Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना अज्ञात तीन जणांनी दारूच्या नशेत येवून तरूणावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सिंधी कॉलनी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-२५) रा. शिकलकर वाडा, शिरोसोली नाका, तांबापूर हा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास भोलासिंग बावरी हा सिंधी कॉलनीतील चेतन दास हॉस्पिटलजवळी पान टपरीव मित्र सागर हटकर आणि राम हटकर यांच्यासोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अज्ञात तीन जणांनी दारूच्या नशेत येवून काहीही कारण नसतांना तिघांना भोलासिंगला बेदम मारहाण केली. यात एकाने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने…

Read More

फैजपूर प्रतिनिधी ! शहरातील श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या महिला तलाठीचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख १९ हजाराचा मुद्देमाला चोरून नेल्याची घटना उघडकला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, लीना चेतन तळेले रा. खिरोदा ता. रावेर ह.मु. श्रीकृष्ण नगर, फैजपूर ह्या पती चेतन अरूण तळेले यांच्यासह वास्तव्याला आहे. त्या चिनावल येथे तलाठी म्हणून नोकरीला आहे. लिना तळेले यांच्याकडे इतर गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने २६ फेब्रुवारी रोजी फैजपूर येथील घराला कुलूप लावून चिनावल येथे कामाला गेले. अतिरिक्त पदभार असल्यामुळे घरी जाण्यास उशीर होईल म्हणून सासरी…

Read More

यावल प्रतिनिधी । कौटूंबिक कारणावरून संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील थोरगव्हाण येथे सायंकाळी घडली. खून करणारा संशयित पती हा स्वत:हून यावल पोलीसात जमा झाला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. इंदूबाई प्रकाश पाटील (वय-५८) रा. थोरगव्हाण ता. यावल असे मयत महिलेचे नाव आहे.पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील रहिवाशी इंदूबाई पाटील ह्या पती प्रकाश पांडूरंग पाटील (वय-६५), विवाहित मुले आनंद आणि मुकेश यांच्यासह वास्तव्याला आहे. इंदूबाई पाटील आणि प्रकाश पाटील यांच्या गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. रविवार २७ फेब्रुवारी रोजी मुलगा आनंद हा जळगाव…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथे शाळा खोलीच्या बांधकामाचे भूमीपूजन जळके येथील विकासोचे माजी चेअरमन प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वसंतवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच गजमल पवार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, वसंतवाडी तंटामुक्तज्ञ समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण , जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे, जेष्ठ नागरिक बाबु चव्हाण तसेच हंसराज राठोड, रामलाल चव्हाण, प्रविण चव्हाण,ममराज चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. जि.प.सदस्य पवन सोनवणे यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करून शाळा खोलीचे बांधकाम त्वरित सुरू केले. त्यामुळे येथील पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

Read More

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी केले स्वागत लाईव्ह महाराष्ट्र न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जळगाव विमानतळावर विशेष विमानाने आगमन झाले. यावेळी त्यांचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन, आमदार चंदुलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जैन इरिगेशनचे अतुल जैन यांनी त्यांचे स्वागत केले.

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील मुन्नादेवी ॲण्ड मंगलादेवी मल्टिपर्पज फाउंडेशनने विद्यार्थिनींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत पालकत्वाची जबाबदारी पार पाडून अनोखा आदर्श निर्माण केला आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन विद्यार्थिनींच्या पालकांचे नऊ वर्षांपूर्वी निधन झाले होते. अशा अवेळी मायेचे छत्र हरवल्यामुळे या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी संस्थेचे अध्यक्ष जीवनसिंह बयस पुढे सरसावले आणि या विद्यार्थिनींच्या पदवीपर्यंत च्या शिक्षणाची जबाबदारी संस्थेमार्फत स्वीकारली. यापैकी एक विद्यार्थिनी स्वाती अरुण बिसेन हिचे लग्न ठरले असतांना जिवनसिंह बयस यांनी सदर मुलीला लग्नाप्रीत्यर्थ सोनसाखळी भेट स्वरूपात देऊन लग्नापर्यंतचे पालकत्वाचे उत्तरदायित्व पार पाडले. उपक्रमामुळे सर्वत्र अभिनंदनया स्तुत्य उपक्रमाबद्दल समाजातील…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून तिच्यावर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. मुलीचे वय १६ वर्ष असतांना तिची आई व मामाने जामनेर तालुक्यातील साहिल बाशीर तडवी यांच्याशी व्यक्तीशी ६ जून २०२१ रोजी लग्न लावून दिले. दरम्यान, मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतांना साहिल याने वारंवार शारीरीक संबंध ठेवल्याने पिडीता तीन महिन्याची गरोदर राहिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात पती सहील तडवी, पीडीतेची आई, पडितेचा मामा, सासू जमिला…

Read More

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त नवाब मलीक यांना अटक केल्यानंतर एकीकडे भाजपातर्फे मंत्रीपदाची मागणी जोर धरत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून राष्ट्रवादीतर्फे विविध ठिकाणी आंदोलने सुरू केली आहे. यातच राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. चंपाने समोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी खोचक आणि घणाघाती टीका अनिल पाटील यांनी केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आदी उपस्थित होते. आमदार अनिल पाटील हे यापूर्वी भारतीय जनता पक्षात होते. त्यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अमळनेर…

Read More

प्रभारी एच.के. पाटील, पल्लम राजू , ना. बाळासाहेब थोरात, के.सी.पाडवी यांचेसह विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती शिर्डी प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा व डिजिटल सभासद नोंदणी अभियानाचा आढावा सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी 22 रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, मा.केंद्रीय मंत्री पल्लम राजू, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांच्या उपस्थितत स.11वा.. साई सृष्टी मंगल कार्यालय, कोपरगांव रोड, शिर्डी येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना आमदार डॉ तांबे म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देवून बलात्कार केल्याची केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याचे अल्पवयीन मुलीशी ओळख होती. याचा गैरफायदा घेत १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला साबीर शेख हा त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने…

Read More