Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव, प्रतिनिधी : येथील इंनरव्हील क्लब ऑफ जळगांव ईस्ट आणि जळगाव पीपल्स बँकेच्या बचत गट विभागातर्फे महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षा चालविण्यासंदर्भात तसेच ऑटोरिक्षा रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव पीपल्स कोऑप बँक व इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, बचत बटातील महिलांना पिंक ऑटो रिक्षाबाबत माहिती व उपयुक्तता सांगण्यासाठी पिंक ऑटो जनजागृती कार्यक्रम बँकेचे मुख्य कार्यालय, दाणा बाजार येथे घेण्यात आला. प्रसंगी अतुल ऑटोचे डिलर विद्याधर नेमाणे, पिंक ऑटो ड्रायव्हर जयश्री शिंदे, रेखा महाजन, इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा निता परमार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला. बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी…

Read More

जळगाव प्रतिनिधी : शहरातील खंडेरावनगर रेल्वे बोगद्याजवळ रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे. आशाबाबानगर रेल्वे बोगदा ते खंडेरावनगर रेल्वे बोगद्यादरम्यान रेल्वेरुळावर अनोळखी महिलेचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची माहिती रामानंदनगर पाेलिसांना मिळाली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल अजित पाटील यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. असे आहे मयत महिलेचे वर्णनमयत महिलेचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष गडद निळ्या रंगाचा टॉप, त्यावर सफेद रंगाची बारीक डिझाइन सफेद रंगाची लॅगीज पँट असे महिलेचे वर्णन…

Read More

सातारात वृत्तसेवा : भाजपाने महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा, असा टोला शंभुराज देसाई यांनी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांचीह खिल्ली उडविली आहे. गेल्या दोन वर्षापासून ठाकरे सरकार पडण्याचे अनेक मुहूर्त भाजपकडून काढण्यात आले आहेत. भाजपने काही दिवसांपूर्वीच आता पुन्हा नवा मुहूर्त काढला. ठाकरे सरकार हे १० मार्चनंतर पडेल असे भाजप नेत्यांकडून सागण्यात येत आहे. मात्र चंद्रकांत पाटलांच्या या विधानाची राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी खिल्ली उडवली आहे. आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि येथून पुढेही हलणार नसल्याचा विश्वास शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. तसेच सेना आमदारांनी निधी…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील आनोरा शिवारात गिरणा नदीच्या पाठात एक अनोळखी तरूणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील अनोरा शिवारात एका रेल्वे रुळाजवळ असलेल्या गिरणा नदीच्या पाटात १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत आनोरा गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब संभाजी पाटील यांनी तात्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पाण्याबाहेर काढून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात…

Read More

ठाणे वृत्तसंस्था । ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचो ओबीसी मेळावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आव्हाड म्हणाले, तुम्हाला चूप बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडा. आपल्यालाही ही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असं सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. कुत्र्यांची गणना होते. मात्र, ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे बैठक इंदिरा गांधी कन्या विद्यालयात नुकतीच संपन्न झाली. दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावयाची असून त्या संदर्भात नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचा अध्यक्षस्थानी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी.एम. पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे नेते संजय महाजन, ॲड. वसंतराव भोलाणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, काँग्रेसचे तालुका युवा प्रमुख चंदन पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पी.एम पाटील यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार व कोरोनाचे काटेकोर पालन करून आपल्याला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करायची असून सर्वांनी शांततेने उत्सव समिती पार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारातील नाल्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी तालुका पोलीसांनी उद्ध्वस्त करून सुमारे ७० हजाराचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले आहे. तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा गावाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात काहीजण बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अशोक महाले, तुषार जोशी, संजय भालेराव यांनी असे पथक तयार करून शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे हा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा बाजार पट्ट्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या एकाची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सुकदेव धनगर (वय-४१) रा. वाटीकाश्रम पाठीमागे जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथील बुधवारचा बाजार असल्याने ९ फेब्रुवारी रोजी रामदास धनगर हे मोटारसायकल (एमएच १९ बीएस २०६२) ने सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पिंप्राळ्यातील सिध्दीविनायक मंदीराजवळ त्यांची दुचाकी पार्क करून लावली. बाजार करून सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून मोटारसायकल मिळाली नाही. अखेर शनिवारी…

Read More

एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल शहरापासून हाकेच्या अंतरावरील राष्ट्रीय महामार्गावर कार आणि कंटेनर यांच्या झालेल्या भीषण अपघातात कारचालकासह एक महिला जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १२ रोजी सायंकाळी वाजेच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, एरंडोल शहर पासून जवळ असलेल्या हॉटेल कृष्णा जवळ कार (एमएच १९ सीव्ही ७७१७) आणि कंटेनर (एमएच ४६ बीबी ८५३२) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कार चालक प्रकाशचंद राजमलजी बागरेचा रा. दुर्वाकुर पार्क, वाघुळदे नगर जळगाव यांच्यासह एक महिला कमलबाई जैन (नाव माहित नाही) जागीच ठार झाले आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । यावल तालुक्यातील वाढत्या घरफोड्या आणि शेती अवजारांच्या चोरीचे प्रमाणे वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन दिले. त्यावर लवकरात तालुक्यात चोरीच्या घटनांवर बंदोबस्त लावणार असल्याचे अश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले. यावल तालुक्यातील अनेक गावात आणि शेतात मागील काही दिवसांपासून घरफोडीचे तसेच शेतातील शेतकऱ्यांची विद्युत केबल चोरीचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढ झालेली आहे. सातत्याने वाढ होत असलेल्या शेती साहीत्य चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना थांबविण्यासाठी यावल पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याकामी तसेच चोरट्यांना लगेच तात्काळ चौकशी करून अटक करावी, अशी मागणी शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी…

Read More