शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव तालुक्यातील तूरखेडा येथील ४० वर्षीय तरूणाने शहरातील कांचन नगर येथे पत्नीच्या घरी दरवाजा बंद करून आत्महत्या केल्याची घटना आली. याबाबत शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार, रविंद्र केशव सुर्यवंशी (वय-४०) रा. तुरखेडा ता. जि.जळगाव हे मुलगा दिपक सुर्यवंशी यांच्यासह तुरखेडा येथे वास्तव्याला आहे. इमारतीचे बांधकाम करून उदरनिर्वाह करतात. तर पत्नी सुरेखा सुर्यवंशी ह्या जळगाव शहरातील कांचन नगरात वास्तव्याला आहे. त्या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलगा दिपक हा पत्नी सुरेखाकडे राहण्यासाठी आला होतो. त्यामुळे त्याला घेण्यासाठी रविंद्र सुर्यवंशी हे सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रेशनदुकान धारकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रेशनदुकानदारावर गुन्हा झाला आहे. यामुळे रेशनदुकानदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते. पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची…
जळगाव प्रतिनिधी । पाळधी येथे जेवणासाठी गेलेल्या द्वारका नगरातील तरूणाचा भरधाव कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घडली. याबाबत पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सुखदेव महाजन (वय-३०) रा. द्वारका नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. गणेश महाजन हा आपल्या आईवडील, पत्नी व दोन मुलांसह द्वारका नगर येथे वास्तव्याला आहे. गणेश महाजन हा महावितरण कंपनीत नोकरीला होता. द्वारका नगर परिसरात गणेशच्या मावस भावाचे लग्न असल्याने रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम होतो. जेवण करून कुटुंबासह सर्वजण आनंदाने नाचले. नाचण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गणेश नातेवाईकांसह मोठा भाऊ, पाहणे आणि मित्र परिवार…
अमळनेर प्रतिनिधी । बारावीची परिक्षा देण्यासाठी पुण्याहून अमळनेरात आलेल्या अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यात एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील उखळवाडी गावाजवळील अंजनी नदीजवळ धरणगाव पोलीसांनी जुगार अड्ड्यावर धरणगाव पोलीसांनी छापा टाकून चार संशयित आरोपींना अटक केली आहे तर १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उखळवाडी गावाजवळील अंजनी नदीजवळ काही जण जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. शेळके यांनी स्वत: एक पथक तयार करून रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात पोलीसांनी जुगार खेळाणारे चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर या कारवाईत एकुण रोकड आणि…
मुंबई वृत्तसंस्था । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील किनगाव येथील तरुणाकडून पैसे घेत लग्न करून फसवणूक करणार्या फरार असलेल्या नववधूला यावल पोलिसांनी अटक केली आहे. तिला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी धनंजय हिरालाल सोनार या तरूणाचा यशवंत उर्फ दादू विजय पाटील रा. सांगली खुर्द यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी रा. अंजाळे हिच्यासोबत विवाह निश्चित झाला होता. या विवाहासाठी सव्वा लाख रुपये द्यावे तसेच लग्नाचा खर्च मुलाने करावा असे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे ८५ हजार रुपयांची रोकड देण्यात आली होती, उर्वरित रक्कम नंतर देणार होते. १४ डिसेंबर २०२१ रोजी देहू आळंदी पुणे येथील अलंकापुरी मंगल…
अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कलाली येथील शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या उसाच्या पिकाला अचानक आग लागल्याने सुमारे १ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत माहिती अशी की, प्रकाश धनसिंग पाटील रा. कलाली ता. अमळनेर यांचे कलाली शिवारातील शेत गट नंबर ६९/२/अ मध्ये शेत आहे. त्यांनी १ हेक्टर ८२ आर मध्ये ऊसाची लागवड केली होती. दरम्यान शनिवार ५ फेब्रुवारी रोजी दुपारी शेतातील ऊसाला अचानक आग लागल्याने ऊसचे पीक आणि ठिंबक सिंचन नळ्या जळून खाक झाले आहे. यात आगीत सुमारे १ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट आरटीपीसीआर अहवाला दिल्याप्रकरणी सुरक्षा रक्षकासह ऑपरेटर यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र विठ्ठल दुर्गे रा. जळके विटनेर ता.जि.जळगाव आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील रा. जळगाव असे संशयित आरोपींचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, प्रसारमाध्यमांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात बोगस आरटीपीसीआर अहवाल मिळतात याबाबत माहिती प्रसिद्ध झाली होती. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती. या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ बंद पडलेल्या कंटेनरमधून टायर, ट्यूब व इतर साहित्य असा एकुण ३ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या कंटेनर चालकासह एकाला एमआयडीसी पोलीसांनी आज पहाटे अटक केली. दोघांवर एमआयडीसीत गुन्हा दाखल झाला आहे. कंटेनर चालक सलमान खान सलीम खान पठाण (वय-२७) आणि त्याचा साथीदार अमीर शेख नाशिर मण्यार (वय-२०) दोन्ही रा. कजगाव ता. भडगाव जि.जळगाव असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव येथील एस.के. ट्रान्सलाईन येथील कंपनीच्या मालकीच्या कंटेनर (MH-१९, CY-२२८१ ) मध्ये पुण्यातील ब्रिजस्टोन टॉयर कंपनीचा सुमारे ३ लाख ३६ हजार माल भरून गुहाटीकडे रवाना झाला. शुक्रवार ४ फेब्रुवारी…

