जळगाव प्रतिनिधी । लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या इंद्रप्रस्थ नगरातील छायाचित्रकार धनराज उर्फ विक्की प्रकाश चव्हाण (वय-३२) या तरूणाचा नाशिक-मालेगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ठार झाल्याची घटना शनिवारी २६ मार्च रोजी सकाळी ५ वाजता घडली त्यांचा अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातील रहिवासी धनराज चव्हाण हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांचा छायाचित्रकार असून त्यांचे क्षण फोटो स्टुडिओचे नावाने दुकान आहे. त्यांना नाशिक येथील लग्नाची ऑर्डर असल्याने ते आपल्या लहान भावासह काही सहकार्यांसोबत आपल्या चारचाकीने नाशिक येथे शक्रवारी २५ मार्च रोजी गेले. ऑर्डर झाल्यानंतर काम आटोपून ते शनिवारी २६ मार्च रोजी मध्यरात्री नाशिकहून निघाले. दरम्यान पहाटे ५ वाजेच्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको येथे शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी प्रेमसंबंधावरून तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्या संशयित आरोपी आकाश सखाराम सोनवणे (वय-२५) रा. इंद्रप्रस्थ नगर, जळगाव याला गेंदालाल मील परिसरातून अवघ्या काही तासात पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) या तरूणाचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दूध फेडरेशनशहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी…
यावल प्रतिनिधी । शहरातील भोईटे वाडा चौकात तरूणाला दोन तलवार आणि कुकऱ्यासह यावल पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे यावल शहरात खळबळ उडाली आहे. तरूणाच्या ताब्यातील तलवारी आणि कुकऱ्या हस्तगत केल्या आहे. यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील भोईटे वाडा चौकात एक तरुण हातात तलवार घेऊन दहशत पसरवीत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार असलम खान दिलावर खान, भूषण चव्हाण, सुशील घुगे, राजेश वाडे आणि निलेश वाघ असे पथक तयार करून त्यांना रवाना केले. शुक्रवारी २५ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या…
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली शिवारातील शेत लावलेल्या केळीच्या बागेचा अचानक आग लागल्याची घटना शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी घडली. या आगीत ठिंबक नळ्यासह केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील शेतकरी बाळू पंडित पाटील यांच्या केळीच्या बागेला अचानक आग लागली. ही घटना शनीवारी २६ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत ठिबक नळ्यासह कापणीला आलेले केळीचे घड जळून मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे निर्दशनास येताच भरत अशोक चौधरी, प्रकाश चौधरी, भागवत यादव महाजन, अशोक बाबुराव चौधरी, अमोल नेहेते, कलींदर तडवी, हुसेन पिंजारी, पूर्वेश चौधरी यांनी आग आटोक्यात आणली. आग…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील जळके येथे घरासमोर उभे प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा लांबवल्याची घटना शुक्रवार २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात एका जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळके येथील गोपाळ वाल्मिक सोनवणे वय २९ यांच्याकडे एम.एच.१९ ए.क्यू.७५४४ या क्रमांकाची प्रवासी वाहतुक रिक्षा आहे. लॉकडाऊनपासून धंदा नसल्याने त्यांनी ही रिक्षा घरासमोर उभी केलेली आहे. ते दुसर्याची रिक्षा चालवून उदरनिर्वाह भागवतात. शुक्रवारी दुपारी गोपाळ सोनवणे यांची पत्नी घरात काम करत असताना त्यांना अंगणात उभी रिक्षा राहुल भरत जाधव रा. वराड ता.जळगाव हा घेऊन जाताना दिसला. तो परत रिक्षा घेऊन येईल या…
जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगरातील रिक्षा चालकाचा अनैतिक संबधातून खून झाल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. आज खुनाची दुसरी घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या खूनातील संशयिताला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नरेश आनंदा सोनवणे (वय-२८, रा. राजाराम नगर, दुध फेडरेशन, शिवाजी नगर, जळगाव) असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजाराम नगरातील नरेश सोनवणे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. शनिवारी २६ मार्च रोजी दुपारी तो शिवाजी नगरात राहणार्या आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघे एका खोलीत बसलेले असतांना त्याठिकाणी विवाहित प्रेयसीलचा दुसरा प्रियकर आकाश सखाराम सोनवणे हा तिथे…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील समता नगरात अनैतिक संबधातून तरूणाचा खून झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार ( वय २८) हा तरूण एकटा राहत होता. अनैतिक संबंधातून तरूणावर संशयित आरोपी रात्री उशीरा त्याच्यावर एकाने चाकूहल्ला केल्याने यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने रूग्णालयात हलविले. येथे उपचार सुरू असतांना सकाळी पाच वाजता त्याने शेवटचा श्वास घेतला. सागर नरेंद्र पवार हा…
यावल प्रतिनिधी । शहरातील सरस्वती विद्या मंदिर शेजारील मदन बळवंतराव भोईटे यांचे घरात शुक्रवारी २५ मार्च रोजी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागलेल्या घरांचे वयोवृद्ध कुटुंबीय रात्री उशीरापर्यंत बुलढाणाहुन परतल्यावर पंचनामान्याच्या कामास सुरूवात झाली आहे. याबाबत माहिती अशी की, यावल शहरातील सरस्वती विद्या मंदीर शेजरील राहणारे मदन भोइटे यांचे घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मदन भोईटे कुटुंबीय शुक्रवारी २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजता नातेवाईकांकडे बुलडाणा येथे गेले होते. दुपारच्या वेळी सर्वत्र सामसूम असल्याने व बंद घरात आग लागल्यामुळे त्याची कल्पना बाहेर लवकर आली नाही. घरात सागवानी लाकडांचा धाबा असल्याने आगीने रौद्ररूप धारण…
जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील वाडी शिवारातून शेताच्या विहिरीवरून असलेले वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा एकूण १० हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सतीश रामदास चौधरी ( वय-४५ ) रा. शेलवड ता. बोदवड जि.जळगाव यांचे जामनेर तालुक्यातील वाडी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांनी ठेवलेले १० हजार ५०० रुपये किमतीचे १२० फूट वायर, स्टार्टर, पेटी व इलेक्ट्रिक सामान असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने २१ मार्च रोजी सायंकाळी ५ ते २२ मार्च सकाळी ९ वाजेच्या दरम्यान चोरून नेला आहे. हा प्रकार…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील मोकळ्या जागेवर पार्किंगला लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भिकन काशिनाथ सूर्यवंशी (वय-५१) रा. अष्टविनायक पार्क, जळगाव यांचे हे कामानिमित्त त्यांच्या मोटारसायकलने जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांनी हिवरखेडा रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांची मोटारसायकल पार्किंग करून लावली होती. काम आटोपून ८.३० वाजता परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकलजागेवर आढळून आली नाही. त्यांनी मोटारसायकलचा परिसरात शोधाशोध केली परंतु मोटारसायकल कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी जामनेर…

