमदाराने आता अजित पवार यांना चांगलेच फटकारले आहे. एका खासगी कार्यक्रमानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर व स्वराज्य रक्षक म्हणण्यावरून सध्या राज्यात वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वराज्य रक्षक हेच बरोबर आहे. धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक या शब्दावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून शहाजीबापू यांनी आपली प्रतिक्रिया दिलीये. स्वराज्य रक्षक हा अजित पवार यांचा शब्द बरोबर आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदू धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला आवडेल. तेवढा अजितदादांनी वैचारिक मोठेपणा दाखवावा, असं मत बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी इथं व्यक्त केलं.

    शहाजीबापू म्हणाले, स्वराज्य रक्षक हा अजित पवार यांचा शब्द बरोबर आहे. परंतु, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य विस्तारक आणि कडवे हिंदू धर्मवीर होते. अजितदादांनी स्वराज्य रक्षक शब्दाबरोबर धर्मवीर संभाजी महाराज असं म्हटलं तर ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेला आवडेल. तेवढा अजितदादांनी वैचारिक मोठेपणा दाखवावा, असं त्यांनी नमूद केलंय.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.