प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील बिलवाडी गावात दारू विक्री बंद करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून महिलांची मागणी होती. दरम्यान आज शुक्रवारी गावातील महिला एकत्र येवून दारू बंदीसाठी आक्रम पवित्रा घेतला आहे. याबाबत माहिती अशी की, बिलवाडी हे गाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील म्हसावद पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात येणारे छोटेसे गाव आहे. याठिकाणी गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील तरुण तसेच नागरीक हे दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे येथील महीलांची तक्रार आहे. त्यासाठी गावातील महिला एकत्र आल्या व त्यांनी गावठी दारुची विक्री बंदसाठी आक्रमक भूमिका घेत दारु विक्रेत्यांना दारु न विकण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह पथकाची धडक कारवाई चोपडा प्रतिनिधी। कर्जबाजारी झालेल्या तरूणाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून चक्क चार बिघे शेतात अफूची लागवड केली. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कारवाई केली आहे. शेतातील सततची नापीकीमुळे कर्जबाजारी झालेल्या तरूणाने चक्क शेतात चार बिघे अफूची लागवड केली आहे. प्रकाश सुदाम पाटील रा. वाळकी ता. चोपडा असे तरूणाचे नाव आहे. प्रकाश हा नापीकीमुळे कर्जबाजारी झाला होता. कमी वेळी जास्त पैसे कमविण्याचे वेगवेगळे अकलेचे तारे तोडू लागला. त्याने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून अफूची लागवड कशी करावी याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार त्याने त्याच्या पाच बिघे शेतापैकी चार बिघे शेतात…
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गिरणा, तापी, वाघुरसह अन्य नदी, नाले, ओढे आदी ठिकाणच्या सुमारे १४५ च्या वर वाळू घाट आहेत, यापैकी ३४ ठिकाणच्या वाळू घाटांच्या लिलावास मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्य्यात असून लिलाव प्रक्रियेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघुर आदी नदी नाले, ओढ्यातील वाळू साठा उचलण्यासाठी यावर्षी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या वर्षी २१ वाळूघाटांचे लिलाव झाले होते त्यापैकी ८ घाटांसाठीच निविदाकारानी अनामत रकमेचा भरणा केला. त्यामानाने अनेक वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उचल झाली आहे, पर्यावरणाचा ह्रास रोखण्यासह वाळू घाटांच्या लिलावातु शासनाला महसूल…
बामणोदच्या रुग्णाचे वाचले प्राण, वैद्यकीय पथकाचे यश जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. शस्त्रक्रिया झालेल्या या रुग्णाला बुधवार दि. २ मार्च रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. भरत देवराम तायडे (वय ४०, रा. बामणोद ता. यावल) यांना पोटात दुखणे, पोट फुगणे, सारखा अपचनाचा त्रास, उलट्या होत राहणे, वजन कमी होणे अशा प्रकारचे विविध त्रास होते. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागामध्ये तपासणी केली. तपासणीमधून त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार शल्यचिकित्सा विभागातर्फे…
जळगाव प्रतिनिधी । विशेष लेखा परिक्षक असल्याचे भासवून काजू, बदाम आणि गावरानी तूप प्रत्येकी विस किलो प्रमाणे ड्रायफूटचा एकुण ४३ हजाराचा मुद्देमाल घेवून दुकानदाराची केली आहे. आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हापेठ पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हापेठ परिसरातील रसाळ चेंबर्स लेवा बोर्डिंग समोर अजय रतनसी सोनी (वय-५८) हे वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्यांचे सोनी ड्रायफूट व जनरल स्टोअर्स नावाचे त्यांचे दुकान आहे. ६ मार्च २०१८ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सोनी व त्यांचा भाऊ संजस रतनसी हे दोघे दुकानात असतांना कैलास फकिरा बिरारे, रा. पोखरण रोड, ठाणे या नावाचा व्यक्ती आला. शासनाचा विशेष…
जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीतील २१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनीतील हनुमान नगरातील रहिवासी ज्ञानेश्वर पाटील हा तरुण फुले मार्केटमधील एका भांड्याच्या दुकानावर कामाला होता. दरम्यान, घरात कोणीच नसल्याने ज्ञानेश्वर याने घरात छताला नायलॉनच्या दोरीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांनी त्यालाखाली उतरवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागातील तरूणीचे व्हॉट्सअॅपद्वारे अश्लिल व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागातील २२ वर्षीय तरूणीचे चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तरूणाने एकेदिवशी तरूणीला तिच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे व्हिडिओ कॉल केला. यात तरूणाने तरूणीला अंगावरचे संपूर्ण कपडे काढण्यास सांगितले. तरुण जसे सांगेल तसेच तरुणीने त्यास करून दाखविले. हा संपूर्ण प्रकार तरूणाने रेकॉर्ड केला व तयार अश्लील व्हिडिओ त्याच्या मित्राला व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला. या प्रकाराने तरुणीची बदनामी झाली. अशी तक्रार तरुणीने मंगळवार…
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव प्रतिनिधी । कांचन नगरातील ४८ वर्षीय प्रौढाने कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रमेश सुकलाल राजपूत (वय ४८) रा. काचन नगर जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, रमेश राजपूत हे बुधवारी २ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले होते. अन्य कर्मचाऱ्यांसोबत शिलाईसाठी बारदान त्यांनी काढले. यावेळी “मला जरा बरे नाही वाटत, मी आत जाऊन झोपतो” असे म्हणून रमेश राजपूत हे दुकानाच्या आत मध्ये गेले. बाकी कर्मचारी हे बाहेर…
जळगाव प्रतिनिधी । प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रामदास कॉलनीतील ओंकारेश्वर मंदीर परिसरात महाशिवरात्री महोत्सवनिमित्त मंगळवार १ मार्च रोजी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. बारा ज्योर्तिलिंगम् दर्शन, शिव प्रतिज्ञा, शिव तांडव नृत्यांनी भाविकांचे प्रबोधन झाले. ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयात सकाळी शिवध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्री महाजन, मेजर नाना वाणी, लताताई भोईटे, धीरज सोनी, अॅङ नितीन चव्हाण, अॅङ अनुराधा वाणी, मधुकर भाई सोनार उपस्थित होते. व्यसनमुक्त, विकारमुक्त समाज घडविण्यासाठी शिवप्रतिज्ञा या प्रसंगी मिनाक्षीदीदी यांनी उपस्थितांना दिली. यावेळी शिव महोत्सवात भगवान शिवाचे भावस्वभाव साकारणारे शिव तांडव नृत्याचे यर्थार्थ नृत्य कु. खुशी हीने या प्रसंगी सादर करुन भाविकांचे…
एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी । शहरातील पांडे डेअरी चौकात बेकायदेशीर गावठी कट्टा घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपी पवन उर्फ माठ्या केशव गावळे (वय-२४) रा. संभाजी चौक, शिवाजी नगर याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातील १५ हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पांडे डेअरी चौकात तरूण हातात गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मिलींद सोनवणे यांना गोपनिय माहिती मिळाली. मंगळवार १ मार्च रोजी सायंकाळी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, पोहेकॉ मिलींद सोनवणे, पो.ना. विकास सातदिवे, सचिन पाटील, छगन तायडे…

