लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बांभोरी येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारण आणि जुन्या वादाची किनार यातून झालेल्या चाकू भोसकून तरूणाला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणाचा आज पहाटे मृत्यू झालाय. या गुन्ह्यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील नितीन साहेबराव बाविस्कर याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून जुन्या वादाची किनार यातून धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अतुल विजय कोळी (नन्नवरे) (वय-२५) या तरूणावर गावातील अजय विनोद नन्नवरे रा. बांभोरी ता. धरणगाव याने पोटात चाकू भोसकून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना २७ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली होती.…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शिवाजी नगरातील भारत नगर येथील कोमल ज्ञानेश्वर कांबळे (वय-२०) रा. भारत नगर, शिवाजी नगर परिसर जळगाव या तरूणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, कोमल कांबळे ती युवती आपल्या आई, वडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. वडील खासगी लक्झरी चालवून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी कुणीही नसतांना कोमल हिने राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या लक्षात…
तालुका पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । अनैतिक संबंधातून शहरातील एका भागातील राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारा मयत ३५ वर्षीय तरूण आपल्या आईवडील, पत्नी व भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. ममुराबाद रोडवर मयत तरूणाचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आढळून आला होता. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गळा आवळून खून करण्यात आल्याचा अहवाल यांनी दिला. त्यानुसार जळगाव…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ -येथील बाजारपेठ पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वांजोळा रोड भागात काही तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) हे दोन्ही भाऊ व विजय संजय निकम (रा.चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक करण्यात आली. तिघांची अंगझडती घेतली असता १५ हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तूल, ३० हजारांची दुचाकी (एमएच.१९-डीसी.८८६०) जप्त करण्यात आली. पोलिस नाईक नीलेश चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश गोंटला, गणेश…
जळगाव (प्रतिनिधी ) -तालुक्यातील शिरसोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आज सकाळी १०:३० ते ११ वाजेच्या दरम्यान ३५ ते ४० वर्षीय इसम पडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना आज येथे उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगाव पाचोरा दरम्यान शिरसोली रेल्वे स्टेशन जवळ खांबा क्रमांक ४०९/२४ ते २६ दरम्यान गोवा एक्सप्रेसमधून पडल्याने अनोळखी ३५ ते ४० वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.स्टेशन प्रबंधक योगेश खांबे यांनी शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना खबर दिली . त्यानुसार पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिल्यावरून तात्काळ पोलिसांनी धाव घेत रुग्णवाहिकेतून अज्ञात इसमाचा…
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय पथकाला यश जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल असलेल्या ४० वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क १५ किलो वजनाचा गोळा काढण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी यशस्वी उपचार करण्याऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी अभिनंदन केले आहे. यासंदर्भात माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील ४० वर्षीय कमलबाई रमेश भिल या महिलेला पोटात दुखत होते. तसेच, वेदना असह्य होत होत्या. नातेवाईकांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात डॉक्टरांनी तपासणी केली असता, तिच्या पोटात अनावश्यक मांसाचा गोळा वाढत असलेला दिसून…
धुळे प्रतिनिधी । मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर झालेल्या विचित्र अपघातात केमिकलची वाहतूक करणाऱ्या टँकरला ट्रकने मागून ठोकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात स्फोट झाल्याने संपूर्ण टँकरने पेट घेतला. या अपघातात टँकर चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी १ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुमारास मध्यप्रदेशकडून शिरपूरच्या दिशेने केमिकलने भरलेला टँकर जात होता. यावेळी भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकर रस्त्यावरच उलटताच टँकरचा स्फोट झाला. टँकरला भीषण आग लागल्यामुळे आगीचे लोळ बाहेर येत होते. या दुर्घटनेत टँकर जळून खाक झाले आहे. टँकरचा चालक टँकरमध्ये अडकल्याने या…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा मुंबई वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात समझोता झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवा यांनी सांगितले की, राज्यपालांनी सही केली आहे. लॉ सेक्रेटरी यांना त्यांच्याकडे पाठवले होते. भुजबळांनीही त्यांची भेट घेतली. त्यांनाही वेळ दिली.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमाक १२ मधील रोटरी भवन मायादेवी नगर येथे कचरा मुक्त कॉलनी या उपक्रमांतर्गत जळगाव शहर नगरपालिकेच्यावतीने नागरीकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांच्या निर्देशानुसार परिसरातील २८ कॉलनी कचरामुक्त घोषित करण्यात आल्यात. त्या अनुषंगाने कार्यक्रमात नागरीकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जयश्री महाजन महापौर, नगरसेविका ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी, उपायुक्त शाम गोसावी, रोटरी वेस्टचे पदाधिकारी शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य निरीक्षक उल्हास इंगळे, प्रमुख केतन हातागळे व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
जळगाव (प्रतिनिधी) : येथील कानळदा रोडवरील रहिवासी तथा धनाजी नाना चौधरी संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी जितेंद्र बाबूलाल धनगर हा समाजकार्य या विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या बद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे. जितेंद्र धनगर हा मूळ चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी आहे. पहिल्याच प्रयत्नात तो सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक वृंदासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस.कट्यारे, शिक्षक बी.यु. जाधव, प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तर आई-वडील, पत्नी, इंद्रजीत धनगर, चेतन चौधरी यांचे सहकार्य लाभले. त्याच्या यशाबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, डॉ. अनिल…

