जळगाव प्रतिनिधी । माहेरहून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील महाबळ परिसरातील माहेर असलेल्या विवाहिता श्वेता राजा हरित (वय-४०) यांचा विवाह वसंत नगर वसई, मुंबई येथील राजा ब्रह्मानंद हरित यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या सुरुवातीला एक आठवड्यानंतर पती राजा ब्रह्मानंद हरित यांनी माहेरहून ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहिता यांना शिवीगाळ व गांजपाठ केला. त्यानंतर विवाहिता यांनी ५० हजाराची पूर्तता न केल्यामुळे पती राजा हरित यांनी शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक छळ केला. यामध्ये सासू आणि…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील भिलपूरा चौकात बेकायदेशीररित्या धारदार चॉपर घेऊन फिरणाऱ्या संशयिताला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील चॉपर हस्तगत केला आहे. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके (वय 26) रा. कांचन नगर जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेच्या दरम्यान शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी राहुल पाटील, सहाय्यक फौजदार रवींद्र बोदडे, इंदल जाधव, अनिल कांबळे हे नाकाबंदीसाठी भिलपूरा चौकात गस्तीवर असतांना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुमारास हिस्ट्रीशीटर असलेला गुन्हेगार राकेश उर्फ लिंबू राक्या चंद्रकांत साळुंके…
जळगाव प्रतिनिधी ।/ जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता समुदाय आधारीत शेतकरी कार्यशाळा उत्साहात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांनी नाविन्याचा ध्यास धरण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की देशात 52 टक्के शेतकरी असून शेतकऱ्यांनी स्वत: नेतृत्व करण्याची गरज असून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता स्वत व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) योजना आधारवड ठरणार आहे. निर्यातक्षम केळी घड व्यवस्थापनासाठी अनुदानित तत्वावर योजना राबविण्यासाठी 7 कोटीचा प्रस्तावास शासनाची…
यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मोहराळा येथे मध्यरात्री एकाने ५० हजार रुपये किंमतीची दुचाकी जाळून टाकण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सुरेश ज्ञानेश्वर गिरी (वय-३२) रा. मोहराळा ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामासाठी (एमएच १९ डीटी ७५४३) क्रमांकाची बजाज प्लॅटीना कंपनीची दुचाकी आहे. दरम्यान, २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान गावातील राहणारा संशयित पंकज साहेबराव पाटील याने ज्वलनशील पदार्थ टाकून दुचाकी पेटवून दिली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली…
भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात राहणारा आणि रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगाराला एका वर्षासाठी हद्दपार केले आहे. यामुळे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ बाजारपेठ पोलीस हद्दीत राहणारा आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल राजू टाक रा. जामनेर रोड, वाल्मिक नगर, भुसावळ याच्याविरोधात मार्च २०१९ मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांच्याकडून मार्च २०१९ मध्ये पोलीस कायदा कलम ५६ अन्वये हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून प्राथमिक चौकशीकामी हा अहवाल उपविभागीय पोलिस अधिकारी भुसावळ यांच्याकडे देण्यात आला. गुन्हेगार विशाल राजू टाक याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्याची चौकशी केल्यानंतर…
प्रतिनिधी गौरव पाटील। तालुक्यातील साळवा येथील संविधान रक्षक दल चौकात भीम आर्मी या सामाजिक संघटनेत अनेक तरूणांनी प्रवेश केला आहे. याप्रसंगी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम प्रधान, जिल्हा संघटक डॉलीभाऊ वानखेडे, जिल्हा सचिव राजू इंगळे यांच्या उपस्थितीत २४ फेब्रुवारी रोजी सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. राज्य सचिव मा.सुपडू भाऊ संदानशिव यांनी सूत्रसंचालन केले व महाराष्ट्र राज्य प्रमुख रामकांत तायडे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे यांनी “भीम आर्मी” जळगांव जिल्हा युनिट ची आजवरची वाटचाल आपल्या भाषणातून विशद केली. तालुक्यातील साळवा येथे भीम आर्मी संविधान रक्षा दलाच्या वतीने बुध्द विहार येथे बुध्दांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. व गावातील…
वॉशिंग्टन वृत्तसेवा । कौटुंबिक वादातून माजी नवऱ्याला आईने गोळी घालून हत्या केली. यात गुन्ह्यातील आईला अटक करण्यात आली. यामुळे पाच मुलं उघड्यावर पडली. अशावेळी या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यातील ‘आई’ जागी झाली. पोलिस अधिकारी निकोलस क्विंटाना यांनी पाचही मुलांना दत्तक घेतले. याबाबत माहिती अशी की, लास वेगासमध्ये राहणारी ४० वर्षीय एमिली एज्रा या महिलेने तिचा घटस्फोटित पती पॉल याची गोळ्या घालून हत्या केली होती. दोघांमध्ये काही कारणावरुन वादावादी झाली. त्यानंतर संतापाच्या भरात महिलेने पहिल्या नवऱ्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. १४ जानेवारी २०२२ रोजी ही घटना उघडकीस आली. पोलीस अधिकारी निकोलस जेवायला बसत असताना एका खुनाच्या प्रकरणाबाबत त्यांना फोन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहाारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेबर ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान संशयित अल्पवयीन मुलगा याने मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पडित मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…
धरणगाव प्रतिनिधी । शहरातील दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर झालेल्या सभेत मान्यवर महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ही घटना शहराच्या लौकीकाला काळीमा फासणारी असून पीडित बालिकांना न्याय न मिळाल्यास आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहरातील विविध संघटनांच्या महिला व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासह अत्याचार करणा-या नराधमला कडक शासन होण्याच्या मागणीसाठी धरणगाव शहरात मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सकाळी आठ वाजेपासून बालाजी मंदिरापासून या मुकमोर्चाला सुरुवात झाली व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप…
जळगाव प्रतिनिधी । सावखेडा शिवार कोल्हे हिल्स परिसर, वाघनगरातील स्थानिक रहिवाशी यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवार कोल्हे हिल्स परिसर, वाघनगर या भागात वस्त्या वाढल्या आहेत. मात्र आठ दहा वर्ष उलटूनही या ठिकाणच्या नागरिकांपर्यंत पाणी पोहोचलेला नाहीये. निवडणुका होतात आश्वासनच आश्वासनांचा पाऊस पडतो मात्र पाण्याची समस्या काही दूर झालेले नाही. पाणीपुरवठा योजना नाही, नागरिकांना नळकनेक्शन मिळालेलं नाही. पाणीटंचाईमुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत असून पाणीटंचाई दूर करावी तसेच पाण्याची पर्यायी योजना उपलब्ध करावी या मागणीसाठी नागरिकांसह महिलांनी जिल्हाधिकारी…

