Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  कच्च्या तेलाच्या दरांत सातत्यानं चढ-उतार होत असूनही देशातील पेट्रोल-डिझेल मात्र स्वस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आज कच्चं तेल 80 डॉलरच्या खाली आहे आणि भारतातही चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत 80 डॉलर्सच्या खाली आहे. आज ते प्रति बॅरल 79.72 डॉलर्सच्या दरावर आहे. याशिवाय, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल 74.90 डॉलर आहे आणि अशा स्थितीत ती केवळ 75 डॉलरच्या खाली आहे. दररोज सकाळी जारी होतात नवे दर भारतातील सरकारी तेल कंपन्या भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चुलत भाचीच्या लग्न समारंभाला नाशिक येथून आलेल्या दीपाली चेतन विसपुते यांच्या पर्समधून दागिने व रोकड, असा एकूण ६८ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लांबविला. ही घटना बुधवार, दि. १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये घडली. महिलेचा भाऊ संदीप देवरे याने रविवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने पर्समधून ४ हजार रुपये किमतीची १ ग्रॅम वजनाची सोन्याची मोतीनथ, ७ हजार रुपये किमतीचे २ ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, ११ हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅमचे सोन्याचे झुमके, १४ हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅमच्या सोन्याचे कानातील साखळ्या, ४…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील अंतूल्री येथे एका शेतकरीच्या घरात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अंतुर्ली येथील रहिवासी देविदास सुकदेव पाटील (वय ५५) यांचे मालकीच्या घरातून दि १८ रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलुप तोंडून घरात प्रवेश करीत घरातील २ लाख २० हजार रुपयांचे सोने व चांदीचे दंगीने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनी विजया वसावे हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगावातून जाणाऱ्या ममुराबाद रोडवरील जोगेश्वरी माता मंदिराजवळ भरधाव दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात देविदास दशरथ पाटील (५६, रा. ममुराबाद) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात धडक देणारे दुचाकीस्वार मयुर डिगंबर डांगे (२३) व ऋषी आबा महाले (२१, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे देविदास पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. ते दाणाबाजारात हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते (एमएच. १९. डीजे. ३६०९) दुचाकीने ममुराबादकडे जात होते. तर मयुर डांगे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्हा दूध संघाच्या चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, मात्र या संदर्भात अधिकृत घोषणा रविवार, १८ रोजी होणार आहे. जिल्हा दुध संघाची निवडणूक झाल्यानंतर चेअरमनपदाची निवड १८ आज होत असल्याचे त्या पाश्वभूमीवर शनिवारी नुतन संचालकांची बैठक झाली. बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यत हि बैठक चालली. जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत व मुक्ताई नगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळवलेल्या मंगेश चव्हाण यांचीच चेअरमनपदी निवड होणार असे संकेत होते. त्यानुसार चव्हाण यांच्याच नावावर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाविकास आघाडी सरकारचा मोर्चा सरकार उलथवून टाकण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. यापुढे गावा-गावात केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, आजच्या महामोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना डिसमिस केले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे-फडणीस सरकार तुम्ही फेब्रुवारी महिना पाहणार नाही. या महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकणार नाही. हे सरकार उलथवून टाकू. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व खासदार संजय…

Read More

औरंगाबाद : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चालेली आहे रागाच्या भरात कोण काय करेल हे कुणीही सांगू शकत नाही. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन गावात एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोटच्या लेकाने आपल्याच जन्मदात्या बापाचा जीव घेतला आहे. वडिलांच्या छातीवर बसून केलेल्या बेदम मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू आहे. तर परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती मिळताच आरोपी मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अशरफ खॉन आमीन खॉन (वय 65 वर्षे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, असद अशरफ खॉन (वय 35 वर्षे) असे बापाचा जीव घेणाऱ्या आरोपी मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिडकीन गावातील आझाद चौकात राहणारे अशरफ खॉन यांच्यावर…

Read More

भरपूर लोकांना दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करायला आवडते. पण कॉफीमुळे रिलॅक्स वाटते आणि तणाव कमी होतो. मात्र कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी काही तोटेही आहेत. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीचे अतिसेवन केल्याने किंवा रिकाम्या पोटी कॉफी पिण्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कॉफीमध्ये भरपूर कॅफेन असते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यामुळे एखाद्या व्यक्तीला हाय स्ट्रेस होऊ शकतो. तसेच मूड स्विंग्सही निर्माण होऊ शकतात. कॉफीचा शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि कोणत्या वेळी कॉफी पिणे योग्य ठरते ते जाणून घेऊया. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सवर नकारात्मक परिणाम होतो. सकाळी कॉफी प्यायल्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. कॉफी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील महाविकास आघाडीने आज मुंबईत महामोर्चा काढला होता तो मोर्चा संपताच उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलतांना महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोनश़ॉटलायकदेखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा असफल मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते. परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील भाजप नेते व राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज मुंबईत भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला आता सुरुवात झाली असून आज पहिल्यांदा लाल, भगवं, हिरवं, निळं तुफान धडकलं आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्च्याला सुरुवात झाली आहे. भायखळा येथून हा मोर्चा निघाला आहे. स्वत: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, चिरंजीव आदित्य ठाकरे या मोर्चात सामील झाले असून पायी चालत आझाद मैदानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही पायी चालत निघाले आहेत. या मोर्चात हजारो लोक एकवटले असून बघावं तिकडं लोकच लोक दिसत आहेत.…

Read More