Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

तालुक्याची तंबाखूमुक्त शाळांच्या तालुक्याकडे वाटचाल ! प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – सलाम मुंबई फाऊंडेशन व प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत धरणगाव तालुक्यातील सोनवद बुद्रुक या केंद्राने १००%तंबाखू मुक्त शाळाचे पहिले केंद्र होण्याचा मान मिळविला आहे. सोनवद बु॥ केंद्रात सर्व माध्यमाच्या १६ शाळा आहेत. त्या १६ शाळांनी तंबाखू मुक्त शाळांचे ९ योग्य निकष यशस्वीपणे अपलोड करून आपल्या शाळा तंबाखू मुक्त केल्या. याकामी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सोनवद केंद्राची धुरा समर्थपणे सांभाळणारे प्रभारी केंद्रप्रमुख दिलीप बाविस्कर सर व तालुकासमन्वयक संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. त्याबद्दल त्यांच शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव…

Read More

वृध्द महिलेला शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तरूणाला शिकविला धडापोलीस निरक्षक शंकर शेळके यांनी तात्काळ मदत केल्याने वृध्द महिलेच्या डोळ्यात पाणी तरळले !गावकऱ्यांसमोर वृध्द महिलेची तरूणाने मागितली माफीउत्कृष्ट कामगिरी केल्याने गावकऱ्यांमध्ये खाकीची ‘कॉलर झाली टाईट’एकटे वृध्द व्यक्तींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही- पो.नि. शंकर शेळके प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : पोलीस म्हटलं म्हणजे बंदूक, काठी आणि मारहाण हे सर्वसामान्य माणसासमोर चित्र उपस्थित होते. परंतू धरणगाव पोलीसांनी खाकी वर्दीतील माणूसकी दाखवून सर्वसामान्य माणसांमध्ये आदराची भावना निर्माण केली आहे. तालुक्यातील साकरे येथील महिलेला शिवीगाळ करून तिचे अंड्याचे नुकसान करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी पकडून महिलेसह तिच्या कुटुंबियांकडे माफी मागविण्यास भाग पाडले. एवढेच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील जय भोले नावाच्या कंपनीतून चोरी करून रोकड लांबविणाऱ्या चोरट्याला अटक करून १ लाख ३ हजारांची रोकड जप्त केल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांनी कळविले आहे. सविस्तर माहिती अशी की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथील व्यापारी अमर दयालदास कटियारा वय ४२ यांची एमआयडीसीतील जी २० सेक्टर येथे जय भोले नावाची कंपनी आहे. कंपनी बंद असतांना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी कंपनीचे कुलूप तोडत कंपनीत प्रवेश करीत कंपनीच्या ऑफिसमधील १ लाख ५२ हजारांची रोकड व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यागुन्ह्यातील संशयित आरोपी भिमकुमार प्रभास यादव रा.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने शहरातील मानियार बिरादरीतर्फे गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हा न्यायालयात जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील चार वर्षीय बालीके सोबत अत्याचार करणाऱ्या आरोपी सावळाराम भानुदास शिंदे यास जिल्हा न्यायालयाने ६० दिवसात निकाल देत मरेपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यानिमित्ताने जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरीने जिल्हा सरकारी वकील ॲड. केतन ढाके यांचा गुरूवार १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जिल्हा न्यायालयात जावून सत्कार करण्यात आला. जळगाव पोलीस दल व सरकारी वकील यांनी शासनातर्फे उच्च न्यायालयात…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी करून दोन्ही कुटुंबातील दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात तीन जणांवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका भागात दोन कुटुंबिय एकाच भागात राहतात. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकामेकांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता धाव घेवून एकमेकांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील रेमंड कंपनीच्या समोर रस्त्यालगत उभी दुचाकी चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुक्यातील आसोदा येथील चिंतामण भास्कर पाचपांडे वय २५ हा तरुण रेमंड कंपनीत कंत्राटी तत्त्वावर इलेक्ट्रिशिअन म्हणून कार्यरत आहे. १३ फेब्रुवारी रोजी चिंतामणी हा नेहमीप्रमाणे त्यांच्या एम एच १९ डी सी ११७१ या क्रमांकाच्या दुचाकीने कंपनीत आला. कंपनीच्या समोर बाहेरील बाजूस दुचाकी उभी केली. ड्युटी संपल्यानंतर घरी जायला निघाला असता दुचाकी दिसून आली नाही . सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळुन न आल्याने अखेर ४ दिवसांनंतर चिंतामण पाचपांडे यांनी गुरुवारी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली या तक्रारीवरून ३० हजार रुपयांची दुचाकी चोरीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी । औरंगाबाद महामार्गावर भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश रमेश चौधरी (वय-३२) रा. चिलगाव ता. जामनेर जि. जळगाव हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने जळगाव-औरंगाबाद महामार्गावरून विमानतळाजवळून जात होते. त्यावेळी त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारी (एमएच ४६ एएफ ३८७१) मालवाहू पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत दुचाकीस्वार अविनाश चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अविनाश चौधरी यांच्या…

Read More

भडगाव प्रतिनिधी । भडगाव येथे भरधाव जाणाऱ्या कारने जोरदार दिलेल्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर हा अपघात घडला असून चालक कार सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल दिपक सोनवणे (वय १५ रा. यशवंत नगर, भडगाव ) व त्याचा मित्र पंकज भारत भोई (रा. भोईवाडा, भडगाव ) अशी मृत मुलांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, भडगावच्या यशवंतनगर भागात दीपक वसंत सोनवणे (वय ४६) हे वास्तव्यास आहे. त्यांची मोटार सायकल क्र. (एम.१९ सीसी ४३७५) ही १५ फेब्रुवारी रोजी पंचर झाली होती. सोनवणे यांचा मुलगा अमोल दिपक सोनवणे व त्याचा…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिखलोद येथे साई लीला युवा क्रीड मंडळाच्या वतीने आयोजित १८ वर्षीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य हिंमत आबा पाटील यांच्यावतीने प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चिखलोद येथे साई लीला युवा क्रीडा मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात १८ वर्षीय वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील यांच्याकडून दिले गेलेले प्रथम क्रमांकाचे बक्षीस विखरण ता.एरंडोल यांनी पटकावले. माजी सरपंच नंदलाल पाटील यांनी दिलेले दुसरे बक्षिस हे साई लीला ग्रुप चिखलोद या संघाने पटकावले…

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीपत्नीवर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी ३१ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. १२ फेब्रुवारी रोजी महिलेच्या मोबाईलवर गोपाळ हरीचंद्र इंगळे याने फोन केला. त्यानंतर त्याने अश्लिल शब्द बोलून विवाहितेचा विनयभंग केला. त्यानंतर काही वेळीनंतर गोपाळची पत्नी रंजना गोपाळ इंगळे हिने महिलेच्या मोबाईलच्या व्हॉटस्ॲपवर आक्षेपार्ह मजकूर टाकून सोशल मीडियात बदनामी केली. तसेच गोपाळ याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याला कंटाळून महिलेने मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून दोघांविरोधात तक्रार दिली.…

Read More