धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मूळचे कळमसरे येथील रहिवासी तर सध्या हिंगोणे येथे राहत असलेल्या दहा वर्षाच्या बालकाचा आज पतंग उडवतांना विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि , यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात . अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे . येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले महाजन ( माळी ) कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे . याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन ( माळी ) हा बालक आज पतंग उडवत होता . याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला . यामुळे त्याचा…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळे गावात अखेर आली गावात ‘ लालपरी ‘ विध्यार्थ्यांनी मागणी लावून धरल्याने पिंपळे बु।। ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्यावर गावात एसटी सुरू झाली आज पहिल्या दिवशी गावात एसटी आल्यावर गावकऱ्यांनी केले वाजत गाजत स्वागत केले. गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी एक किलोमीटर फाट्यावर पायी जावे लागत होते तर विध्यार्थ्यांण मध्ये खुशी चे वातावरण तयार झाल्यावर त्यांनीही आभार वेक्त केले सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुरावा केल्यानंतर व गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने गावातील सरपंच कविता विनोद पाटील व उपसरपंच किरण मनोहर पाटील व माजी सभापती प्रमोद पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने गावात एसटी सुरू झाली गावात काहीही समस्या उदभवणार नाही अशी…
धरणगाव : प्रतिनिधी दरवर्षाप्रमाणे यंदाही धरणगाव तालुक्यातील विवरे – भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीची दंगलची शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावून दंगल ची सुरुवात करण्यात आली उपस्थित मध्ये भगवान महाजन, उगलाल पाटील, सतीश पेहलवान ,भानुदास विसावे, भानुदास पाटील, राहुल पाटील,प्रशांत पाटील सरपंच,भूषण महाजन, जीभाऊ पेहलवान, कैलास पेहलवान, सुनील पेहलवान,ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी,धनराज माळी, अर्जुन धोबी,अतुल पाटील , अविनाश भदाणे उपस्थित होते
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय विवाहितेचा ५० हजारासाठी सासरच्या मंडळींनी छळ केल्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात स्त्री अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी या गावातील २४ वर्षीय विवाहिता मोनी आत्माराम पवार यांचा सासरच्या मंडळींनी तिला नेहमी चापटा बुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ करीत तुझ्या माहेरून ५० हजार रुपये आण असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरचे मंडळी आत्माराम पवार, सायकाबाई पवार, रोहिदास पवार, आकाश पवार, अमोल पवार, राधाबाई राठोड, धारसिंग राठोड यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात स्त्री अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील एका गावातून एका ३० वर्षीय तरुणाला अनोळखी दोन इसमांनी ६० हजार रुपयाचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देत सांगत फसवणूक केल्याप्रकरणी कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, एरंडोल तालुक्यातील वनकोठे येथील रहिवासी नागेश्वर पाटील यांच्या घराजवळ दिनांक 14 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दोन इसम येत सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देत असे सांगून त्यांच्याकडून तब्बल ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेत दिशाभूल करीत त्यांचे फसवणूक केली आहे याप्रकरणी त्यांनी कासोदा पोलीस स्थानक गाठत अज्ञात व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज कोळी हे करीत आहे
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून अज्ञात व्यक्तीने १४ वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील विटनेर शिवारातील एका फॅक्टरी जवळून १४ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने दि २४ डिसेंबरच्या सायंकाळी काहीतरी फूस लावून पळून नेल्याप्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस स्थानकात धाव घेत अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पुढील तपास सपोनी अमोल मोरे हे करीत आहे.
पुणे : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. लक्षात येताच सुप्रिया सुळेंनी तातडीने ही आग विझवली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही. या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. तसेच, घटनेनंतर पुढील कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या. पुण्यात सुप्रिया सुळे यांचे आज अनेक कार्यक्रम आहेत. घटनेमुळे कोणताही परिणाम होणार नाही. सुप्रिया सुळे सर्व नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना…
सांगली : वृत्तसंस्था राज्यात प्रेम प्रकरण ते नवरा बायकोच्या वाद कोणत्या टोकाला जाईल हे सांगता येत नाही. परिवारातील शुल्लक वादातून खुनाची घटना घडली आहे. सासरचे बायकोला नांदवायला पाठवत नाही म्हणून जावयाने सासऱ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील दरीबडची येथे मध्यरात्री घडली आहे. याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरारी आहे. जत तालुक्यातील दरीबडची येथील तेजश्री हिचे लग्न सुमारे चार वर्षापूर्वी कर्नाटकच्या अथणी येथील ऐगळी गावातील सचिन रुद्राप्पा बळोळी याचाशी झाला. लग्नानंतर एका महिन्यानंतर जावई सचिन आणि मुलगी तेजश्री यांच्यात घरगुती कारणावरुन वाद सुरू झाले. जावई सचिन हा मुलगी तेजश्रीवर चारित्र्याचा संशय घेत…
मुंबई : वृत्तसंस्था बीडमध्ये श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंचा पुण्यतिथी सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गहिनीनाथ गडावर येणार आहेत. त्यांच्यासोबत पंकजा मुंडे सुद्धा याठिकाणी हजेरी लावणार होत्या. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर भाजपमधून मोठी प्रतिक्रिया आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबात प्रश्न विचारण्यात आला. यावर बावनकुळे म्हणाले, “पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. मराठवाडा पदवीधर अर्जासंदर्भात त्यांच्याशी माझे बोलणं झालं. त्यांची प्रकृती परवा चांगली नव्हती. कधी-कधी वयैक्तिक अडचणी येतात. याचा अर्थ त्यांनी दांडी मारली असा होत नाही.” “आम्ही ठरवलं…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात झाला आहे. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. बचावकार्य सुरू आहे. सध्या विमानतळ बंद आहे. या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ फोटो वरुन अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगराळा आदळले. लँडिंगपूर्वी झालेल्या…

