Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावकरांसाठी गुड न्यूज: अमृत 2.0 चे काम लवकरच सुरू होणार
    जळगाव

    जळगावकरांसाठी गुड न्यूज: अमृत 2.0 चे काम लवकरच सुरू होणार

    editor deskBy editor deskJanuary 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव शहरात अमृत २.० अंतर्गत मल्लनिस्सारण टप्पा दोनचा विकास आराखडा करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यामुळे मजीप्र व महापालिकेकडून अमृत २.० च्या करारनामा व विकास आराखडा तयार करण्याचे कामाला सुरवात लवकरच सुरू होणार आहे.

    जळगाव शहरात अमृत योजने अंतर्गत मल्लनिस्सारण योजनेचे काम पाच झोन मध्ये दोन टप्यात होणार आहे. पहिल्या टप्यात झोन क्रमांक १ व ४ चे मल्लनिस्सारण वाहिनी २२० किमी टाकण्यात आली असून   ममुराबाद रस्त्यावर ४८ एमलडी क्षमतेचे मल्लनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प तयार केला आहे. महापालिका प्रशासानाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरण विभागाला या योजनचा विकास आरखडा तयार करण्याचे कामाचा निर्णय घेतला. त्यानुसार या योजनेच्या कामाला शासनासकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने करारनामा तसेच डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरवात करण्याच्या सुचना शासानाने मजीप्र व महापालिका प्रशासनाला दिल्या आहे.

    ६०० किमीची वाहिनी
    मल्लनिस्सारण योजने अंतर्गत शहरात पाच झोन ५ झोन तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात १ व ४ या झोन मध्ये काम पूर्ण झाले असून २, ३ व ५ या झोनमध्ये दुसर्‍या टप्याचे कामाचा आरखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ६०० किमीची मलवाहिनीमध्ये २ व ३ या दोन झोनमध्ये ३९० किमीची मलवाहिनी व ६० एमलडी क्षमतेचा एक मलनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प तर ५ क्रमांच्या झोनसाठी २१० किमी मलवाहिनी व ४२ एमलडी क्षमतेचा १ मलनिस्सारण जलशुध्दीकरण प्रकल्प असणार आहे.

    मजीप्राने यंत्रणनेत केली वाढ
    मजीप्राने या योजनेच्या विकास आरखडा तयार रण्याच्या काम हाती घेतले असून यंत्रणा वाढवली असून यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती मजीप्रा अधिक्षक अभियंता  एम. जी. गिरगावकर यांच्या नियंत्रणाखाली तयार करून कार्यकारी अभियंता एस. सी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मनुरे, एम. बी. चौधरी, के. डी. झाडे, श्री. मराठे, श्री. अहिरे, श्री. गाजरे, श्री. बहादुरे व रोहीत सांगडे हे अभियंते हे विकास आराखडा, सर्वेक्षण, डिझाईनचे काम पाहणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव ट्रकचा कहर : मानराज पार्क चौफुलीवर २५ वर्षीय तरुण ठार, महामार्ग सुरक्षा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

    April 27, 2026

    स्वातंत्र्य चौकात खळबळ; कॅन्टींगजवळील स्टोअर रूमला आग !

    April 27, 2026

    गुप्त माहितीनंतर शनिपेठ पोलिसांची धाड; बेकायदेशीर मांस विक्रीचा भंडाफोड !

    April 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.