धरणगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका ६२ वर्षीय वृध्द व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची राजमाता पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला रविवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३वाजेच्या सुमारास आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणी वर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. त्यावेळी चंदुलाल मराठे याने आठ वर्षाच्या मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा येथील रहिवाशी तुषार पाटील हे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी युजीसीमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत (नेट) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. त्यांनी जळगावातील मूळजी जेठा महाविद्यालयात पदवीचे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे तसेच पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा नवीन घर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर शहरातील इस्लामपूरा येथील माहेर असलेल्या आसमाबी अझरोद्दिन शेख (वय-२८) यांचा विवाह भुसावळ येथील अझरोद्दीन रईसोद्दिन शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार २०१७ मध्ये झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर पती अझरोद्दीन शेख याने विवाहितेला माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू आई वडीलांची परिस्थिती नाजूक असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकल्या नाही. याचा राग आल्याने पती अझरोद्दीन…
धरणगाव (प्रतिनिधी) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पी.आर.हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, सुप्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी यांना बहुआयामी कार्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी याच्या हस्ते धरणगाव भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यांची रविवारी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून हे संमेलन जामनेर येथे संपन्न होत आहे. प्रा. चौधरींच्या रुपाने धरणगावात बालकवींचा वारसा पुढे चालू असल्याचे गौरवोद्गार ना. पाटील यांनी काढले. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या संकल्पनेतून धरणगाव भुषण पुरस्काराची सुरवात करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. या प्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, कबचौउमवीचे सिनेट…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ व समाज बांधव यांच्या मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाले. “राज्य छोटं का असेना पण स्वतःचं असावं” हा छत्रपतींचा आदर्श घेऊन रयतेच्या राजाच्या जयंतीनिमित्त कुणबी पाटील समाज मंगल कार्यालयाच्या नियोजित जागेच्या फलकाचे अनावरण करून मंगल कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सर्वप्रथम कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर समाजाचे जेष्ठ संचालक माधवराव पाटील, चुडामण पाटील, रामचंद्र पाटील, गुलाब पाटील, दत्तू पाटील, भगवान पाटील यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व माल्यार्पण करण्यात आले. समाजाच्या सर्व सदस्यांनी महाराजांचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली. जवळजवळ मागील ३५…
जळगाव प्रतिनिधी । जोशी पेठ येथून मेडीकल दुकानदाराची घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मोहम्मद इस्त्राईल मोहम्मद मुस्ताक तांबोळी (वय-३३) रा. बागवान मोहल्ला, जोशी पेठ हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मेडिकलच्या दुकान चालूवन आपल्या कुटूंबियाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीपी ६३९५) क्रमांकाची मोटरसायकल आहे. १४ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे दिवसभर काम करून सायंकाळी ११.३० वाजता घरी आले व त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरुन नेल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील आदीवासी आश्रमशाळेत भारतीय सेनेत १८ वर्ष सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले जवान ईश्वर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष बी.एल. देशमुख हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जवान ईश्वर पाटील यांच्याहस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षकांनी मनोगतातून जवान ईश्वर पाटील यांनी देशसेवेच्या भावनेतून केलेल्या कार्याचा गौरव केला. शाळेतील विदयार्थ्यांना सैन्य दलात जायचे असल्यास आपण अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करेल असे सेवानिवृत्त जवान ईश्वर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हुकूमचंद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या शेवटी भारताची गानकोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला संस्थेच्या सचिव…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकात रोटरॅक्ट क्लब जळगावच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवकालीन पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य बॅनर लावण्यात आले होते. याप्रसंगी मावळे, सरदार, पेशवे, भालदार, अशी पोशाख घातलेले सदस्य त्या वेळी उपस्थित होते. शिवतीर्थ मैदानावरून पायी मिरवणूक काढून महाराजांची पितळी मूर्ती हातात घेत पालकमंत्री गुलबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी मंत्री गुलाबराव देवकर,पोलीस उपनिरिक्षक कुमार चिंथा,पीपल्स बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, माजी चेअरमन तथा संचालक भालचंद्र पाटील यांनी उपस्थिती दिली. शिवाजी महाराजांना मानवंदना देत मुजरा करण्यात आला व आरती पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाच्या सौजन्याने 2200 जणांना रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नागरिकांना रेशन कार्ड देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या प्रयत्नांनी नागरिकांना हे रेशन कार्ड वाटप करण्यात आले. जिल्ह्यात अनेक नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. कधीकधी दलालांकडून त्यांची आर्थिक लूट होते. ही सर्व परिस्थिती पाहता पंकज महाजन यांनी नशिराबादच्या नागरिकांची ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आज नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड मिळत…
प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची माहिती देवून त्यांच्या कार्याला उजाळा दिली. याप्रसंगी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, प्रविण पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण माजी उपसरपंच गजमल पवार, बाबुराव राठोड, समाधान चव्हाण,बाबु चव्हाण व ग्रामसेवक बबन वाघ, पोलिस पाटील संजय चिमणकारे, ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण इत्यादी उपस्थित होते

