Author: editor desk

चोपडा : प्रतिनिधी  तालुक्यातील हातेड बु. शिवारात जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी गाडी ताब्यात घेण्यात आली असून, चालक व क्लिनरने पलायन केले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळाहून चालक फरार झालेला आहे. शिरपूर ते चोपडा रोडवर दि. ७ रोजी हातेड बुद्रुकजवळ चोपड्याकडे येताना दोन किमी अंतरावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमपी०८ जीए- २०४९) वरील चालक व क्लिनर यांनी एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९ गोहे अशी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करताना सापडले. या जनावरांचे चारही पाय त्यांना वेदना होतील, अशारीतीने जखडून बांधन गाडीत दाटीवाटीने पालथे टाकण्यात आली होती. गाडीवरील चालक व क्लिनर यांनी वाहन थांबताच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील क्रिकेटच्या मैदानातहि पवार परिवार आता आपली परंपरा काय करताना आता दिसून आले आहे. नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. आजोबांपाठोपाठ नातवाचीही एंट्री झाली असून रोहित पवार हे असोशिएशनचे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला असून असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली असून अध्यक्षपदी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  समाजात आपण नेहमी बघत असतो कि मुलीसोबत नेहमी दुजाभाव केला जात आहे. तर काही घरात मुलगी आणि मुलामध्ये फरक पडला जावून मुलीला नेहमी दुय्यम स्थान दिले आहे. पण कधी ना कधी मुलगा जे काम करू शकत नाही ते काम मुलगी करून दाखविते त्यावरून समाजात लक्षात येत असते कि मुलगी सुद्धा तितकीच आपल्याला महत्वाची आहे. अशा अनेक घटना घडल्या असतात. अशीच एक घटना भडगाव तालुक्यात घडली आहे. आईच्या निधनानंतर भाऊ नसल्याने मुलीने आईला अग्निडाग दिला आहे. भडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील श्री शांताराम भास्कर बिरारी यांच्या लहान बहीण सौ. सुनंदाबाई संभाजी पाटील यांचे दिनांक ७ जानेवारी रोजी रात्री ठीक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. त्यानंतर महिला आयोगाकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली. अशात उर्फी प्रकरणात आता करुणा धनंजय मुंडे-शर्मा यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज उर्फी जावेदच्या कपड्यांवरून जो काही वाद सुरू आहे त्यात तिच्या कपड्यांवर मी देखील विरोध करते. इकडे-तिकडे अर्धनग्न फिरणे ही सर्वच महिलांसाठी लज्जास्पद गोष्ट आहे. ज्या महिला आणि राजकारणी महिला उर्फीला पाठींबा देत आहेत त्यांना मी सांगते की, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्ही अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत आहात. ज्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका महाविद्यालय परिसरातील भागात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना शुक्रवारी दपारी अडीच वाजता घडली.याप्रकरणी दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता पीडिता एका महाविद्यालयाच्या परिसरातुन जात असताना फारुख खान अनिस खान (रा. उस्मानिया पार्क) व योगेश गजानन कुंवर (रा. श्रीराम चौक, वाघनगर) जळगाव या दोघांनी विद्यार्थिनीचा पाठलाग केला. तसेच तिला अश्लील हातवारे करून फोन मागून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील वंजारी खपाट या गावाचे रहिवासी नवल राजाराम माळी (वय 48) यांचे काल दिनांक 7 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. खान्देशातील प्रसिद्ध गायक म्हणून त्यांची ओळख होती. साली नंबर वन, साली सं दिलवाली ही व अशी शंभर पेक्षा अधिक प्रसिद्ध खान्देशी गिते त्यांनी गायली. अहिराणी भाषेला गितांद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आणि अहिराणी भाषेला एक नवीन ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. साली नंबर वन आजही प्रत्येक लग्नसमारंभात वाजवताना आपल्याला दिसतं. सर्वांना परिचित असं संयमशिल आणि निःस्वार्थ व्यक्तिमत्व काल आपल्यातून निघून गेलं. त्यांच्या प्रसिद्ध गितांद्वारे ते कायम प्रत्येकाच्या आठवणीत राहतील.

Read More

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील एका गावातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस दिनांक ७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी गजानन तुकाराम तनपुरे(वय २७) याने काहीतरी फुस लावून अल्पवयीन मुलीस पळून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास भरत लिंगायत हे करीत आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून चारचाकी मालकाची घराजवळून चारचाकी चोरीस गेल्याची घटना दिनांक ५ रोजी उघडकीस आली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शाहूनगर परिसरातील नक्षत्र बिल्डिंगच्या जवळील रहिवासी जितेंद्र कैलास मुळीक यांच्या मालकीची तवेरा कार क्रमांक एम.एच.19.डीजे.00५७ या क्रमांकाची चार चाकी सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीची दिनांक 4 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना दिनांक ५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र मुळीक यांनी दिनांक ७ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. उद्धव यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत गेल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. आम्हीच खरी शिवसेना आहोत असेही शिंदे गटाने म्हणायला सुरु केले. शिंदे आणि ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे त्यांच्यातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात शिंदे गट व ठाकरे गटात नियमित वाद सुरु आहे. यावर आज खान्देशची मुलुखमैदान तोफ म्हणून ख्याती असलेले शिंदे गटातील नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका कळी आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते. ते आडवे पडले असते,’ असे ते म्हणालेत. गुलाबराव जळगाव येथील हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता…

Read More