Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । यावल शहरातील बुरुज चौकात धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बुरुज चौकात रविवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एक तरुण हातात लोखंडी धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार यावल पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी देवानंद बाळू सपकाळे (वय ३५) रा. किल्ला झोपडपट्टी शिवाजी नगर, यावल याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ असलेला धारदार चाकू हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांची या गुरुवारी डबल सेंचुरी पार केली.  आठव्या गुरुवारी देखील 25 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करून 200 चा आकडा पार केला. रुग्णालयातर्फे सवलतीच्या दरात या शस्त्रक्रिया केल्या जात असून, अवघ्या 2500  रुपयात मोतीबिंदू, तर अवघ्या 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे.गावागावात या अभियानाची माहिती झाली असून शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी करून घेण्यासाठी रुग्णांचा प्रचंड ओघ रुग्णालयात दररोज सुरू आहे. येथे अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांनी आपली आर्थिक बचत करण्यासाठी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनाने…

Read More

रायसोनी महाविध्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न जळगाव प्रतिनिधी: शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. प्राध्यापक-पालक सहविचार सभेचे आयोजन करीत असताना विद्यार्थी हित आणि महाविद्यालयाची वाटचाल याचा विचार करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांची उपस्थिती होती.डॉ. प्रिती अग्रवाल पुढे म्हणाले कि, कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण झाल्या विद्यार्थी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील भालोद येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून राहत्या घरातील वरच्या माजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ललित जनार्दन परतणे (वय-४५) रा. चिखली दरवाजाजवळ, भालोद ता.यावल जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फैजपूर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ललित परतणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. या आजारामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता. त्यामुळे रविवार १३ फेब्रुवारी रोजी ललित परतने यांनी राहत्या घरात असलेल्या पहिल्या मजल्यावर दोरीने छताच्या हुकाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या…

Read More

जळगाव, प्रतिनिधी : येथील इंनरव्हील क्लब ऑफ जळगांव ईस्ट आणि जळगाव पीपल्स बँकेच्या बचत गट विभागातर्फे महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षा चालविण्यासंदर्भात तसेच ऑटोरिक्षा रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव पीपल्स कोऑप बँक व इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, बचत बटातील महिलांना पिंक ऑटो रिक्षाबाबत माहिती व उपयुक्तता सांगण्यासाठी पिंक ऑटो जनजागृती कार्यक्रम बँकेचे मुख्य कार्यालय, दाणा बाजार येथे घेण्यात आला. प्रसंगी अतुल ऑटोचे डिलर विद्याधर नेमाणे, पिंक ऑटो ड्रायव्हर जयश्री शिंदे, रेखा महाजन, इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा निता परमार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी…

Read More

जळगाव प्रतिनिधी : शहरातील खंडेरावनगर रेल्वे बोगद्याजवळ रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. आशाबाबानगर रेल्वे बोगदा ते खंडेरावनगर रेल्वे बोगद्यादरम्यान रेल्वेरुळावर अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रामानंदनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल अजित पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असे आहे मयत महिलेचे वर्णनमयत महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष गडद निळ्या रंगाचा टॉप, त्यावर सफेद रंगाची बारीक डिझाइन सफेद रंगाची लॅगीज पँट असे महिलेचे वर्णन…

Read More

सातारात वृत्तसेवा : भाजपाने महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा, असा टोला शंभुराज देसाई यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचीह खिल्ली उडविली आहे. गेल्या दोन वर्षापासून ठाकरे सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपकडून काढण्यात आले आहेत. भाजपने काही दिवसांपूर्वीच आता पुन्हा नवा मुहूर्त काढला. ठाकरे सरकार हे १० मार्चनंतर पडेल असे भाजप नेत्यांकडून सागण्यात येत आहे. मात्र चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि येथून पुढेही हलणार नसल्याचा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच सेना आमदारांनी निधी…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरा शिवारात गिरणा नदीच्या पाठात एक अनोळखी तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील अनोरा शिवारात एका रेल्वे रुळाजवळ असलेल्या गिरणा नदीच्या पाटात १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत आनोरा गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब संभाजी पाटील यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पाण्याबाहेर काढून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात…

Read More

ठाणे वृत्तसंस्था । ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचो ओबीसी मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, तुम्हाला चूप बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडा. आपल्यालाही ही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असं सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. कुत्र्यांची गणना होते. मात्र, ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे बैठक इंदिरा गांधी कन्या विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावयाची असून त्या संदर्भात नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचा अध्यक्षस्थानी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी.एम. पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे नेते संजय महाजन, ॲड. वसंतराव भोलाणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, काँग्रेसचे तालुका युवा प्रमुख चंदन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पी.एम पाटील यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार व कोरोनाचे काटेकोर पालन करून आपल्याला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करायची असून सर्वांनी शांततेने उत्सव समिती पार…

Read More