Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

फैजपूर शहरातील कासार गल्लीतील राहणारा तरूण सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून निघून गेला आहे. नातेवाईकांकडून त्याचा शोधाशोध सुरू आहे. याबाबत अद्याप फैजपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नाही. याबाबत माहिती अशी की, आदित्य तुळशीराम काठोके (वय-१८) रा. कासार गल्ली, फैजपूर हा तरूण आपल्या आई वडील आणि बाहिणीसोबत वास्तव्याला आहे. आदित्य सध्या जळगाव येथील शासकीय आयटीआय शिक्षण घेत आहे तर वडील तुळशीराम काठोके हे प्लॉट खरेदी व विक्री करण्याचे काम करतात. दरम्यान, सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अदित्य काठोके हा घरात कुणाला काहीही न सांगता त्याचा मोबाईल आणि चिठ्ठी लिहून घरातून कपड्यांची बॅग…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाल २० मार्च रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे सोमवारी २१ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य सभापतींची वाहने प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपुष्टात आला असून बऱ्याच ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट, गणाच्या प्रारूप आराखडा रचनादेखील प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येऊ नयेत यामागणीवरून राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या नव्याने अध्यादेश पारित केला. या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन जयपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाच्या कर्णधारपदी आकाश धनगर यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल जयकीसनवाडी येथील कांताई सभागृह येथे जैन स्पोर्टस ॲकडमीतर्फे अभिनंदन करण्यात आले. आकाश धनगर हे ३ राष्ट्रीय व ८ वेळा राज्यस्तरीय तसेच सलग पाचवेळेस विद्यपीठ प्रतिनिधित्व करण्याचं मान मिळवला आहे. सलग 3 वर्षे त्यांच्याकडे विद्यापीठ कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. विद्यापीठ संघात आकाश धनगर सोबत नंदुरबार येथील वैभव बोरसे, ऋषिकेश सोनार, गौरव सोनार, ऋतिक पाटील अमळनेर याचे सहभाग आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खाजिनदार फारूक शेख यांच्या अध्यक्षते खाली…

Read More

जळगाव प्रतिनिधी । गुरांना चारा कापण्यासाठी गेलेल्या म्हसावद येथील लोटन देवराम महाजन (वय-६०) या वृध्दाचा विजेच्या धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २० मार्च रोजी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोटन देवराम महाजन (वय-६०) असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रहिवाशी लोटन महाजन हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शनिवार १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते गुरांना चारा कापण्यासाठी म्हसावद शिवारातील शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील चारा कापत असतांना बाजूला पडलेल्या विद्यूत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोडवरील पांडुरंग टॉकीजमधील आनंद लॉजमध्ये पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या विशेष पथकाने सोमवार, 21 रोजी दुपारी अचानक छापा ५ पाच वेश्यांसह जिल्ह्यातील ५ आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस पथकाने छापा टाकला. यात पोलिसांच्या पथकाने लॉजमधून पाच वेश्यांसह पाच आंबटशौकीन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे शिवाय अनैतिक व्यवसाय सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेल मॅनेजरसह मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

Read More

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहिता माहेरी जात असल्याचे सांगून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबत यावल पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रहिवाशी प्रिती योगेश नेमाडे (वय-२८) या विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता अंजाळे ता. यावल येथे माहेरी जाते असून घरातून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या माहरी घरी न पोहचल्याने पती योगेश नेमाडे यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र, ती कुठेच मिळून न आल्या नाही. दरम्यान, पती योगेश नेमाडे यांनी सोमवारी २१ मार्च रोजी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली.…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । संत तुकाराम महाराज बिजनिमित्त शहरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, लहान माळी वाडा परीसरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम किर्तन सप्ताह साजरा झाला. सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीत विठू माऊली – आई रखुमाई यांच्या मूर्ती तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज यांची प्रतिमा होती. पालखीच्या समोर गावातील व परिसरातील असंख्य युवक तसेच भाविकांनी सवाद्य लेझीम पथकातून सहभाग नोंदवला. लेझीम च्या माध्यमातून विविध प्रकारचे लेझीम प्रकार शिस्तबद्ध रीतीने खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवकांचा उत्साह, शिस्त, आनंद…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशिराबाद पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ शुक्रवार १८ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही घरी एकटी होती. दरम्यान, संशयित आरोपी भुषण तुकाराम कोळी रा. डांभुर्णी ता. यावल याने तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील यांनी दिली आहे. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कोठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी रविवारी २० मार्च रोजी नशिराबाद…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियान संदर्भात धरणगाव येथे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत प्रमुख विषय राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानास प्रत्येक गावा, गावात जाऊन सभासद नोंदणी अभियान करणे, आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहराच्या प्रत्येक वार्डात राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल‌ यासाठी तयारी करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गण, गटात बैठाका लावणे, त्यात गावा, गावात युवक शाखा ओपनिंग करणे, गण-गटात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करणे याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या…

Read More

पारोळा प्रतिनिधी । शेतीची वाटणी हवी आहे या मागणीसाठी पोटच्या मुलाकडून आई-वाडीलांना शिवीगाळ करून काठीचने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात मुलासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशरथ राजाराम पाटील (वय-८५) रा. शिरसमण ता. पारोळा जि.जळगाव हे आपल्या पत्नी साखरबाई सह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा महादू दशरथ पाटील हा पत्नी व मुलांसह वेगळा राहतो. दरम्यान, शेती नावावर करून द्यावी अशी मागणी मुलगा महादू याने आईवडीलांकडे तगादा लावला होता. शेती नावावर करत नसल्याच्या रागातून महादू दशरथ पाटील याने १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता आईवडील…

Read More