Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

अमळनेर प्रतिनिधी । डांगरी येथे दुचाकीने जात असलेल्या व्यक्तीला मध्यरात्री आडवून रोकड व मोबाईल चोरून नेला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, उदय नथू कापडणे (वय-५०) रा. डांगर ता.अमळनेर हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार २९ मार्च रोजी १२ वाजेच्या सुमारास ते धुळे येथील किर्तनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी येत होते. अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावाजवळ दुचाकीवरून येत असताना अज्ञात तीन जणांनी त्यांची दुचाकी अडवली व जबरी त्यांच्या हातातील मोबाईल आणि ५ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी उदय कापडणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार…

Read More

जळगाव प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीने भुसावळ शहर पोलीसांच्या हाताला झटका देवून पसार झाल्याची धक्कादायक घटना पाळधी जवळील जैन इरीगेशनजवळ घडली आहे. राजू विक्रम खांडेलकर (वय-२०) रा. महालखेडा ता. मुक्ताईनगर असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. राजू खांडेकर यांच्यावर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्याला धुळे जिल्हा कारागृहात दाखल केले होत. दरम्यान या गुन्ह्यात राजू विक्रम खांडेकर याला ट्रान्सफर वॉरंट घेवून भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार रशिद तडवी, पोलीस नाईक जाकीर मंसूरी व पोलीस नाईक विकास बाविस्कर यांनी बुधवार ३० मार्च रोजी ताब्यात घेवून भुसावळकडे रवाना झाले होते.…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । घर उघडे ठेवून कुटुंबिय झोपलेले असता अज्ञात चोरट्यांनी घरातून रोकडसह सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीला आलीय. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बाबुराव पाटील (वय-४०) रा. कवठळ ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २८ मार्च रोजी रात्री ते जेवण करून कुटुंबीयांचा झोपले होते. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. उघडा दरवाजा पाहून अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून कपाटातून ६७ हजार ४०० रुपये आणि ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकपदी राहूल खताळ यांनी पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहूल खताळ यांच्या कारवाईसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे अनेकांच्या पोटात दुखत असल्याने त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणीही पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्याकडे केली होती. दरम्यान, त्यांची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातून जळगाव पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांपुर्वी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या आदेशात पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांची देखील बदलीचे आदेश करण्यात आले होते. आज बुधवार ३० मार्च रोजी राहूल खताळ यांची…

Read More

जळगाव प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या संशयावरून खान्देश मॉल मधील आयनॉक्स थिएटर येथे दाम्पत्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया (वय-४८, रा. भाटीया गल्ली) हे कॉटन जिनिंग मिलमध्ये नोकरीस आहे. हे रविवार २७ रोजी पत्नी, लहान मुलगी व सासरे हारेश प्रेमजी भाटे यांच्यासोबत दुपारी ३ वाजता खान्देश सेंट्रल मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये चित्रपट बघण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास ते चित्रपटगृहाच्या बाहेर आले असता. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राजेंद्र किसन महाजन रा. लहान माळीवाडा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील पीओएच कॉलनीत जेवण झाल्यानंतर शतपावली करणाऱ्या व्यक्तीचा हातातील मोबाईल दुचाकीवरून आलेल्या तिघा भामट्यांनी धूम स्टाईल लांबवला होता.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन जणांना अटक केली आहे. संशयित आरोपी निकेश मधुकर वानखेडे (वय-२३, रा.कंडारी, भुसावळ), सचिन मनोज जाधव, (वय-१९, रा.पाळधी, ता.जामनेर) आणि चोरीचा मोबाईल घेणारा  सिध्दांत अरुण म्हस्के (वय-२५, रा.पीओएच कॉलनी, कंडारी, भुसावळ) अशी अटक केलेल्या तरूणांची नावे आहेत. पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलिस उपनिरीक्षक अमोल देवढे, एएसआय…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांची बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात दोन बदल्या विनंतीवरून तर दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या आहेत. पारोळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष नारायण भंडारे यांची जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर जळगाव जिल्हापेठचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांची पारोळा पोलिस निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील राहुल सोमनाथ खताळ यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे तर धरणगावचे शंकर विठ्ठल शेळके यांची…

Read More

जळगाव – प्रतिनिधी । शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने युवती सभेचे अंतर्गत एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे डॉ. सुनिता चौधरी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर . बी. वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियांका ब-हाटे , युवतीसभा प्रमुख प्रा. देवयानी पाटील हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगत नातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर बी वाघुळदे यांनी विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी या एक दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. युवतींचे…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । तू लठ्ठ आहे, तू मला आवडत नाही असे सांगून लग्नापुर्वीच भावी पतीसह त्याच्या आईकडून हुंड्यांचा पैशांची मागणी व लग्न मोडण्याच्या धमकी दिली. याला कंटाळून तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याबाबत कुटुंबियांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हेपानाचे येथील माजी सरपंच रविंद्र नागपुरे हे आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. ६ मार्च रोजी त्यांची मुलगी रामेश्वरी हीचा भुषण पाटील (मूळचे रावेर, ह.मु. नाशिक) याच्यासोबत साखरपुडा झाला होता. दि. ११ मे रोजी लग्नाची तारीख निश्‍चित केली होती. लग्नात मुलाकडच्यांना हुंड्यात ३ तोळे सोने व ५० हजार रुपये रोख असे कबुल केले होते. भावी पतीकडून त्यांना हुंड्यातील सोने व पैशांची…

Read More

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथील विकास कामांचा ठेका घेवूनही काम न करणाऱ्या ठेकेदाराला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी गावाच्या विकासकामांसाठी लागणारे घनकचरा व्यवस्थापन साहित्य खरेदीसंदर्भात विरेंद्र कुमार पाटील याला कामाचा मक्ता दिला होता. या कामासाठीचे ५ लाख ५७ हजार १०० रुपये वीरेंद्र कुमार याने घेतले मात्र प्रत्यक्ष विकासकामांसाठी लागणारे साहित्य पुरवलेच नाही. त्यामुळे याप्रकरणी विरेंद्रकुमार राजेंद्र पाटील रा. मायादेवी मंदिरामागे महाबळ याच्याविरोधात पहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच वर्षभरापासून संशयित वीरेंद्रकुमार हा फरार होता. संशयित जळगावातील भास्कर मार्केट परिसरात असल्याची गोपनीय माहिती शनिवारी…

Read More