जळगाव प्रतिनिधी । मोहाडीरोडवर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीच्या मागे असलेल्या सुजय गणेश सोनवणे (वय१३) रा. मोहाडी ता.जि.जळगाव या मुलाचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना घटनाच नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेवून प्रचंड आक्रोश केला होता. याबाबत माहिती अशी की, सुजय सोनवणे हा मुलगा आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान सेंट टरेसा शाळेतून घरी जात होता. त्यावेळीगावाजवळ असलेल्या उताराजवळ (एमएच २८ बी ७७०३) या क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या (एमएच १९ डीएम १११) या क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुजयचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून तेथे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, गणपतीनगरातील किराणा व्यावसायिक प्रकाश भिला वाणी (वय ६४) हे १७ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा अमित वाणी याच्यासोबत त्यांच्या (एम.एच.१९ बी.एफ.१५९९) क्रमांकाच्या दुचाकीवरून गावात आले होते. काम आटोपल्यावर घरी चित्रा चौकातून शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात असताना भोरटके झेरॉक्स सेंटर समोर त्यांच्या दुचाकीला (एम.एच.१९.ए.पी.२४४८) या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या प्रकाश वाणी यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.…
जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीचे लोंखडी अँगल व प्लेटा चोरून नेले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मोकळ्या जागेवर लोखंडी ॲगल आणि लोखंडी प्लेट व इतर बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले होते. हा सामान ७ मार्च ते १७ दरम्यात तिथेच पडून होता. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १० हजार रूपये किंमतीचे लोखंडी प्लेटा आणि लोंखडी अँगल असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुभम किशोरराव चिमोटे (वय-२६) रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ भुसावळ यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून…
जळगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी कार्यरत असणारा दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सर्व कर्जदारांना मार्चअखेर कर्जभरणा करण्यासाठी आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यात दगडी बँक अर्थात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी मार्च अखेर पर्यंत कर्जभरणा करण्याची साठी बँकेच्या सर्व शाखा सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आला आहे. शिवाय तसेच बँक कर्ज भरण्यासाठी दि. २६ व २७ मार्च या सुट्टीच्या दिवशीदेखील बँकेच्या सर्व शाखा सुरु राहणार आहेत. तरी सर्व कर्जदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज भरणा वेळेत करुन, बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन जेडीसीसी बँकेमार्फत करण्यात आले आहे.
प्रविण पाटील प्रतिनिधी । विटनेर रस्त्यावर डोक्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत खाजगी बँक व्यवस्थापककडून बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा एकुण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार विटनेर गावाच्या रस्त्यावर घडला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेषराव पाढाळे (वय-२६) रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि.औरंगाबाद ह.मु. हिवरखेडा रोड जामनेर हे जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात एनबीएफसी या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमण्यात आलेला आहे.…
जळगाव – प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या कृष्णा गार्डनसमोरून तरूणाची दुचाकी लांबविली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील रायपुर येथे दिलीप शिवदास गोपाळ (वय २८) हा तरुण राहतो. शनिवार १९ मार्च रोजी हा तरुण एमआयडीसी परिसरातील कृष्णा गार्डन हॉटेल परिसरात आला होता. यादरम्यान त्याने त्याची (एमएच १९ सीएम ०६४५) या क्रमांकाची दुचाकी कृष्ण गार्डनसमोर उभी केली. काम आटोपल्यावर पुन्हा घराकडे जाण्यासाठी तरुण निघाला असता उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. दोन दिवस दुचाकीचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने अखेर दिलीप गोपाळ याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून सोमवारी…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील चंदू अण्णा नगरात घरासमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरीप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल ज्ञानेश्वर पाटील (वय-३०) रा. चंदूअण्णा नगर हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता ते दुचाकीवरून कामावरून घरी आले. त्यावेळी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी (एमएच १९, सीडी २२०३) क्रमांकाची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार २० मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता उघडकीला आला. प्रफुल्ल पाटील यांनी परिसरात दुचाकीच्या शोधाशोध केली परंतु…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील महात्मा गांधी मार्केटमधील एका दुकानावरून अज्ञात चोरट्याने रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ९७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय गंगाधर विसपुते सोनार (वय-५०) रा. सद्भावना व्यसनमुक्ती केंद्रजवळ, मयूर कॉलनी, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला आहे. ते जळगाव शहरातील गांधी मार्केट शेजारी असलेल्या ओम एजन्सी दुकानावर सोनाराचे कारागीर म्हणून कामाला आहे. २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानातील गल्ल्यातून २२ हजार रुपयांची रोकड आणि ७५ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ९७ हजार ८०० रुपये…
जळगाव प्रतिनिधी । पहूर रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ मटका खेळ खेळणाऱ्या एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव ते पहुररोड वरील इंडियन पेट्रोल पंपाजवळ गणेश मुरलीधर महाजन रा. आनंद नगर, जामनेर ह.मु. शिव कॉलनी जळगाव हा व्यक्ती मिलन मटका नावाचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर असे पथक रवान झाले. पहूर रोडवरील इंडियन पेट्रोल पंपाजवळील एमएसईबी कंपाऊंड भिंडीच्या आडोश्याला लोकाकडून पैसे घेवून जुगार खेळतांना…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक संघाने गुणवंत शिक्षकासाठी वसंतराव नाईक जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम जळगाव जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय याठिकाणी संपन्न होणार आहे. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १३ गुणवंत शिक्षकांची निवड निश्चित केली आहे. त्यात पुढील शिक्षकांचा समावेश आहे. गजानन रामदास पाटील- माध्यामिक शाळा कुरवेल, डॉ.जगदिश लक्ष्मण पाटील- डी.एस.हायस्कुल भुसावळ, नितीन लक्ष्मण कोष्टी ला.ना.हायस्कुल जळगाव, प्रमोद भिका पाटील आश्रमशाळा मांडवे दिगर ता.भुसावळ,अजय तुळशिराम हटकर आश्रमशाळा कुऱ्हा काकोडा, डॉ.नरेंद्र दिनकर महाले सरस्वती विद्यालय,यावल, योगेश बाबुराव बनकर माध्यामिक विद्यालय धामोडी ता.रावेर, अशोक रामदास वानखेडे आश्रमशाळा शेंगोडा ता.जामनेर, विजय रामदास महाजन जि.प.शाळा न्हावे ता.चाळीसगाव, विजय बाळु बाऱ्हे…

