Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

मुंबई वृत्तसंस्था । आपल्या सुमधूर आवाजाने गेली ६० वर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल आहे. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना कोरोना झाला होता. आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी, संगीतसृष्टी आणि अवघा भारत पोरका झाला आहे. त्यांच्या निधनाने भारताचं रत्न गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज संध्याकाळी 5.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकसाठी लागणारे टायर, ट्यूब व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा केला आहे. सविस्तर माहिती अशी की, रामदास साहेबराव खैरनार (वय-४५) रा. खुपचंद साहित्या नगर, मोहाडी रोड जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते कंटेनचे चालक असून वाहन चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता कंटनेर घेवून जळगाव कडे येत असतांना तालुक्यातील रामदेववाडी येथील रस्त्यावर त्यांचा कंटेनर बंद पडला. कंटेनमध्ये बिजस्टोन कंपनीचे ट्रकचे ट्यूब, टायर आणि फ्लॅप असा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील गणेश भास्कर आगे (वय-२०) हा तरूण गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील रहिवाशी गणेश आगे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. वडील भास्कर रामकृष्ण आगे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. तर गणेश हा जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात बीएचे शिक्षण घेत आहे. दरम्यान बुधवार २ फेब्रुवारी रोजी दुपारी घरात कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. नातेवाईकांनी त्याचा गावात, मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता कुठेही मिळून आलेला नाही.…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटीपीसीआर अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाच्या सूचनेप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती. या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले…

Read More

शहरातील एमआयडीसीतील बंद असलेल्या ट्राईडन कंपनीत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शनिवारी ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील ट्राईडन बंद असलेल्या कंपनीत तीन व्यक्ती हे अस्तीत्व लपवून चेहऱ्यावर दुपट्टे घालून अंधारात फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मिळाली. त्यानुसार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. मुदस्सर काझी, विकास सातदिवे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंढे, सतिष गर्जे यांनी कारवाई करत संशयित आरोपी तनवीर शेख चांद (वय-२३) रा. दत्त…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील प्रसिद्ध स्टँप वेंडर मनोहर वसंत पाटील (वय ५०) यांचा आज दुपारी विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला. येथील स्टँप वेंडर मनोहर पाटील हे आजप दुपारी साधारण ४ वाजेपुर्वी शेतात गेले होते. यावेळी अचानक पाय घसरून ते विहिरीत पडले. या अपघातात त्यांचे जागीच निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि 5 फेब्रुवारी रोजी रात्री 8 :30 वाजता साळवे येथून त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा धरणगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास पो.हे.कॉ करीम सय्यद हे करीत आहेत.

Read More

रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी | शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील 24 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण गिरधर धांडे वय ७४ रा. संचित रणछोड नगर जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या जवळ थांबला. त्यानंतर त्यांच्या हातातील “सोन्याची अंगठी ही खूप सुंदर आहे, मला पण अशी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज राजेंद्र पाटील शिवाजी नगरातील रहिवाशी रमेश राजन्न लोंकलकर (वय-४५) रा. शिवाजी नगर याचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शिरसोली दरम्यान शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश लोंकलकर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बळीराम पेठेतील वैभव रेडीमेड कापड दुकानात ते कामाला आहेत. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. दरम्यान दुपारी जळगाव शिरसोली रेल्वे मार्गावर मोहाडी गावानजीक शिरसोली रेल्वे डाऊन मार्गावर खांब क्र. ४११ (५-७) जवळ त्यांना रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील सिंधी कॉलनी येथील कापड व्यावसायिकाने कर्जबाजारीतून राहत्या घरात घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेशकुमार मिठूमल मताना (वय ५०) रा. सिंधी कॉलनी असे मयत कापड व्यावसायिकाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार मताना हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. फुले मार्केट परिसरात कपडे विकून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबियासोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । भर रस्त्यावर नागरीकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लुटमार करणारा आणि स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलीसांनी सापळा रचून अटक केली. एवढेच नाही तर त्याची हातात बेड्या ठोकून गावातून धिंड काढण्यात आली. गुन्हेगारांची दहशत संपविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर पावले उचलले असल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. शुभम उफ शिवम उर्फ दाऊ मनोज देशमुख हा स्वत:ला दाऊद समजतो. अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांकडून व नागरीकांकडून बळजबरीने पैसे घेवून जनतेच्या मनात दहशतीचे वातावरण पसरवत असल्याने त्याच्यासह त्याच्या साथीदाराची दहशत संपविण्यासाठी अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक दरम्यान पायी धिंड काढण्यात आली. नागरीकांमधील दहशत कमी व्हावी यासाठी त्यांची गावातून धिंड…

Read More