जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी नगर परिसरातील गेंदालाल मिल भागातील एका २६ वर्षीय तरुणाला मारहाण करून लुबाडल्याची घटना शनिवारी या परिसरात घडली आहे. तरुणाकडून बाराशे रुपयांची राेकड व पाच ग्रॅम साेन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन त्याच्या डाेक्यात फरशी मारून, मांडीवर शस्त्राने वार करून जखमी केले. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात दाेन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी सम्राट सुरेश साेनवणे (वय २६) हा तरुण शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गेंदालाल मिल परिसरातील आलिया प्राेव्हिजन जवळून जात असताना प्रशिक प्रकाश जाधव व शुभम सुनील जाधव या दाेघांनी काही एक कारण नसताना त्याला थांबवून सुरुवातीला…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले आहेत. आज त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार राज ठाकरे आपल्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानावरून विमानतळाकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांना कोर्टात 11 वाजता हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे यांना आज कोर्टात हाजीर राहावे लागणार आहे. 2008 मध्ये राज ठाकरे यांना अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पूर्वी देखील राज ठाकरे…
जळगाव : प्रतिनिधी मा खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली. मा.खा.निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्यावर आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जळगाव शहर पोलिस येथे तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर वेड्यांच्या इस्पितळात उपचार करावे अशा सतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे महानगर प्रमुख शरद तायडे विरोधी…
अमळनेर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अवैध वाळू माफीया आता आपल्या उदरनिर्वाहासाठी नागरिकांचा जीव घेताय कि काय अशीच घटना अमळनेर तालुक्यात घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या वाळू माफियावर असलेली प्रशासनाची पकड सैल झाली असून ते कुणालाच जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केला म्हणून अमळनेर तालुक्यात सहा जणांनी एका युवकाच्या गुप्तांगावर फावड्याने वार करून त्याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून जीवे ठार मारल्याची घटना १६ रोजी रात्री 9 ते 17 रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली.त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी सहापैकी दोघांना अटक केली आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी जयवंत यशवंत कोळी (वय 34) यांचे पायकेर शिवारात…
जळगाव : प्रतिनिधी ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये जळगाव पोलीस खेळाडूंची सात पदके प्राप्त करून चमकदार कामगिरी केली. दिनांक ७ जानेवारी 2023 ते 13 जानेवारी 2023 या कालावधीत पुणे येथे 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 या स्पर्धा पार पडल्या त्याकरिता जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधीक्षक जळगाव श्री एम राजकुमार, सह अधिकारी अंमलदार यांचा संघ जळगाव जिल्हा स्थरीय व नाशिक विभाग स्थरीय स्पर्धा खेळून त्यात प्राविण्य मिळवून सर्वांची राज्य स्थरीय स्पर्धे करिता निवड झाली होती. त्यातील पुढील नमूद पोलीस खेळाडू यांनी 33 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2023 या स्पर्धांमधील काही खेळांमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत असून एकनाथ खडसे नेमके कुठे आहेत याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना अचानक एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला असून आठ दिवसापूर्वी एकनाथ खडसे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात मुंबई ला गेले होते. दरम्यान त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क देखील झाला होता मात्र गेल्या…
पुणे : वृत्तसंस्था पुण्याला नेहमी शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरु असलेली गुन्हेगारी कुठेही थांबायचे नाव घेत नाही. अशीच एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात खेळण्याच्या बहाण्याने तेरा वर्षाच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या राहत्या घरात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2022 ते जून 2022 मध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ओळखीच्या 19 वर्षीय तरुणाने 13 वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर सहा महिने लैंगिक अत्याचार केले. या…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यापासून मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद व भाजप नेत्या चित्रा वाघ असा सामना रंगला होता त्यानंतर हा वाद राज्य महिला आयोगाच्या कक्षेत गेल्यावर रुपाली चाकणकर यांनी आता मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेद हिला पुरेसे संरक्षण द्यावे आणि यासंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. उर्फी जावेदनेही राज्य महिला आयोगाकडे धाव घेत चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दि.२१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने दोन्ही परीक्षेदरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावाच्या परीक्षा होणार आहेत. २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान होणार्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे कृती कार्यक्रम तयार…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात अमृत २.० अंतर्गत मल्लनिस्सारण टप्पा दोनचा विकास आराखडा करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे मजीप्र व महापालिकेकडून अमृत २.० च्या करारनामा व विकास आराखडा तयार करण्याचे कामाला सुरवात लवकरच सुरू होणार आहे. जळगाव शहरात अमृत योजने अंतर्गत मल्लनिस्सारण योजनेचे काम पाच झोन मध्ये दोन टप्यात होणार आहे. पहिल्या टप्यात झोन क्रमांक १ व ४ चे मल्लनिस्सारण वाहिनी २२० किमी टाकण्यात आली असून ममुराबाद रस्त्यावर ४८ एमलडी क्षमतेचे मल्लनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प तयार केला आहे. महापालिका प्रशासानाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाला या योजनचा विकास आरखडा तयार करण्याचे कामाचा निर्णय घेतला. त्यानुसार या योजनेच्या कामाला शासनासकडून ग्रीन…

