जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाच्या काळात जळगाव जिल्हा दूध संघाची वादग्रस्त ठरलेली नोकर भरती रद्द करण्यात आली आहे. नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा भाजपचे आ.मंगेश चव्हाण यांनी दिली. खडसेंच्या यांच्या नेतृत्वाच्या काळात संघाला तब्ब्ल ९ कोटी ६० लाखांचा तोटा होता. पदभार घेतल्यानंतर एका महिन्यात ९० लाख रूपयांचा नफा मिळविल्याचेही त्यांनी सांगितले. आज २१ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष आमदार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी संघाच्या कामाकाजाचा आढावा तसेच आर्थिक माहिती घेण्यात आली. संचालक मंडळाच्या कार्यकाळात गेल्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर वडगाव गावाजवळ बैलगाडीला भरधाव आलेल्या चारचाकीने धडक दिल्याने बैलगाडी स्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. प्रवीण काशीनाथ पाटील (वय ४०) असे मृताचे शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी प्रवीण पाटील हे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरून बैलगाडीने शेतात जात हाेतेे. रावेरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमपी ०४ सीपी ६३८० या क्रमांकाच्या ह्युंदाईची एक्सेंट कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या कारने बैल गाडीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे शेतकरी प्रवीण पाटील हे बैलगाडीतून फेकले जावून रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार लागून ते जागीच ठार झाले. तसेच बैलगाडी कारच्या धडकेने दामू पाटील यांच्या शेतात फेकली गेल्याने…
धरणगाव : प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना नेहमी मुख्यमंत्री सहायता निधीचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. व गरजू नागरिकांना याचा फायदा होत असल्याने जिल्ह्यातील जनतेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक होत आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धामणगाव येथील चेतश्री प्रवीण सोनवणे मुख्यमंत्री सहाय्याता निधीतून एक लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून त्यांनी पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे आभार मानले असून या कामासाठी पाठपुरावा जितेंद्र गवळी, अनिल सपकाळे , गोकुळ सपकाळे यांनी केले.
जळगाव : प्रतिनिधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक लोकांचे नंबर हे अनोळखी लोकांपर्यत गेलेले असता, ते याच संधीचा फायदा घेत पर्सनल लोन यासह क्रेडीट कार्ड यासारख्या विविध योजना दाखवून फोनवर बोलता बोलता जिल्ह्यातील एका तरुणाचे बँकेतील पैसे गायब झाले आहे. या प्रकरणी तरुणाने जळगाव शहरातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी कि, अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तरूण आपल्या परिवारासह सध्या पुणे येथील हिंजेवाडी येथे वास्तव्यास आहे. त्याला दि.१८ व १९ रोजी ८५३५०२६१५६ या नंबरवरून फोन येत तुम्हाला पर्सनल लोन व क्रेडीट कार्डची ऑफर असल्याचे भासवत त्याचा विश्वास संपादन करीत संशयित आरोपीने त्यांना त्याचा ओटीपीची…
जळगाव : प्रतिनिधी स्वातंत्र्य चौक परिसरातील रहिवासी मीरा जोशी यांच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी शुक्रवारी दोन संशयितांना रामेश्वर कॉलनी येथून बेड्या ठोकल्या आहेत. नीलेश विजयसिंग ऊर्फ प्रवीण पाटील (२१) व अरुण संतोष पद्मे (२६, दोन्ही, रा. रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. स्वातंत्र्य चौकातील रहिवासी मीरा जोशी यांच्या घरामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये चोरट्यांनी ५८ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तुषार जाधव, सचिन चव्हाण, मानसी पाटील यांनी अटक झाली होती. उर्वरित तीन संशयित फरार होते. त्यापैकी नीलेश विजयसिंग ऊर्फ प्रवीण पाटील व अरुण संतोष पद्मे या दोघांना शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसांनी रामेश्वर कॉलनीतून अटक केली…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एरंडोल रस्त्यावरील किकाभाई बोहरी यांच्या बंगल्यासमोर ७३ वर्षीय वृद्धाच्या हातातील सोन्याची अंगठी दोन अनोळखी इसमांनी घेवून फरार झाल्या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील कमल नगरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त छगन सखाराम खैरणार (वय ७३) हे दि १७ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरी येत असतांना एरंडोल रस्त्यावरील किकाभाई बोहरी यांच्या बंगल्यासमोर दोन युवकांनी दुचाकीवर येत यांना पोलीस असल्याची बतावणी करीत त्यांच्या दुचाकीसह त्यांची तपासणी करीत असतांना वृद्ध इसमाला त्यांची अंगठी काढण्यास सांगत त्यांच्या हातातून अंगठी शिताफीने चोरट्यांनी लंपास केली आहे. हि अंगठी ३० हजार रुपये किमतीची आहे. या प्रकरणी…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच चालली आहे. दरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सुरेवानी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत तिन आरोपी सामील होते. या तिघांनी वेळ साधत महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तातडीने तपास करत या तीनही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कापूस वेचण्यासाठी शेतात गेली होती. पीडिता एकटी असल्याचे पाहून नराधम तिच्याकडे गेले, आणि महिलेकडे शरीरसुखाची मागणी करू लागले मात्र महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करत तिघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर देखील हे…
धरणगाव : प्रतिनिधी पाळधी बु येथील शेतकरी दिनांक 19 जानेवारी रोजी रस्त्याबाबत कैफियत घेऊन तहसीलदार धरणगाव नितीनकुमार देवरे यांच्याकडे आले असता तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी सदर रस्त्याचे स्थलनिरीक्षण केले.यात श्री सागर संजय अग्रवाल रा.जळगाव यांनी एन ए केलेल्या क्षेत्रालगत शेतकऱ्यांचा जुना वहिवाट रस्ता बंद केला होता यामुळे शेतकऱ्यांची जा ये बंद झाली होती.सदर बाबीची पाहणी करून तहसीलदार देवरे यांनी सदर शेतकरी अग्रवाल यांना समजावत एका बांधावरील शेतकरी रुपचंद ठाकरे यांचेकडून 4 फूट व सागर अग्रवाल यांचे शेतातून 8 फूट असा 12 फुटाचा रस्ता शेतकऱ्यांसाठी अवघ्या अर्ध्या तासात खुला करून दिला. त्यामुळे शेतकरी बांधांवामध्ये आनंदाचे वातावरण तयार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका मुख्य चौकातील मैदानावर तरुणाने लावलेल्या दुचाकीतून २ मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पिंप्राळा परिसरातील रहिवासी कल्पेश संजय महाजन (वय २३) हा तरूण दि १९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मित्रासोबत असतांना तो दुचाकी शहरातील जी.एस.ग्राऊडवर लावलेली असतांना अनोळखी चोरट्यांनी दुचाकीची डिक्की उघडून त्यातील २ मोबाईल २० हजार किमतीचे लंपास केले आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.रुस्तम तडवी हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील शिंदे गटाच्या नियुक्ती राज्यभर होत असतांना दिसून येत आहे तर नियुक्त झालेला पदाधिकारी शिंदे गट कसा संघटनात्मक होणार याकडे लक्ष देत आहे. तर जळगाव जिल्ह्यातही नुकतीच उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल अशोक परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याची शिंदे गटाची मागील महिन्यात जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली होती त्यानंतर जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील व महिला जिल्हाध्यक्ष सरिता माळी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह विविध गावात शिंदे गटाचे संघटन वाढविण्यासाठी मोठे परिश्रम घेत असतांना उपजिल्हाप्रमुखपदी स्वप्निल अशोक परदेशी यांची नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल स्वप्निल परदेशी यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

