धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत. पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव – प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने युवती सभेचे अंतर्गत एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे डॉ. सुनिता चौधरी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर . बी. वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियांका ब-हाटे , युवतीसभा प्रमुख प्रा. देवयानी पाटील हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगत नातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर बी वाघुळदे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी या एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. युवतींचे…
भुसावळ प्रतिनिधी । तू लठ्ठ आहे, तू मला आवडत नाही असे सांगून लग्नापुर्वीच भावी पतीसह त्याच्या आईकडून हुंड्यांचा पैशांची मागणी व लग्न मोडण्याच्या धमकी दिली. याला कंटाळून तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याबाबत कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे येथील माजी सरपंच रविंद्र नागपुरे हे आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. ६ मार्च रोजी त्यांची मुलगी रामेश्वरी हीचा भुषण पाटील (मूळचे रावेर, ह.मु. नाशिक) याच्यासोबत साखरपुडा झाला होता. दि. ११ मे रोजी लग्नाची तारीख निश्चित केली होती. लग्नात मुलाकडच्यांना हुंड्यात ३ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख असे कबुल केले होते. भावी पतीकडून त्यांना हुंड्यातील सोने व पैशांची…
जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथील विकास कामांचा ठेका घेवूनही काम न करणाऱ्या ठेकेदाराला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसंदर्भात विरेंद्र कुमार पाटील याला कामाचा मक्ता दिला होता. या कामासाठीचे ५ लाख ५७ हजार १०० रुपये वीरेंद्र कुमार याने घेतले मात्र प्रत्यक्ष विकासकामांसाठी लागणारे साहित्य पुरवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी विरेंद्रकुमार राजेंद्र पाटील रा. मायादेवी मंदिरामागे महाबळ याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच वर्षभरापासून संशयित वीरेंद्रकुमार हा फरार होता. संशयित जळगावातील भास्कर मार्केट परिसरात असल्याची गोपनीय माहिती शनिवारी…
एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील विवाहितेला पैश्यांसाठी शिवीगाळ करून मारहाण करत छळ केल्याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील माहेर असलेल्या पूजा रोहित बारगळ (वय-२४) या तरुणीचा विवाह नाशिक येथील रोहित कृष्णा बारगळ याच्याशी झाला. विवाहितेला माहेरहून २ लाख रुपये घरखर्चासाठी आणावे, अशी मागणी रोहित बारगळ याने केली. पैसे आणले नाही म्हणून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. ननंद, सासू आणि नंदोईभाऊ यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता या आडगाव येथे माहेरी निघून आल्या. दरम्यान कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी तक्रार…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण येथून तरूणीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, मेघना चैत्राम पाटील (वय-२१) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २७ मार्च रोजी सकाळी मेघना पााटील ह्या कामानिमित्त मेहरूण येथील महाजन नगरातील बंगाली गल्लीत गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यांनी परिसरात मोबाईलचा शोध घेतला परंतू कुठेही मोबाईल आढळून आला नाही. मेघना पाटील यांनी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली विकासोच्या पंचवार्षीक निवडणुकीत विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांचे संपुर्ण पॅनल विजय झाली. कोरपावली ग्रामपंचायती कार्यालयात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवड झालेल्या सर्व सदस्यांनी एकच जल्लोष केला होता. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीची पंचवार्षीय निवडणूक रविवार २७ मार्च रोजी दुपारी राबविण्यात आली. पंचवार्षीक निवडणूकीत विद्यमान चेअरमन राकेश फेगडे यांच्या भाजपा प्रणित पॅनलचे संपुर्ण उमेदवार विजयी झाले आहे. यात फेगडे यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. यावेळी प्रतिस्पर्धी पॅनलचे नेतृत्व करणारे माजी सरपंच तथा कॉग्रेसचे सेवा फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांच्यासह सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. निवड…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील जाखणी नगरात बंद घर फोडून २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंगी आकाश दहियेकर (वय-३०) रा. सिंधी कॉलनी जवळ, जाखणीनगर, कंजरवाडा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवार २५ मार्च रोजी रात्री शिंगी दहियेकर यांचे घर बंद असतांना संशयित आरोपी सोनु जगदीश बावरी, मोनूसिं जगदीश बावरी, भोलासिंग जगदीश बावरी रा. शिरसोली नाका, तांबापुर या तिघांनी शिंगी दहियेकर यांचे बंद घराची कडी खोलून आत प्रवेश करत घरातून ५० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन चोरून नेली आहे. यासंदर्भात शिंगी यांनी…
जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील देशीदारूचे दुकान फोडून चोरट्यांनी २ लाखांची रोकड चोरून नेली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील गजानन बाबा कॉलनीत नितीन शामराव तायडे यांच्या मालकीचे देशी दारूचे गोडावून आहे. शुक्रवारी २५ मार्च रोजी दिवसभर काम करून त्याचे सहकारी भुपेश प्रकाश कुळकर्णी रा. देवेंद्र नगर यांनी दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे दुकानाचे गोडावून फोडले व गल्ल्यातील सुमारे २ लाख १५ हजार ५१० रूपयांची रोकड लांबली. दुकानातील कामगार पवन सुभाष चव्हाण हा शनिवार २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता कामावर गेला…
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात २९ ते ३१ मार्चतीन दिवसाच्या कालावधीत हवामान विभागाने उष्णता लाट असल्याबाबतचा इशारा दिला आहे. जिल्हावासीयांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रविवारी २७ मार्च रोजी दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाची दहकता वाढली असून मार्च माहिन्याच्या अखेरीस म्हणजे २९, ३० आणि ३१ मार्च दरम्यान जिल्ह्यात उष्णता लाट असल्याचा इशारा हवामान विभागाने जळगाव जिल्हा प्रशासनाला दिले आहे. नागरीकांनी काळजी घेतांना काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगण्यात आले आहे. यामध्ये १. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. २. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. ३. बाहेर…

