जळगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरात दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी २४ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील दोन चिमुकलींवर ६२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज बुधवार रोजी शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. दरम्यान ६२ वर्षीय नराधमाच्या फाशीची शिक्षा मिळावी व त्याच्या मुलाला देखील या गुन्ह्यात सह आरोपी करावे. पीडीत मुलींना शासनाकडून असलेल्या योजना व सुविधांचा लाभ व्हावा यासह विविध मागण्यांसाठी जळगावात उद्या २४ फेब्रुवारी रोजी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पाचोरा प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची र्दैवी घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तेली समाज बांधवांतर्फे निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. धरणगाव शहरातील एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची र्दैवी घटना घडली आहे. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ व आरोपीस तात्काळ कठोरात कठोर शासन व्हावे. या रास्त मागणीसाठी पाचोरा शहर तेली समाज मंडळ तथा पाचोरा तालुका तैलिक समाज महासभा यांच्यातर्फे आज दि. २३ फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी पाचोरा तेली समाज तालुका अध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष उत्तम चौधरी, सचिव…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटीच्या मु.जे. महाविद्यालय परिसरातील पटांगणात पार्किंगला लावलेली व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत सुभाष पाटील (वय-३२) रा. जाकीर हुसेन सोसायटी, संत गाडगेबाबा, नगर महाबळ हे व्यापारीचे काम करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता एमजी कॉलेज परिसरात असलेल्या केसीई सोसायटीच्या पटांगणात त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीव्ही ००२८) पार्किंग करून लावली होती. पार्किंगला लावलेली २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांनी दुचाकीचा शोध सर्वत्र परिसरात घेतला मात्र मिळून आली नाही. अखेर…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील सावखेडा येथील शेतावरील सातबारा उताऱ्यावर नाव कमी करून देण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची लाच स्विकारणाऱ्या कोतवालासह एका पंटरला लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवार २२ फेब्रुवारी रोजी रंगेहात पकडले आहे. याबाबत यावल पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे यावल तालुक्यातील सावखेडासिम शिवारात शेत आहे. शेतजमीनीचे सातबारा उताऱ्यावरील इतर अधिकार नोंद मधील तक्रारदार यांची बहिण यांचे नाव मंडळाधिकारी किनगाव यांच्याकडून कमी करण्याची विनंती तालुक्यातील मालोद तलाठी कार्यालयातील कोतवाल जहाँगीर बहादूर तडवी (वय-५६) रा. मालोद ता. यावल जि.जळगाव यांच्याकडे केली. त्यानुसार सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्याच्या मोबदल्यात ५ हजाराची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी…
जळगाव प्रतिनिधी । माहेरून प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून तालुक्यातील बिलवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलवाड येथील कविता ऊर्फ भैरवी यांचा काही वर्षापुर्वी शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील लहु देवीदास बागुल यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासू जेठ नणंद यांनी कविता हिस प्लॉट घेण्यासाठी तिच्या माहेरून दीड लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. यासह कविताला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. एके दिवशी कविताला तिच्या पतीने मारहाण करून घराच्या बाहेर काढून दिले पैसे…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील आशाबाबा नगरातून चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर रामानंदनगर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशाबाबा नगर परिसरातून (एम.एच.१९ सी. यु. १७५३) या क्रमाकांचे ट्रॅक्टर वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती रामानंदनगर पोलिसांना मिळाली. त्यास त्यानुसार रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पोलिस नाईक जितेंद्र तायडे यांच्यासह कर्मचार्यांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी आशाबाबा नगर येथे वाळुची वाहतूक करणार्या संबंधित ट्रॅक्टरवर कारवाई केली. एक ब्रास वाळूने भरलेले ट्रॉलीसह ट्रॅक्टर असा दोन लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक…
धरणगाव प्रतिनिधी । आतापर्यंत आपण पतीपासून होणाऱ्या छळ बाबत अनेक बातम्या ऐकल्या असतील. परंतू कायद्याने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर अधिक प्रमाणावर होत असल्याचेही अनेक किस्से समोर आले आहे. परंतू एखाद्या पत्नीच्या माहेरच्या मंडळीपासून होणाऱ्या छळाला कंटाळलेल्या तरूणाने काय मार्ग घ्यावा आता हे तुम्हीच वाचा. धरणगाव पोलीस ठाण्याच्या आवारात अश्याच एका तरूणाने बेमुदत उपोषण सुरू करून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. धरणगाव तालुक्यातील हा तरूण असून पत्नीच्या म्हणजेच सासरच्या लोकांकडून होणारा त्रास कमी होवून न्याय मिळावा, कलम ४९८ चा गैरवापर कमी होण्यासाठी त्यात सरकारने दुरूस्ती करावी व पुरूषांच्या बाजूने कायद्याचे शसक्तीकरण व्हावे. महिलांप्रमाणेच पुरूषांसाठी देखील त्यांच्या होणारा अन्याय दुर करण्यासाठी…
जळगाव जिल्हा बँकेतर्फे देवकर यांनी मांडली भूमिका नवी मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांचा उहापोह येथे झालेल्या एक दिवसीय परिषदेत करण्यात आला. या परिषदेत बँकांच्या अडचणींवर उपाय योजनाही सुचविण्यात आल्या. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद वाशी (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सभागृहात आज (दि. 21) झाली. देशाचे सहकार नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. यावेळी श्री. पवार यांनी जिल्हा बँकेच्या कारभारात संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत…
धरणगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्वपक्षीय शिवजयंती मोठ्या उत्साहाने व नियमाचे काटेकोर पालन करून साजरी करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते सायंकाळी ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करण्यात आले. मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार सर्व जातीधर्माचे मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या राजा होणे कोणीच शक्य नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण दिली ती तरुणांनी आचरणात आणावे.ते कधीही जातीपातीचे राजकारण करत नव्हते. देसले साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज जुने इतिहासकरांनी त्यांचा जो इतिहास समाजापुढे मांडला समाजापुढे तो इतिहास तसा…
धरणगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते चोपडा रोडवरील गणेश ऑटोपर्यंतच्या कॉक्रीट रोडचे बंद पडलेले काम त्वरीत सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. काही महिन्यापासून सुरू होते परंतु गेल्या दिड महिन्यापासून प्रमुख रहदारीच्या रस्त्याचे हे काम मक्तेदाराने पूर्णपणे बंद केले आहे अपूर्ण कामामुळे नागरिकांची फार मोठया प्रमाणात गैरसोय होत असून रहदारीस अडथळा निर्माण झालेला आहे व दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत,पुढील काळात अपघात होऊन काही जीवित हानी होऊ नये म्हणून काम त्वरीत सुरू करावे अन्यथा काही जिवीत हानी घडल्यास आपणास जवाबदार पकडले जाईल. तसेच सदरील काम अभियंताच्या निगराणीत उत्तम दर्जाचे घ्यावे ही विनंती…

