Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रविण पाटील प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे ग्राम सुरक्षा दल स्थापनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे म्हणाले की, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करतांना तरुणांची सदस्य म्हणून निवड करतांना सदर तरुणांनवर कोणताही गुन्हा दाखल नसावा किंवा गुन्हेगार प्रवृत्तीचा नसावा, ग्राम सुरक्षा दलात सर्व जाती धर्माचे सदस्यांचा समावेश असावा, ग्राम सुरक्षा दलात काम करणाऱ्या तरुणांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपयोगी साहित्य जसं शिटी, काठी व टिसर्टसाठी मदतीच आवाहन केले. यावेळी म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सर्व गावातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी व तरुण यांना ग्राम सुरक्षा स्थापनेचे उद्देश ग्राम सुरक्षा दलाचे कार्याविषयी…

Read More

प्रविण पाटील प्रतिनिधी । मनमाड ते जळगाव दरम्यानच्या तीसऱ्या रेल्वे रूळाचे काम सुरू असल्याने म्हसावद येथील रेल्वे गेट बंद राहणार आहे. याबाबत वाहनधारकांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे गेटजवळ मनमाड ते जळगाव या तीसऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान म्हसावद रेल्वे गेट हे बुधवार ९ मार्च रोजी सकाळी ६ ते १० मार्च रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान पुर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाने जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकासह संबंधित विभागाला पत्र देवून कळविण्यात आले आहे. एरंडोल जामनेर रस्त्यावरील वाहतूक जळगाव मार्गे वळविण्यात आले आहे. याबाबत वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन…

Read More

जळगाव – प्रतिनिधी । शेतकऱ्याकडून केळी घेवून मोबदला न देता १ लाख ८ हजाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी व्यापाऱ्यासह एकावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव तालुका पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील भोकर येथील रहिवासी रतीलाल दगा पाटील (वय ६५) हे वास्तव्यास असून ते शेती करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांची भोकर शिवारातील गट नंबर ४३९ येथे असलेल्या शेतीत त्यांनी केळीची लागवड केली होती. गावातील सुरेश बाळू पाटील यांनी त्यांच्या ओळखीतील रावेर तालुक्यातील सावदा येथील व्यापारी जयराम श्यामलाल पूरभी यास केळी विकत देण्याचे रतिलाल पाटील यांना सांगितले. त्यानुसार व्यापारी जयराम पुरभी यांनी रतीलाल पाटील यांचा…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत २४ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी आकाश संजय काळे याने २४ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानुसार तरूणीला भुसावळ शहरातील एका हॉटेलमध्ये २६ फेब्रुवारी रोजी घेवून गेला. मध्यरात्री तिच्यावर तीन वेळा शरिरीक संबंध प्रस्तापित करून अत्याचार केला. तरूणाचे दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा देखील झाला असतांना त्याने तरूणीवर अत्याचार केला आहे. पिडीतेने भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पष्टाणे खुर्द येथे धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. धरणगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे ५ मार्च ते ११ मार्च यादरम्यान पष्टाने खुर्द या गावात करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन भारतीय लष्करातील माजी सैनिक किशोर पाटील यांच्या हस्ते आणि प.रा. हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सरपंच व इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते. या सोबतच पष्टाणे खुर्द चे माजी सरपंच श्री किशोर निकम व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव…

Read More

जळगाव प्रतिनिधी । सीसीटीव्ही चेक करण्याच्या कारणावरून तीन जणांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना एमआयडीसी हद्दीतील प्रभात रेस्टॉरंट येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, महेश विष्णू मोरे रा. रिंगरोड जळगाव यांचे एमआयडीसी हद्दीतील सर्वोदय पेट्रोल पंपाच्या बाजूला प्रभात रेस्टॉरंट आणि भरती सेंटर नावाचे दुकान आहे. दुकानावर त्यांचे मेहूण हेमंत पुरूषोत्तम पाटील रा. गुरूकुल सोसासटी जळगाव हे देखील काम पाहतात. सोबत वेटर हर्षद पटेल आणि विज नावाचे कामगार हे त्यांना मदत करतात. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. गुरूवारी ३ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास धुकडू सपकाळे (पुर्ण नाव…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील बिलवाडी गावात दारू विक्री बंद करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून महिलांची मागणी होती. दरम्यान आज शुक्रवारी गावातील महिला एकत्र येवून दारू बंदीसाठी आक्रम पवित्रा घेतला आहे. याबाबत माहिती अशी की, बिलवाडी हे गाव औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या हद्दीतील म्हसावद पोलिस चौकीच्या कार्यक्षेत्रात येणारे छोटेसे गाव आहे. याठिकाणी गावठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील तरुण तसेच नागरीक हे दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे येथील महीलांची तक्रार आहे. त्यासाठी गावातील महिला एकत्र आल्या व त्यांनी गावठी दारुची विक्री बंदसाठी आक्रमक भूमिका घेत दारु विक्रेत्यांना दारु न विकण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत ग्रामपंचायत सदस्य…

Read More

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्यासह पथकाची धडक कारवाई चोपडा प्रतिनिधी। कर्जबाजारी झालेल्या तरूणाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून चक्क चार बिघे शेतात अफूची लागवड केली. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शुक्रवारी ४ मार्च रोजी सकाळी कारवाई केली आहे. शेतातील सततची नापीकीमुळे कर्जबाजारी झालेल्या तरूणाने चक्क शेतात चार बिघे अफूची लागवड केली आहे. प्रकाश सुदाम पाटील रा. वाळकी ता. चोपडा असे तरूणाचे नाव आहे. प्रकाश हा नापीकीमुळे कर्जबाजारी झाला होता. कमी वेळी जास्त पैसे कमविण्याचे वेगवेगळे अकलेचे तारे तोडू लागला. त्याने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून अफूची लागवड कशी करावी याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार त्याने त्याच्या पाच बिघे शेतापैकी चार बिघे शेतात…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गिरणा, तापी, वाघुरसह अन्य नदी, नाले, ओढे आदी ठिकाणच्या सुमारे १४५ च्या वर वाळू घाट आहेत, यापैकी ३४ ठिकाणच्या वाळू घाटांच्या लिलावास मान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्य्यात असून लिलाव प्रक्रियेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. जिल्ह्यात तापी, गिरणा, वाघुर आदी नदी नाले, ओढ्यातील वाळू साठा उचलण्यासाठी यावर्षी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्वेक्षण अहवालानुसार गेल्या वर्षी २१ वाळूघाटांचे लिलाव झाले होते त्यापैकी ८ घाटांसाठीच निविदाकारानी अनामत रकमेचा भरणा केला. त्यामानाने अनेक वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उचल झाली आहे, पर्यावरणाचा ह्रास रोखण्यासह वाळू घाटांच्या लिलावातु शासनाला महसूल…

Read More

बामणोदच्या रुग्णाचे वाचले प्राण, वैद्यकीय पथकाचे यश जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये मोठ्या आतड्याच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच पार पडली. शस्त्रक्रिया झालेल्या या रुग्णाला बुधवार दि. २ मार्च रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला. भरत देवराम तायडे (वय ४०, रा. बामणोद ता. यावल) यांना पोटात दुखणे, पोट फुगणे, सारखा अपचनाचा त्रास, उलट्या होत राहणे, वजन कमी होणे अशा प्रकारचे विविध त्रास होते. त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शल्यचिकित्सा विभागामध्ये तपासणी केली. तपासणीमधून त्यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान झाले. त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार शल्यचिकित्सा विभागातर्फे…

Read More