लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये शिरुन तेथे झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर लैंगित अत्याचार करणारा राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-२२, रा.जळगाव )या नराधमास जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंडातील ७० हजार रुपये हे पिडीतेला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयाने मंगळवारी १५ फेब्रुवारी रेाजी हा निकाल दिला आहे. जळगाव शहरातील एका भागात आपल्या पालकांसह चिमुकली शेडमध्ये वास्तव्याला होती. १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी राणासिंग जुन्नी याने घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने शेडच्या दरवाजाची आतील कडी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील ७५ वर्षीय वायोवृध्द घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. कुणाला आढळून आलल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.बाबुराव तोताराम राखुंडे (वय-७५) रा. वसंतवाडी (जळके) ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाबुराव राखुंडे हे कुणाला काहीही न सांगत १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले आहे. कुणाला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे संपर्क क्रमांकसिताराम राखुंडे – 7385440436सागर ठोसर – 8390304017ललित भटकर – 9511973505किरण सुरवाडे- 9284908668
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय समाज पक्षाकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आदी सर्व निवडणुका कोणत्याही मदतीशिवाय लढविणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी आज पत्रकार परिषदेत घोषित केले आहे. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आले. जळगाव जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे नियुक्त प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांचा सत्कार समारंभ बळीराम पेठेतील पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा शेवते यांनी केले. याप्रसंगी राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, अजित पाटील, राजेंद्र पोथाडे, डॉ. प्रेमराज पळशीकर, जिल्हा प्रभारी प्रा. विठ्ठलराव शिंगाडे, समाधान पाटील, संतोष बंजारी,…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणा येथे जुन्या वादातून आठजण मोठमोठ्याने आवाज करून झोंबाझोंबी केल्या प्रकार रात्री घडला. याप्रकरणी पोलीसांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाने गावात ग्रामपंचायतीसमोर स्टॉपवर एकमेकांची खुन्नस व उणेदुणे काढुन सात ते आठ जण मोठमोठ्याने आरडाओरड तसेच शिवीगाळ करत हाणामारी करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून हाणामारी करणारे श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी , रावसाहेब गोपाल चौधरी, सागर गोपाल चौधरी, मनीष नरेंद्र पाटील, शाम नरेंद्र पाटील, नरेंद्र पोपट…
जळगाव प्रतिनिधी । मुक्ताईनगरातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दुचाकी, लॅपटॉप, होम थिएटर आणि रोकड असा एकुण २३ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप धनसिंग पाटील (वय-४८) रा. मुक्ताईनगर बंधु जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. दिलीप पाटील हे सोमवार १४ फेब्रुवारी रोजी कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील लॅपटॉप, होम थीएटर, बाहेर लावलेली दुचाकी (एमएच १९ एटी २९०८) आणि रोकड असा एकुण २३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीला आले.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नशिराबाद येथील गायत्री पेपर मिल नावाच्या पुठ्ठा फॅक्टरीतून निघालेला ट्रकच्या कॅबीनला बॅटरीच्या शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना नशिराबाद टोल नाक्याजवळ सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने ट्रक थांबवून कॅबिनमधून दोघांनी उडी घेतल्याने सुदैवाने बचावले आहे. ट्रकच्या आग लागल्याचे कळताच जवळ असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचारी आणि नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून आग विझविण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाका आणि जयभोले हॉटेलदरम्यान असलेल्या गायत्री पेपर मिल नावाची पुठ्ठा फॅक्टरी आहे. धुळे येथून पुठ्ठा घेवून आलेला ट्रक (एमएच १८ एम ९६२) हा सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी…
जळगाव प्रतिनिधी । यावल शहरातील बुरुज चौकात धारदार चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणाला यावल पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातील बुरुज चौकात रविवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास एक तरुण हातात लोखंडी धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार यावल पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी देवानंद बाळू सपकाळे (वय ३५) रा. किल्ला झोपडपट्टी शिवाजी नगर, यावल याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ असलेला धारदार चाकू हस्तगत केला आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांची या गुरुवारी डबल सेंचुरी पार केली. आठव्या गुरुवारी देखील 25 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करून 200 चा आकडा पार केला. रुग्णालयातर्फे सवलतीच्या दरात या शस्त्रक्रिया केल्या जात असून, अवघ्या 2500 रुपयात मोतीबिंदू, तर अवघ्या 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे.गावागावात या अभियानाची माहिती झाली असून शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी करून घेण्यासाठी रुग्णांचा प्रचंड ओघ रुग्णालयात दररोज सुरू आहे. येथे अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांनी आपली आर्थिक बचत करण्यासाठी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनाने…
रायसोनी महाविध्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीची प्राध्यापक-पालक सभा संपन्न जळगाव प्रतिनिधी: शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. प्राध्यापक-पालक सहविचार सभेचे आयोजन करीत असताना विद्यार्थी हित आणि महाविद्यालयाची वाटचाल याचा विचार करण्याची संधी मिळते असे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयात शिक्षक पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा व अभियांत्रिकी प्रथमवर्ष विभागप्रमुख प्रा. जितेंद्र वढदकर यांची उपस्थिती होती.डॉ. प्रिती अग्रवाल पुढे म्हणाले कि, कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण क्षेत्रात असंख्य अडचणी निर्माण झाल्या विद्यार्थी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील भालोद येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून राहत्या घरातील वरच्या माजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ललित जनार्दन परतणे (वय-४५) रा. चिखली दरवाजाजवळ, भालोद ता.यावल जि.जळगाव असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. फैजपूर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ललित परतणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. या आजारामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता. त्यामुळे रविवार १३ फेब्रुवारी रोजी ललित परतने यांनी राहत्या घरात असलेल्या पहिल्या मजल्यावर दोरीने छताच्या हुकाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या…

