जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील गांधी उद्यानाजवळ दि २१ रोजी बुधवारी दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत गाडीचे इंजिन जळाले असून सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिरसोली येथील बद्रिनाथ जगन्नाथ पाटील हे मित्राची कार (एमएच.०५. एजे. ०६४६) घेऊन बुधवारी जळगावात बँकेच्या काही कामानिमित्त आले होते. दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास काम आटोपून ते शिरसोलीकडे निघाले होते. गांधी उद्यानाजवळून जात असताना अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. पाटील यांनी लागलीच कारच्या बाहेर धाव घेतली आणि इतर नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटांतच मनपाचे अग्निशमन…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर जुन्या वादातून आकाश ऊर्फ धडकन सुरेश सपकाळे (वय ३०, रा. कोळीपेठ) याचा खून केल्याची घटना सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी गोपाल ऊर्फ अण्णा कैलास सैंदाणे (२८, रा. बालाजी मंदिर मागे, जळगाव) याला अटक केली असून त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती त्याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जुन्या वादातून गोपाल सैंदाणे याच्यासह दोन जणांनी आकाश सपकाळे, सागर सुरेश सपकाळे व सागर आनंद सपकाळे यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी जुने बसस्थानक भागात घडली होती. यात आकाश याचा मृत्यू झाला होता. रात्रीच…
राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी मोठी संधी असून या साठी अर्ज मागविले आहे. अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अधिनियम १९६१ अंतर्गत एकूण ३१४ पदे भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात विविध पदांवर नियुक्त्या केल्या जातील. आंध्र प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश (एमपी), महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया १३ डिसेंबरपासून सुरू झाली असून ती २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महत्त्वाच्या तारखा – ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – १३ डिसेंबर २०२२ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०२२ वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २०…
छत्रपती शिवाजीनगरातील विविध समस्येसाठी आज जळगाव शहर महानगर पालिकेच्या परिसरात आज येथील नागरिक एकत्र येत नगरसेवकासह प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी त्यांच्या समस्येचे निवेदन सुद्धा मनपा प्रशासनाला दिले आहे. यावेळी नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. या ठिकाणी महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील छत्रपती शिवाजीनगर टी आकाराचा पूल तातडीने पूर्ण करावा, प्रस्तावित ब्राह्मण सभा समोरील बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे., छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम तातडीने पूर्ण करावे. , संपूर्ण छत्रपती शिवाजी नगर मधील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढणे बाबत , शिवाजीनगर मधील रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करा यासह छ. शिवाजीनगर मध्ये विविध समस्यांनी…
पुणे : वृत्तसंस्था क्षुल्लक कारणावरून काहीवेळा मोठा गुन्हा घडत असतो. असाच काहीसा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावर असलेल्या फुलपरी स्वीट मॉलमध्ये तरुणाने गोळीबार केला आहे. गोळीबार करण्यामागील कारणही गमतीशीर आहे. एक किलो काजू कतली फुकट दिली नाही म्हणून गोळीबार केल्याची बाब समोर आली आहे. सोमवारी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काजू कतलीसाठी गोळीबार केल्यानं पुण्यात खळबळ उडाली सिंहगड पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. वडगाव बुद्रुक परिसरात ही घटना घडल्याने या घटनेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. यामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळातील नेत्यांनी मोठी नोकर भरती करण्याची घोषणा केलीय. आगामी काळात लवकरच डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागा टीएसच्या माध्यमातून भरल्या जातील, अशी घोषणा बुधवारी आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय. विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला विविध मुद्द्यावरून घेरण्याची तयारी सुरू केलीय. विशेषतः नागपूरमधील ‘एनआयटी’ भूखंड वाटप प्रकरण येत्या काळात गाजण्याची शक्यताय. गिरीश महाजन यांनी आज नोकर भरतीची मोठी घोषणा केली. त्यात डॉक्टरांची तीनशे पदे भरली जाणार आहेत. शिवाय २८ टक्के पदे रिक्त आहेत. एमपीएससी मधून पदभरतीस वेळ लागतो. त्यामुळे ही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात पुन्हा एकदा शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली आहे. त्यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका करीत असतांना कुत्रा असा शब्द वापरला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी हि टीका केली आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाच्या प्रश्नावरुन संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बोम्मई महाराष्ट्राच्या कानफाटात वाजवतात आणि आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात, अशी टीका आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केली. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना संतोष बांगरांची जीभ घसरली आहे. “संजय राऊत म्हणजे पागल, पिसाळलेला कुत्रा आहे. संजय राऊतांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका ठिकाणी कार्यरत असलेल्या महिलेला एका कर्मचारीने फेसबुकवर अश्लील संदेश पाठविल्या प्रकरणी त्या कर्मचारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरातील रहिवासी असलेल्या एका महिला कर्मचारी दि १९ रोजी पासून शहरातील डेपो आगारातील सहायक यात्रिक विजय पाटील(रा.खोटे नगर, जळगाव) याने फेसबुकवर महिलेला अशील संदेश पाठवून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली, या प्रकरणी महिलेने जिल्हा पेठ पोलीस स्थानक गाठत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढी तपास पोना.राजेश पदमर हे करीत आहेत.
औरंगाबाद : वृत्तसंस्था औरंगाबाद शहराजवळ असलेल्या वाळूज परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील तीन दिवसांत अत्याचाराच्या दोन घटना घडल्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घडलेल्या या घडनेमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत एका दहावीत शिकणाऱ्या मुलीला ढाब्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला तर, दुसऱ्या मुलीवर तिच्या घराच्या मागच्या बाजूला नेऊन अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र, तीन दिवसात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने शहरात पोलिसांचा वचक आहे की नाही असा प्रश्न पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, आरोपींना कठोरातील कठोर…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मुक्ताईनगरहून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या बसवर समोरून भरधाव वेगाने आलेली रिक्षा आदळून चार जण जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी सात ते सव्वासात वाजेच्या दरम्यान घडली. एमएच २० बीएल १६०३ या क्रमांकाची मुक्ताईनगर येथील बस सायंकाळी पावणे सातच्या दरम्यान जळगाव जामोदकडे निघाली. बसमध्ये गर्दी होती. स्मशानभूमीजवळ बस असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाचा अंदाज घेऊन चालकाने बस रस्त्याच्या खाली उतरवून उभी केली. परंतु तरीसुद्धा रिक्षा क्रमांक (एमपी १२ आर ११५०) ही बसच्या समोरील बाजूस मधोमध धडकली. अपघातात रिक्षा चालक मिथून पंडित तायडे (रा. शहापूर, मध्यप्रदेश) बसमधील प्रवासी अंजनाबाई कांडेलकर (५०) तसेच सदर महिलेचा पती यांनाही…

