Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका सराफा व्यापाऱ्याला एरंडोल गावानजीक रस्त्यातच गाठत अज्ञात तीन दरोडेखोरांनी मारहाण करीत चार किलो चांदीसह दुचाकी व मोबाईल असा एकुण ९ लाखांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री रहिवासी सराफा व्यावसायीक राजेंद्र बबनशेठ विसपुते यांचे एरंडोल तालुक्यातील रवंजे येथे समर्थकृपा नावाचे सराफा दुकान आहे. सकाळी ९ वाजता दुकान उघडल्यानंतर दुपारी २ वाजता ते दुकान बंद करून मूळ गावी माळपिंप्री येथे जातात. त्यानुसार आज बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्यावर लक्ष ठेवून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावळाराम भानुदास शिंदे (वय-२७) रा. मानसिंगका कॉलनी, पाचोरा या नराधमाला अवघ्या ६० दिवसात विशेष न्यायालयाने दोषी ठरवत आजन्म कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. चाळीसगाव शहरात राहणारी चार वर्षाची चिमुकलीला बिस्किटचा पुडा खायला घेऊन देतो असे सांगून आरोपी सावळाराम भानुदास शिंदे याने चाळीसगाव रेल्वे स्थानकाजवळ घेऊन गेला. तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात पोक्सो कायद्यांतर्गत सावळाराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून सावळाराम शिंदे याला चाळीसगाव शहर पोलीसांनी अटक करून…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेस्कोमाता नगरात राहणाऱ्या तरूणाची घरासमोरून मध्यरात्री दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, बादलसिंग भिमसिंग जोहरी (वय-४०) रा. मेस्कोमाता नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बेनटेक्स ज्वेलरी व्रिकी करून आपला उदरनिर्वाह करतात. हा व्यवसाय करण्यासाठी (एमएच १९ डीजी ८६६) क्रमांकाच्या दुचाकीचा वापर करतात. १० फेब्रुवारी रोजी दिवसभर व्यवसाय करून रात्री घरी आले. त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्कींग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी १५ फेब्रुवारी रेाजी सकाळी ५ वाजता उघडकीला आली.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. संशयित आरोपी रूपेश संजय पाटील रा. साखरे ता. धरणगाव हा त्याच्या साथीदारासह जळगाव शहरात दुचाकींची चोरी करत असल्याचे गोचोरी करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, रमेश जाधव, पोलीस हवलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, संदीप साबळे,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये शिरुन तेथे झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर लैंगित अत्याचार करणारा राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-२२, रा.जळगाव )या नराधमास जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंडातील ७० हजार रुपये हे पिडीतेला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयाने मंगळवारी १५ फेब्रुवारी रेाजी हा निकाल दिला आहे. जळगाव शहरातील एका भागात आपल्या पालकांसह चिमुकली शेडमध्ये वास्तव्याला होती. १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी राणासिंग जुन्नी याने घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने शेडच्या दरवाजाची आतील कडी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील ७५ वर्षीय वायोवृध्द घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. कुणाला आढळून आलल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बाबुराव तोताराम राखुंडे (वय-७५) रा. वसंतवाडी (जळके) ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाबुराव राखुंडे हे कुणाला काहीही न सांगत १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले आहे. कुणाला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे संपर्क क्रमांकसिताराम राखुंडे – 7385440436सागर ठोसर – 8390304017ललित भटकर – 9511973505किरण सुरवाडे- 9284908668

Read More

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी सर्व निवडणुका कोणत्याही मदतीशिवाय लढविणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केले आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्‍त्या जाहीर करण्यात आले. जळगाव जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे नियुक्त प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांचा सत्कार समारंभ बळीराम पेठेतील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा शेवते यांनी केले. याप्रसंगी राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अजित पाटील, राजेंद्र पोथाडे, डॉ. प्रेमराज पळशीकर, जिल्हा प्रभारी प्रा. विठ्ठलराव शिंगाडे, समाधान पाटील, संतोष बंजारी,…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणा येथे जुन्या वादातून आठजण मोठमोठ्याने आवाज करून झोंबाझोंबी केल्या प्रकार रात्री घडला. याप्रकरणी पोलीसांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाने गावात ग्रामपंचायतीसमोर स्टॉपवर एकमेकांची खुन्नस व उणेदुणे काढुन सात ते आठ जण मोठमोठ्याने आरडाओरड तसेच शिवीगाळ करत हाणामारी करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून हाणामारी करणारे श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी , रावसाहेब गोपाल चौधरी, सागर गोपाल चौधरी, मनीष नरेंद्र पाटील, शाम नरेंद्र पाटील, नरेंद्र पोपट…

Read More

जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दुचाकी, लॅपटॉप, होम थिएटर आणि रोकड असा एकुण २३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप धनसिंग पाटील (वय-४८) रा. मुक्ताईनगर बंधु जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. दिलीप पाटील हे सोमवार १४ फेब्रुवारी रोजी कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील लॅपटॉप, होम थीएटर, बाहेर लावलेली दुचाकी (एमएच १९ एटी २९०८) आणि रोकड असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नशिराबाद येथील गायत्री पेपर मिल नावाच्या पुठ्ठा फॅक्टरीतून निघालेला ट्रकच्या कॅबीनला बॅटरीच्या शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना नशिराबाद टोल नाक्याजवळ सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने ट्रक थांबवून कॅबिनमधून दोघांनी उडी घेतल्याने सुदैवाने बचावले आहे. ट्रकच्या आग लागल्याचे कळताच जवळ असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचारी आणि नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून आग विझविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाका आणि जयभोले हॉटेलदरम्यान असलेल्या गायत्री पेपर मिल नावाची पुठ्ठा फॅक्टरी आहे. धुळे येथून पुठ्ठा घेवून आलेला ट्रक (एमएच १८ एम ९६२) हा सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी…

Read More