Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

पाचोरा प्रतिनिधी । मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने निघालेल्या शेतकऱ्याला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल शांताराम चौधरी (वय – ४६) असे मयताचे नाव असून अनिल चौधरी हे मुलीची डिलेव्हरी झालेली असल्याने तिला जळगांव येथे भेटण्यासाठी जात असतांना कुऱ्हाड बु” ते म्हसास दुचाकीने जात असतांना बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यावेळी गंभीर जखमी झाले होते. त्यांना गावातील काही नागरिकांनी उपचारासाठी पाचोरा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयत घोषीत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील मु.जे. महाविद्यालय समोरील भोईट मार्केटमध्ये थकबाकीदार असलेले २४ गाळे महापालिकेच्या वसुल व अतिक्रमण पथकाने गुरूवारी १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सील करण्यात आले. यावेळी जिल्हा पेठ पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भोईटे मार्केट मधील संपूर्ण गाळे सील करण्यात आले आहेत. ही कारवाई महसूल उपायुक्त प्रशांत पाटील, अतिक्रमण विभाग उपायुक्त श्याम गोसावी, किरकोळ वसुली अधीक्षक नरेंद्र चौधरी, संजय ठाकूर, गौरव सपकाळे, सुकदेव बाविस्कर, संजय दाभाडे, राजू शिंदे, किशोर सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. गाळे सील करण्याची कारवाई दुपारी १२ वाजता सुरु करण्यात आली. वेळोवेळी थकबाकी भरण्यासंदर्भात आवाहन करून देखील भोईटे मार्केट मधील गाळेधारकांनी…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । नाशिक येथे जण्यासाठी कॅब बुकिंगच्या नावाखाली एकाला ४९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, धनराज शंकर पाटील (वय-५०) रा. पवन चौक, देशमुख गल्ली, अमळनेर यांना ८ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून एका वेबसाईटवर चौकशी केली असता त्यांना एका अनोळखी नंबरवरून माहिती पुरवण्यात आले. त्यान एका अनोळखी नंबरवरून फोन आला की, ‘तुमची बुकींग होऊन जाईल’ त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना मोबाईलवर व्हाट्सअपवर एक लिंक आली. त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन १०० रुपये टाकून बुकिंग करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यानुसार धनराज पाटील यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या सातपुडा ऑटोमोबाइल्स या शोरूमच्या मागील बाजूस जुन्या वाहनांना अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत अद्याप पोलीसांत नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात चारचाकी वाहनांचे सातपुडा ऑटोमोबाईल शोरूम आहे. शोरूमच्या मागील बाजू परिसरात जुने भंगार वाहने असतात. या वाहनांमधील एका वाहनाला बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागली. शोरूममधील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शोरूममधील फायर एक्स्टिग्युशरचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी पोहोचले अग्निशमन विभागाचे कर्मचारी- रोहिदास…

Read More

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी डॉ नितीन वसंतराव पाटील यांची मागील चार वर्षापासून त्यांनी केलेल्या कामांची पावती म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली, कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना 24 तास रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल अशा सेवेमुळे डॉ, नितीन पाटील यांना डॉ, सेलचे प्रदेश कार्यकारिणी ने बढती दिली,मा,प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी नुकतीच कार्यकारिणी ला मंजुरी दिली, डॉ, सेलचे प्रदेश अध्यक्ष मा, डॉ नरेंद्र काळे यांनी हि नियुक्ती जाहीर केली या निवडीबद्दल विधानसभेचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने ’प्रपोज डे’ च्या दिवशी तरुणीसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी फुले मार्केटमध्ये घडली. यामुळे मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या एसीबीआय बँकेतील तरुण चालकाने महामार्गावरील दुभाजकला टँकरने धडक दिली यात दुभाजकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील हडीया तालुक्यातील बलीपुर येथील कमलेश रामराज गौड (वय-३९) हा सध्या खामगाव येथे वास्तव्यास आहे. तो शिवकॉलनी स्टॉपवरील एसबीआय बँकेचे टँकर (एमएच ०४ डीएस ४९३१) यावर चालक म्हणून कामाला आहे. ७ रोजी रात्री ११.३५ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत तर्रर्र असलेला कमलेश गौड याने वाहन चालवित होता. दरम्यान त्याने टँकरने महामार्गाच्या मध्यभागी लावलेल्या दुभाजकाला धडकले. यामध्ये दुभाजकासह वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव येथे आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाजवळ यात्रेचे आगमन झाले.यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांचा नेतृत्वात आगमन झाले यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख जे डी सी सी बॅंकेचे चेअरमन माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी राष्ट्रवादी युवक संघटन वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ,ज्ञानेश्वर महाजन,युवक जिल्हा अध्यक्ष रवी पाटील,एजाज मलिक यांनी युवक कार्यकर्त्यांना संबोधीत केले.कार्यक्रमास उपस्थित तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , जिल्हा समन्वय विकास दादा पवार,सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील,प्रदेश प्रवक्ते योगेश देसले,माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, माजी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शेळगाव येथे मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण आनंदा पाटील (वय ३६ रा. शेळगाव ता.जि. जळगाव) हा तरुण शेती करतो. २७ जानेवारी रोजी सायंकाळी कानसवाडा फाट्याजवळ भुषण पाटील आणि त्याचा मित्र संदीप लक्ष्मण धांडे हे दोघे उभे होते. काहीही कारण नसतांना गावातीलच लोकेश एकनाथ पाटील आणि सोबत अनोळखी तरूण यांनी येऊन संदीप धांडे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असल्याचे पाहून भुषण पाटील यांनी सोडवासोडव केली असता, लोकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी । लग्नासाठी तरूणीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरूणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवाशी अजय सिताराम इंगळे (वय-२५) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होते. याला अजय नकार दिला होता. लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाहून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ…

Read More