मुंबई : वृत्तसंस्था ठाकरे गटाच्या महिला नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात वरळी येथील गोमाता एसआरए प्रकरणी वांद्रे येथील निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात सहकारी अधिकारी असलेले उदय पिंगळे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, गोमाता जनता एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत सहा इमारती आहेत. सन 2008 मध्ये पात्र झोपडधारकांना या इमारतीमधील घरांचे वाटप करण्यात आले होते. प्राधिकरणाकडे असलेल्या नोंदीनुसार किशोरी पेडणेकर या सोसायटीत झोपडीधारक नव्हत्या आणि त्यांना कोणतीही सदनिका वाटप करण्यात आली नव्हती. तरीदेखील पेडणेकर यांनी…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी गेल्या एक वर्षापासून सतत १२ वर्षीय मुलीवर अत्यचार करीत तिला गरोदर ठेवल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलिसात त्या मुला विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात एक बारा वर्षे मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे तिच्यावर मागील एक वर्षापासून एका सोळा वर्षे युवकांनी संशयित आरोपीच्या घरी शेतात वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत गरोदर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी बारा वर्षीय मुलीच्या वडिलांनी यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून सोळा वर्षीय युवकावर अत्याचारा चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर हे करीत आहे.
पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र केसरीचा यंदाचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताब वर नाव कोरलं. शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो. तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. एकाच तालमीतील मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यात शिवराजने विजय मिळवलाय.…
नागपूर : वृत्तसंस्था संक्रांतीनिमित्त आभाळ पतंगांमुळं भरुन गेलं आहे. तर दुसरीकडे एकमेकांच्या पतंग कापण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही कटलेली पतंग पकडण्यासाठीही जिवाची पर्वा न करता मागे धावणाऱ्यांच्याही अनेकवेळा अंगाशी येत असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत. असाच प्रकार कुंभारटोली परिसरालगत असलेल्या रेल्वे ट्रॅकवर घडला आहे.शहरात नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर बेतला असताना पतंगाच्या मागे धावताना एका १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर घडली. आकाशात सुरु असलेल्या पतंगांच्या लढती बघत कुंभारटोली परिसरातील मुले उभी होती. तसेच कट झालेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंग कटून जात असलेल्या दिशेने बेभाम पळत सुटायची. असाच एक पतंग कट…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत एकाने अनैसर्गिककृत्य केल्या प्रकरणी शहरातील रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरात रहिवासी असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलास शहरातील एका परिसरात दि १२ रोजीच्या रात्रीच्या सुमारास घेवून जात त्याठिकाणी त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोग केल्या प्रकरणी अल्पवयीन म्मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एका २८ वर्षीय गुड्डू नामक तरूणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी गोपाल देशमुख हे करीत आहेत.
सातारा : वृत्तसंस्था ऑक्टोबर 2019 मध्ये पोटच्या दोन मुलांचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सातारा कोर्टाने हा निकाल दिला आहे. दोषी चंद्रकांत मोहितेने शिरवळ इथे आपल्या दोन मुलांची हत्या केली होती. या आरोपात दोषी ठरल्यानंतर सातारा कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस जाधव यांनी हा निकाल दिला. हे प्रकरण सुमारे सव्वातीन वर्षांपूर्वीचं म्हणजेच ऑक्टोबर 2019 मधील आहे. आपल्या पश्चात पत्नी मुलांचा सांभाळ करणार नाही, असं वाटल्याने चंद्रकांत मोहितेने दोन्ही मुलांची निर्दयीपणे हत्या केली. त्याने शिरवळमध्ये आपला सात वर्षांचा…
नागपूर : वृत्तसंस्था केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येतंय. या कारणास्तव त्यांच्या घराची तसेच कार्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात लँडलाइन नंबरवर धमकीचे फोन कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी डी गँग अर्थात दाऊदच्या नावाने देण्यात आली आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी तीन वेळा गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात धमकीचे फोन आले. त्यामुळे नागपूर पोलीस अलर्ट झाली आहे. सदर कॉल नेमके कुणी केले, यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.…
धरणगाव : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत मरीमाता मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत धानोराचे माजी सरपंच भगवान महाजन माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन जागृती युवक मंडळाचे कडू महाजन पूनीलाल महाजन सूनील चौधरी यांचा हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 12 जानेवारी मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने शिवसेना सह. संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ व लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रतिमा पूजन करण्यात आले त्याप्रसंगी एडवोकेट शरद माळी गटनेते पप्पू भावे विलास महाजन ललित येवले कन्हैया रायपुरकर भागवत चौधरी, राजेंद्र ठाकरे, विजय महाजन वासुदेव चौधरी भैय्या महाजन दिलीप महाजन आर्किटेक सुनील शहा वाल्मीक पाटील बालू पाटील भानुदास पाटील…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सुरु असलेली कॉंग्रेसची भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर सध्या हि यात्रा पंजाबमध्ये सुरु असतांना मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. यात्रेदरम्यान जालंधरचे काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे निधन झाले. ते राहुल गांधीसोबत यात्रेत चालत होते. यादरम्यान, त्यांची प्रकृती खालावली.ल त्याना तात्काळ फगवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयात नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यानंतर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काही काळासाठी थांबवली आहे. ही यात्रा आज लुधियानाच्या लाडोवाल टोल प्लाझा येथून फगवाड्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान ही घटना सकाळी घडली. सकाळी 8.45 च्या सुमारास…
जळगाव : प्रतिनिधी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रमुख रस्त्यांची कामे सुरू आहेत. परंतु हे रस्त्यांचे कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आज प्रस्तावित कामे आणि सुरू असलेल्या रस्ते कामांची पाहणी केली. दरम्यान ज्याठिकाणी रस्त्यांची कामे झाली आहेत त्याठिकाणच्या रस्त्यांचे अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत थर्ड पार्टी ऑडीट केेले जाणार आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव शहरातील रस्ते कामासंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी अमन मित्तल हे उपस्थित होते. शहरातील खराब रस्ते तसेच सुरू असलेले रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत नागरिकांमध्ये सत्ताधार्यांविषयी मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात रस्त्यांची परिस्थीती सुधारली जावी यासाठी ही…

