Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरूणाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ
    क्राईम

    अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरूणाचा खून करणाऱ्या दोन्ही संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 2, 2022Updated:February 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तालुका पोलीसात गुन्हा दाखल

    जळगाव प्रतिनिधी । अनैतिक संबंधातून शहरातील एका भागातील राहणाऱ्या ३५ वर्षीय तरूणाचा ममुराबाद रोडवर गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारा मयत ३५ वर्षीय तरूण आपल्या आईवडील, पत्नी व भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. ममुराबाद रोडवर मयत तरूणाचा मृतदेह २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता आढळून आला होता. पोलीसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गळा आवळून खून करण्यात आल्याचा अहवाल यांनी दिला. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक करण्यात आली होती. यातील मुख्य संशयित आरोपी आणि मयताची पत्नी यांचे गेल्या १ वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली असून त्यातूनच हा खून करण्यात आला आहे. दरम्यान, अनैतिक संबंधासाठी खून केल्याची कबुली मुख्य संशयित आरोपी याने दिली आहे. मुख्य संशयित आरोपी आणि मयताची पत्नी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. शुक्रवारी २८ जानेवारी रोजी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले होते. दोन्ही संशयित आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने बुधवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी जळगाव न्यायालयात हजर केले असता गुरूवार ३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.