जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सभासद मोहिम अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी यांनी किमान १०० हून अधिक सभासद नोंद करावी असे आवाहन सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. जयदेव गायकवाड यांच्या आदेशान्वये सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रत्येक १०० सभासन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सभासद नोंदणीसाठी घरापर्यंत पोहचा असे आवाहन सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
नऊ महिन्याचं बाळ पोटात असतांना दिला पेपर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर यांच्या दोन्ही मुलींनी डीएडच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. नांद्रा येथील विनोद आप्पा बाविस्कर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. विनोद बाविस्कर यांच्या मोठ्या मुलींने म्हणजेच दिपाली बाविस्कर हिने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विदयालयात डी.एडला प्रवेश घेतला होता तर, लहान मुलगी रुपाली बाविस्कर हिने म्हसावद येथील शिक्षण शास्त्र विद्यालयात डी.एडला प्रवेश घेतला होता. दोघी बहिनींनी प्रथम वर्षाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले होते.…
सलग सातव्या गुरुवारी पंचवीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने 175 जणांना धुसर दृष्टीपासून मुक्त करून नव्या प्रकाशवाटा दाखवल्या.रुग्णालयातर्फे जानेवारी महिन्यापासून ना नफा ना तोटा तत्वावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात असून, दर गुरुवारी रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको (बिना टाक्याची) शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या गुरुवारी देखील 25 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी 75 टक्के रुग्णांनी फेको शस्त्रक्रियेला पसंती दिल्याचे दिसून आले. रुग्णालयात शस्त्रक्रियांचा हा सातवा आठवडाही हाउसफुल ठरला. गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता देवकर रुग्णालयाने ना नफा ना तोटा तत्वावर…
जळगाव प्रतिनिधी । जळगावात रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. मोसिन खान उर्फ शेमड्या नूरखान पठाण वय-२८, शाहरुख शेख रफीक वय-२० दोघ रा. पिंप्राळा हुडको, समाधान सुमेरसिंग पाटील वय-३३ रा. खंडेराव नगर अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शहरातील तांबापुर परिसरातील शेख जलील शेख ईब्राहीम (वय-७२) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले होते. यावेळी आलेल्या एका रिक्षात शेख जलील बसले. यावेळी रिक्षात पुर्वीच बसलेल्या तीन जणांनी शेख जलील यांच्या खिशातील १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यात उतरवून दिले. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बांभोरी शिवारातील एका टपरीत घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजार करणाऱ्या एकावर पाळधी पोलीसांनी छापा टाकून ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाळधी ठाण्यात एकावर करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या खुबचंद पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या टपरीत घरगुती गॅसचा रिक्षासाठी काळ्याबाजारात विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून घरगुती गॅसचे १७ सिलेंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा असा एकुण ५२ हजार ५००…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री खु येथून जवळच असलेल्या बोरखेडा येथील तरूणाचा विहिरीत तोल जावून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर माहिती अशी की, बोरखेडा येथील रहिवासी असलेले निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील सेवानिवृत्त शिक्षक के. पी. पाटील यांचा एकुलता एक मुलगा शुभम कांतीलाल पाटील (वय-२८) हा ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेला होता . तो नेहमीच आपल्या शेतात पीक पाहणीसाठी फेरफटका मारायला जात असे. परंतु दुपारी ४ वाजेपर्यंत मुलगा घरी न आल्याने घरच्या मंडळीनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी शुभम हा विहिरीत पडल्याचे निदर्शनास…
१२ लाखांचा मुद्देमाल जप्त; वेगवेगळे ४२ गुन्हे दाखललाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्य उत्पादन शुल्क विभागाने भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि रावेर या तालुक्यांमध्ये छापेमारी करून सुमारे १२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर जिल्ह्यात वेगवेगळे एकुण ४२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक सुजित कपाटे यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल आणि रावेर तालुक्यात बेकायदेशीररित्या अवैध ढाबे, हातभट्टी दारू निर्मिती व विक्री केंद्र, हातभट्टी दारूची वाहतूक आणि बनावट मद्य निर्मिती होत असल्याच्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भुसावळ विभागाने धडक कारवाई केली आहे. यामध्ये ४ हजार २०० लिटर रसायन, ६५३ लिटर…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चोरगाव येथील दिव्यांग अशोक बुधा सोनवणे या निराधार तरूणाच्या मदतीसाठी धरणगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यामाध्यमातून किरणा साहित्याचे कीट प्रदान करण्यात आले. याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील ७५ टक्के दिव्यांग असलेले अशोक बुधा सोनवणे हे पूर्णतः निराधार व दिव्यांग आहेत. अशोककडे उदरनिर्वाहासाठी कोणतेच साधन नाहीत. किवा कोणता व्यवसाय करू शकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. त्याचे दोघे पाय दिव्यांग झाले असल्याने ते बसून राहतात, त्यांना ऊठ-बस देखील करता येत नाही. त्यांचे चुलत भाऊ प्रकाश सोनवणे हे त्यांना लहान बाळाला कडेवर घ्यावे त्या पद्धतीने कडेवर घेऊन आज गुरूवार ३ फेब्रुवारी रोजी दुपारी धरणगाव तहसील कार्यालयात…
जळगाव प्रतिनिधी । आशा व गट प्रवर्तक यांच्या थकीत मानधन, मोबदला आणि प्रलंबित मागण्यांसाठी सीटूच्या वतीने महापालिका समोर निदर्शने करण्यात आली व विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सीटूच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिका अंतर्गत आरोग्य विभागातील दवाखान्यात कोरोना महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची घरोघरी जावून सेवा करण्याचे काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गट प्रवर्तक यांना नोव्हेंबर पासून सुरू केलेला जोखीम भत्ता मार्च नंतर बंद करून नये, आरोग्य खात्याच्या बजेटमध्ये आरोग्य खात्यावरील खर्चात वाढ करावी, आशांना कायम योजना कर्मचारी म्हणून कायम सेवेत घेण्यात यावे, कोरोना काळात मयत झालेल्या आशांना ५० लाखांची आर्थीक मदत करावी, आशा व…
प्रतिनिधी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रविण पाटील। तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील प्राथमिक शाळेत पहिले ते चौथीच्या वर्गासाठी तीन शिक्षक मंजूर आहे. परंतू प्रत्यक्षात एका शिक्षकावर ८८ विद्यार्थ्यांची शाळा चालविली जात असल्याने विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक मिळेल का शिक्षक ! अशी अवस्था येथील शाळेची झाली आहे. एकीकडे शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. त्याच डिजीटलचे शिक्षण देण्यावर अधिक भर दिला जात आहे. असे असतांना दुसरी कडे जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे अनेक शाळांमध्ये मोजक्या कमी शिक्षकांवर चालविली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथील प्राथमिक शाळेत एकुण पहिली ते चौथी असे चार वर्ग आहे. चार वर्गांसाठी…

