Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी डॉ सेल च्या जिल्हा अध्यक्ष पदी डॉ नितीन वसंतराव पाटील यांची मागील चार वर्षापासून त्यांनी केलेल्या कामांची पावती म्हणून पक्षाने त्यांना बढती दिली, कोरोना काळात केलेले कार्य असो,किंवा सांगली, कोल्हापूर च्या पूरस्थिती मध्ये जाऊन घेतलेले कॅम्प असतील,किंवा जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी घेतलेले आरोग्य शिबीर असेल किंवा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांना 24 तास रुग्ण सेवेचे मार्गदर्शन व सहकार्य असेल अशा सेवेमुळे डॉ, नितीन पाटील यांना डॉ, सेलचे प्रदेश कार्यकारिणी ने बढती दिली,मा,प्रदेश अध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांनी नुकतीच कार्यकारिणी ला मंजुरी दिली, डॉ, सेलचे प्रदेश अध्यक्ष मा, डॉ नरेंद्र काळे यांनी हि नियुक्ती जाहीर केली या निवडीबद्दल विधानसभेचे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव शहरातील एका तरुणाने प्रेमभंग झाल्याने ’प्रपोज डे’ च्या दिवशी तरुणीसमोरच आपल्या हाताची नस कापून घेतल्याची घटना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी फुले मार्केटमध्ये घडली. यामुळे मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. जळगावातील एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । दारुच्या नशेत तर्रर्र असलेल्या एसीबीआय बँकेतील तरुण चालकाने महामार्गावरील दुभाजकला टँकरने धडक दिली यात दुभाजकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील हडीया तालुक्यातील बलीपुर येथील कमलेश रामराज गौड (वय-३९) हा सध्या खामगाव येथे वास्तव्यास आहे. तो शिवकॉलनी स्टॉपवरील एसबीआय बँकेचे टँकर (एमएच ०४ डीएस ४९३१) यावर चालक म्हणून कामाला आहे. ७ रोजी रात्री ११.३५ वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत तर्रर्र असलेला कमलेश गौड याने वाहन चालवित होता. दरम्यान त्याने टँकरने महामार्गाच्या मध्यभागी लावलेल्या दुभाजकाला धडकले. यामध्ये दुभाजकासह वाहनाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव येथे आदरणीय शरदचंद्र जी पवार साहेब यांचा वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारकाजवळ यात्रेचे आगमन झाले.यात्रेचे नेतृत्व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांचा नेतृत्वात आगमन झाले यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख जे डी सी सी बॅंकेचे चेअरमन माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर यांनी राष्ट्रवादी युवक संघटन वाढीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ,ज्ञानेश्वर महाजन,युवक जिल्हा अध्यक्ष रवी पाटील,एजाज मलिक यांनी युवक कार्यकर्त्यांना संबोधीत केले.कार्यक्रमास उपस्थित तालुकाध्यक्ष धनराज माळी सर , जिल्हा समन्वय विकास दादा पवार,सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मिक मामा पाटील,प्रदेश प्रवक्ते योगेश देसले,माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, माजी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शेळगाव येथे मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण आनंदा पाटील (वय ३६ रा. शेळगाव ता.जि. जळगाव) हा तरुण शेती करतो. २७ जानेवारी रोजी सायंकाळी कानसवाडा फाट्याजवळ भुषण पाटील आणि त्याचा मित्र संदीप लक्ष्मण धांडे हे दोघे उभे होते. काहीही कारण नसतांना गावातीलच लोकेश एकनाथ पाटील आणि सोबत अनोळखी तरूण यांनी येऊन संदीप धांडे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असल्याचे पाहून भुषण पाटील यांनी सोडवासोडव केली असता, लोकेश आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी । लग्नासाठी तरूणीकडून वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून २५ वर्षीय तरूणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील रहिवाशी अजय सिताराम इंगळे (वय-२५) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होते. याला अजय नकार दिला होता. लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाहून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी समोर आले आहे. शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यााबाबत माहिती अशी की, सुनिल नारायण सोनवणे (वय ४०) रा. गेंदालाल मील परिसर जळगाव हे पेंटरचे काम करून उदरनिर्वाह करतात. घरी आई व मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेवण करून एफएमवर गाणे ऐकत असतांना झोपले. मध्यरात्री त्यांनी घरात सर्वजण झोपलेले असतां गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा मोहित हा शाळेत जाण्यासाठी उठला असता हा प्रकार लक्षात आला. सोनवणे यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट…

Read More

दोषींवर कारवाईची मागणी : वृक्षमित्र राजेंद्र वाघ धरणगाव प्रतिनिधी । शहरापासून वनविभागाच्या राजवड परिमंडळ अंतर्गत गट क्रमांक १२८० क्षेत्रा मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत मिश्ररोपण आगीत जळुन खाक झाली. आग इतकी भयानक होती की आगीच्या क्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०२१-२२ ह्या वर्षी जळगाव वनविभाग धरणगाव अंतर्गत, वनक्षेत्र एरंडोल च्या नियतक्षेत्र राजवड गट क्र १२८० येथे राज्य योजना अंतर्गत वनीकरण भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येऊन मिश्र रोपवन पावसाळ्यात १५.०१ हेक्टर जागेमध्ये लावण्यात आले दोन रोपांचे अंतर ३×३ मी एवढे होते. या रोपवणात एकूण ९२३७ खड्ड्यात अनेक प्रजातीचे रोपे लावण्यात आले…

Read More

जळगाव प्रतिनिधी । ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत प्राप्त तक्रारीची जनसुनावणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी घेतली.यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांची उपस्थिती होती. श्रीमती चाकणकर म्हणाल्या कि, राज्य शासन महिला आयोगातर्फे अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी समिती कार्यरत आहे, जिल्ह्यात कोविड संसर्ग काळात विधवा, एकल महिलांच्या तसेच पालकत्व गमावलेल्या 20 मुलांना 5 लाख रुपये शासन स्तरावरून मदत देण्यात आली. 569 महिलांना लाभ देण्यात आला आहे. तसेच अन्य निराधार महिलांना शिलाई मशीन, रेशन लाभ, वृद्धापकाळ पेन्शन आदी लाभ देण्यात आले आहेत. शिवाय…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | पन्नास रूपयाचा उधारीसाठी काका पुतण्यांमध्ये झालेल्या हाणामारीत काका गटारीत पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल (वय २८) आणि भारत सुकडू भिल (वय ४४) या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी रोजी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक सुरू झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजुने आपले काका भारत यांना जोराचा धक्का दिला. या धक्क्यात भारत हे जवळच्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून…

Read More