जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारातील नाल्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी तालुका पोलीसांनी उद्ध्वस्त करून सुमारे ७० हजाराचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले आहे. तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा गावाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात काहीजण बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अशोक महाले, तुषार जोशी, संजय भालेराव यांनी असे पथक तयार करून शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे हा…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा बाजार पट्ट्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या एकाची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सुकदेव धनगर (वय-४१) रा. वाटीकाश्रम पाठीमागे जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथील बुधवारचा बाजार असल्याने ९ फेब्रुवारी रोजी रामदास धनगर हे मोटारसायकल (एमएच १९ बीएस २०६२) ने सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पिंप्राळ्यातील सिध्दीविनायक मंदीराजवळ त्यांची दुचाकी पार्क करून लावली. बाजार करून सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून मोटारसायकल मिळाली नाही. अखेर शनिवारी…
एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरापासून हाकेच्या अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह एक महिला जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १२ रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहर पासून जवळ असलेल्या हॉटेल कृष्णा जवळ कार (एमएच १९ सीव्ही ७७१७) आणि कंटेनर (एमएच ४६ बीबी ८५३२) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार चालक प्रकाशचंद राजमलजी बागरेचा रा. दुर्वाकुर पार्क, वाघुळदे नगर जळगाव यांच्यासह एक महिला कमलबाई जैन (नाव माहित नाही) जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । यावल तालुक्यातील वाढत्या घरफोड्या आणि शेती अवजारांच्या चोरीचे प्रमाणे वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन दिले. त्यावर लवकरात तालुक्यात चोरीच्या घटनांवर बंदोबस्त लावणार असल्याचे अश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले. यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात मागील काही दिवसांपासून घरफोडीचे तसेच शेतातील शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढ झालेली आहे. सातत्याने वाढ होत असलेल्या शेती साहीत्य चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना थांबविण्यासाठी यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी, अशी मागणी शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी…
पाचोरा प्रतिनिधी । तरूणांनी छेड काढल्याने तसेच विनयभंग केल्याचा संताप झाल्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने फवारणीचे औषध प्राशन करत स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेतल्याची घटना समोर आली आहे. मुलीला पहुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार असे की, ८ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी तिच्या काकाच्या घरी जात होती. यादरम्यान दुचाकीवरून तरुण आला त्याने अल्पवयीन मुलीची छेड काढली तसेच खांद्यावरील अोढुन काही अंतर पुढे जाऊन ओढणी जमिनीवर फेकून दिले. तरुणाने छेड काढल्याच्या याप्रकाराचा अल्पवयीन मुलीला मनस्ताप झाला. त्यातून तिने दुसऱ्या दिवशी आईवडील शेतात कामाला गेले असताना पिकांचे फवारणीचे औषध प्राशन केले व स्वत च्या हातावर ब्लेड मारून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा शेतशिवारातील ७ एकरातील ऊस जळून खाक झाल्यामुळे ३ शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. आगीत साधारण १० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ऊसतोडणीचा हंगाम चालू होण्याची लगबग असतांनाच या संकटामुळे पुन्हा परिसरातील शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, महावितरणचे धनंजय धांडे, कविता सोनवणे तर तलाठी बाळासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. शॉर्ट सर्किटमुळं आग लागून १० एकर ऊस जळाल्याची घटना वेल्हाळा या गावात घडली आहे. ऊसाच्या तोडणीची लगबग सुरू झालेली असतानाच आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास आणि आशाबाई श्रीधर पाटील (गट ११२), रेशमी भूषण राणे (गट ११३), मधुकर चौधरी (गट ११४) यांच्या…
जळगाव प्रतिनिधी । उत्तर भारतीयांना मारहाणप्रकरणी २००८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मनसेचे राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणाच्या खटल्याचे जिल्हा न्यायालयात काम काज झाले. यात राज ठाकरेंसह इतर चार जणांना निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, याच्या निषेधार्थ उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी मनसेने आंदोलन उपसले होते. मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ या अटकेचे पडसाद २१ ऑक्टोबर २००८ रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. जळगावात मनसे पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून बंद…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव महापालिकेतील भाजपाचे चार नगरसेवक यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश प्रवेश केला आहे. सभागृह नेते ललित कोल्हे यांनी खेळलेली खेळी यशस्वी झाली आहे. शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पाळधी येथे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवक प्रवीण कोल्हे, प्रिया जोहरे, मीनाक्षी पाटील, मीना सपकाळे यांनी शिवबंधन बांधले आहे. जळगाव महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून पक्ष प्रवेशावरून अनेक ठिकाणी राजकारण सुरू आहे. महापौर निवडीप्रसंगी भाजपचे २८ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते. शिवसेना सत्तेत आल्यानंतर भाजपने खेळी करीत १० बंडखोरांना आपल्याकडे…
हैदराबाद । हैदराबाद शहरातील एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. याला विकृतीही म्हणता येईल, शहरातील एका भागात भटक्या कुत्र्यावर बलात्कार (Street Dog Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमुळे समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्राणीमात्रांवर भूतदया दाखवणं ही आपली संस्कृती. तहान-भूक लागलेल्या मुक्या जीवांना खाऊ-पिऊ घालण्याचं काम अनेक जण करताना दिसतात. मात्र एका गृहस्थाने या मुक्या प्राण्यालाच आपल्या विकृतीची शिकार केल्याचा संतापजनक प्रकार पाहायला मिळत आहे इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ही घटना हैदराबादच्या नल्लाकुंटा पोलीस स्टेशन हद्दीत घडली. या घृणास्पद प्रकाराबद्दल एका प्राणीप्रेमीने त्या व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये आरोपीला रस्त्यावरील कुत्र्यावर बलात्कार…
धरणगाव प्रतिनिधी: शहरातील जेष्ठ सामाजिक नेते तथा माजी नगरसेवक अकिल शेठ मोमीन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी धरणगावकरांच्या वतीने आज रोजी पाताळनगरी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वसीम शेख सर यांनी केले. तत्पुर्वी दिवंगत अकिल शेठ मोमीन यांच्या प्रतिमे समोर पुष्पांजली वाहण्यात आली.याप्रसंगी अभिवादनपर मनोगत काँग्रेसचे जेष्ठ नेते डी जी पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, जेष्ठ पत्रकार कडू महाजन, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, माजी नगरसेवक दिपक वाघमारे, लक्ष्मणराव पाटील, बाबा शेठ भाटिया, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ आदी मान्यवरांनी दिवंगत अकिल शेठ यांच्या जीवनातील कार्य व आठवणींना उजाळा…

