Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात किरकोळ वादातून दोन जणांनी एकाला चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. आकाश सुरेश सपकाळे उर्फ धडकन (वय-३०) रा. कोळी पेठ, जैनाबाद जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्या तरुणांनी याच्यावर हल्ला केले ते घटनास्थळाहून फरार झाले होते. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.दीपक जाधव यांनी मयत घोषित केले. यामध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. शहरातील जुने बसस्थानक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणमारी होऊन धारदार शस्त्राने…

Read More

धरणगाव  : प्रतिनिधी जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्राम पंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे मंगळवारी १७ ग्राम पंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा ६ अश्या १९ पैकी १६ ग्राम पंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बाळासाहेबांची शिवसेनेचे गावकारभारी निवडून आणण्यात जवळपास १०० % यश प्राप्त करण्यास यश आले आहे. १९ ग्राम पंचायतीच्या निवडणुकी १६ ग्राम पंचायतीमध्ये आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच विराजमान होणार आहेत. सरपंचासोबतच धरणगाव…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यात रविवारी झालेल्या मतदानाचे आज मंगळवारी मतदान मोजणी सुरु आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मतमोजणी सुरु असतांना धरणगाव तालुक्यातील बोरगाव खु. या ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळविले आहे. तालुक्यातील बोरगाव येथे झालेल्या नुकत्याच निवडणुकीत शिंदे गटाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून अर्चना दिनकर पाटील यांनी बाजी मारली आहे. मतदारांनी या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडून दिल्याबदल शिंदे गटाचे पदाधिकारी पी.एम.पाटीलसर, गजानन नाना, पप्पूभाऊ भावे, तोसीफ पटेल, विलास महाजन, रवी महाजन, बालू जाधव, बुटा पाटील, वाल्मीक पाटील, पवन महाजन, भैयाभाऊ महाजन, कमलेश बोरसे, विजू महाजन, शैलेश महाजन, पापाशेठ वाघरे, सोनू महाजन, हेमू चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी घरी जावून सत्कार करीत जल्लोष केला.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यात तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. आता धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजीराजेंनी महाराष्ट्रात वेळोवेळी आंदोलनं केली. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य संघटनेतून राजकीय आखाड्यात नशीब आजमावून पाहण्याची तयारी सुरू केलीये. या स्वराज्य संघटनेनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारलीये. ग्रामपंचायत निवडणुकीत स्वराज्य संघटनेनं विजय मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाच्या माध्यमातून स्वराज्य संघटना जोरदार कामगिरी करेल, असा विश्वास स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केलाय. स्वराज्य संघटनेची ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी घोडदौड सुरू आहे. धाराशिव येथील सरपंचासह 13 सदस्य निवडून आले…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील 34 जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा निकाल आज लागत आहे. त्यामध्ये एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं.राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फडकतो. कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांबरोबर नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केलाय.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका महाविद्यालय परिसरात एका बावीस वर्षे तरुणास चाकूचा धाक दाखवीत म्हणजे जिवंत मारण्याची धमकी देत एकाने पाच हजार रुपयाची मागणी केली याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की शहरातील एका महाविद्यालय परिसरात धुळे जिल्ह्यातील धाडरी येथील जयदीप राजेंद्र कच्छव (वय २२) हे दिनांक 19 रोजी संध्याकाळच्या सुमारास बाहेर गेले असता त्यांना संशयित आरोपी सुनील प्रकाश खोंडे याने या आधी तीन महिन्यापूर्वी १ हजार ५०० रुपये चाकूचा धाक दाखवीत डिस्कविले होते. तर 19 रोजी जयदीप ला शिवीगाळ करीत जिवंत मारण्याची धमकी देत ३ हजार ५०० रुपये घेतले. असे एकूण ५ हजार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  बऱ्हाणपूर जिल्ह्यातील शहापूर येथील २५ वर्षीय तरुणाला पती-पत्नीने आपण बहीण-भाऊ असल्याचे भासविले आणि आपली बहीण अविवाहित असल्याचे सांगत एक लाख रुपये घेऊन स्वतःच्या पत्नीचे त्या तरुणाशी शुक्रवारी लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.नोटरी पद्धतीने हा विवाह झाल्यानंतर नवविवाहिता पळून जात असताना पकडली गेली, त्यावेळी या फसवणुकीच्या प्रकाराचा भंडाफोड झाला. याप्रकरणी शहापूर पोलिसांत शनिवारी दाखल झालेला गुन्हा नंतर भुसावळ शहर पोलिसांत रविवारी वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी निकिता ऊर्फ जया रमेश भाई सोलंकी (वय ३२, कानोले, दर्यापूर) आणि तिचा पती विठ्ठल काकडे (वय २८) यांना अटक करण्यात आली आहे. १६ डिसेंबर रोजी दुपारी २:३०…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय महिलेचा विनयभंग एका ४० वर्षीय इसमाने केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय महिला नातेवाईकाच्या लग्नात जेवणासाठी जात असतांना एका ४० वर्षीय संशयित आरोपी शांताराम नागो पाटील याने दि १८ रोजी दुपारच्या सुमारास महिलेचा हात पकडीत जमिनीवर पाडीत दारूच्या नशेत शिवीगाळ केल्या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना प्रवीण पाटील हे करीत आहेत.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी कौटुंबिक वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांत ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष देवीदास महाले (३६, रा. सातपूर, नाशिक) व पत्नी यांच्यात घटस्फोटाच्या कारणावरून वाद आहे. दि. १८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील उड्डाणपुलाजवळ आशिष यांना सासरकडील लोकांनी तसेच दोन महिलांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर रस्त्यात अडवून अश्लील शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. त्यातील एकाने त्याच्या पिशवीतून धारदार शस्त्र काढून आशिषच्या मानेवर दुखापत केली. तर अन्य एकाने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने दोक्यावर मारहाण केली यावेळी त्यांच्या खिशातील ३३ हजार ७०० रुपये व हाताच्या बोटात असलेली सोन्याची अंगठी व मोबाइल काढून घेण्यात…

Read More

राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बाब समोर आली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अधिकृत वेबसाइट colrec.uod.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 80 पदे भरली जातील. एकूण पदे- 80 वाणिज्य – 57 पदे अर्थशास्त्र – १५ पदे इंग्रजी – 1 पोस्ट पर्यावरण विज्ञान – 2 पदे गणित – ३ पदे राज्यशास्त्र – १ पद कॉम्प्युटर सायन्स – १ पद अर्ज शुल्क सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून…

Read More