Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील अघोरी कृत्याचा कळस अजून हि राज्यात पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे अनेक ठिकाणी निष्पाप लोकांचे बळी जात असतांना देखील अशा घटना थांबत नाही. असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. मुलगा होण्यासाठी सासरच्या लाेकांनी सुनेवर प्रत्येक अमावास्येच्या दिवशी घरात आणि स्मशानभूमीत अघोरी पूजा करून मृतदेहाची हाडे आणि राख घरी खाण्यास भाग पाडले. पुण्यातील धायरीत ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी कुटुंबातील ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. जयेश पोकळे, दीर श्रेयस पोकळे, जाऊ ईशा पोकळे, सासरे कृष्णा पोकळे, सासू प्रभावती पोकळे, दीपक जाधव आणि बबिता जाधव (सर्व रा. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  नाशिक शहरातील देवळाली परिसरात गुरुवारी सायंकाळी शिंदे आणि ठाकरे गटात बाचाबाची झाली. या बाचाबाचीनंतर शिंदे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देवळाली गावात आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणते कार्यक्रम घ्यायचे, नियोजन आदींबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ, राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशा सर्वांची याठिकाणी उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षपदावरुन चर्चा सुरु असताना शिंदे आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाला. आणि या वादाचे पुढे गोळीबारात रुपांतर झाले. वाद होताच स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था  राज्यातील बहुचर्चित महामार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. रात्री खासगी बस उलटून झालेल्या भीषण अपघातात एका प्रवाशाच्या मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले. राज्यातील सर्वात वेगवान महामार्ग म्हणून ओळख असलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका सुरू आहेत. नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणारी खासगी बस देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ उलटली. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री बस समृद्धी महामार्गावर मध्यभागी उलटली. त्यानंतर अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात होते. प्रवासी रस्ता ओलांडत असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील  २७ वर्षीय तरुणीचा दोन अनोळखी इसमांनी मोबाईल लांबविला प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेली माहिती अशी  की शहरातील तांबापुरा परिसरातील रहिवासी २७ वर्षीय स्वाती सोमनाथ शिरसाट या दिनांक १९ रोजीच्या रात्री शहरातील महामार्ग क्रमांक सहा जवळील हॉटेल क्रेझी कॉटेज हॉलच्या समोरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या जवळ येत त्यांच्या हातातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल घेत पळ काढला याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम पाटील हे करीत आहे

Read More

जळगाव : प्रतिनिधी  भुसावळ तालुक्एयातील साकेगावातून नकली नोटा बाळगल्याप्रकरणी एका महिलेसह एकाला भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील साकेगावातील एका परिसरात राहणाऱ्या महिलेजवळ तब्बल २१ हजार ९०० रुपयांचे नकली नोटा बाळगणे भोवले आहे. दि १९ रोजी साकेगाव येथे बनावट नोटांचे रॅकेट असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी याची खातरजमा करून पोलीस पथक तयार केले. या पथकाने गुरूवारी रात्री उशीरा साकेगावात छापेमारी केली. यात एका महिलेसह एका पुरुषास अटक करण्यात आली. यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवून बनावट नोटा मिळविल्या. यामध्ये संशयित…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुका बाळासाहेबांची शिवसेना युवती सेनेच्या तालुका प्रमुखपदी साळवा येथील प्रिया कुणाल इंगळे यांची बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ सरिता ललित कोल्हे यांनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जळगाव जिल्हा प्रमुख निलेश पाटील,जळगाव जिल्हा उप प्रमुख तथा प्रवक्ते पी.एम.पाटील सर, जळगाव जिल्हा युवा नेते प्रतापराव पाटील, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, युवा उपजिल्हाधिकारी भैय्या महाजन,जळगाव जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक पप्पू भावे, तालुका प्रमुख शेतकरी सेना विनायक महाजन, उप तालुका प्रमुख संजय चौधरी, मोतीआप्पा पाटील, महिला शहर प्रमुख भारतीताई हेमंत चौधरी,सेनेचे शहर प्रमुख विलास…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोकं वर काढले आहे. नाशिक शहरात सलग दोन दिवस खुनाच्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातपुरच्या काश्मिरे मळे परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेने तर शहरात खळबळच उडाली आहे. खरंम्हणजे मुलगी सारखी घरातून निघून जाते म्हणून वडिलांनी मुलीचा गळा आवळून मारून टाकल्याची बाब ताजी असतांना दोघा मित्रांनी तिसऱ्या मित्राला संपवल्याची बाब समोर आली आहे. नाशिक शहरातील काश्मिरे मळा परिसरात चाळीत राहणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा हा खून झाला होता. मात्र, यामागील कारण काय याबाबत स्पष्टता येत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. पोलीस दलातील प्रमुख अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही अद्यापही आरोपींचा शोध लागलेला नाही. मात्र खुणाचं…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मॉडेल, अभिनेत्री शर्लिन चोप्राने गतवर्षी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीवरून राखी सावंतला गुरुवारी 19 जानेवारी अटक करण्यात आली.अभिनेत्री राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. राखीला आज दुपारी 3 वाजता तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, यात तिचा पती आदिल खान दुर्राणी तिचा पार्टनर आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही या वृत्ताला दुजोरा देत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ती म्हणते की, “आंबोली पोलिसांनी राखी सावंतला एफआयआर 883/2022 संदर्भात अटक केली आहे. काल राखी सावंतचा एबीए 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.” शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या अनेक कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. मुंबई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका बंद कंपनीत गुरुवारी सकाळी ६६ वर्षीय सुरक्षारक्षकाचा मृतदेह जळताना आढळून आला. घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहचले असून घातपात की अपघात असा तपास सुरू आहे. मिळालेली माहिती अशी कि, एमआयडीसी हद्दीत असलेल्या राम नगरात ईश्वर देवराम अहिरे वय-६६ हे परिवारासह वास्तव्यास आहेत. अहिरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करून उदरनिर्वाह करतात. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे…

Read More

औरंगाबाद : प्रतिनिधी  गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद येथील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. तर नुकतीच राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक घटना समोर आली असून, राष्ट्रीय विधी विद्यापीठातील पाचव्या वर्षांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आपल्या एका मित्रासोबत फोनवर बोलताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. युक्ती सुशील बुजाडे (रा. त्रिमूर्तीनगर, जि. चंद्रपूर, ह. मु. मुलींचे वसतिगृह, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युक्ती ही विधी विद्यापीठातील पाचव्या आणि…

Read More