जळगाव प्रतिनिधी । शहरातील मारोती पेठ येथील १८ वर्षी तरूणाने रात्री धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८) रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पालकमंत्र्यांच्या हस्ते संत ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयाचे भूमिपुजन धरणगाव प्रतिनिधी : वारकरी तत्वज्ञान हे सत्य, सदाचार आणि प्रबोधनाच्या मजबूत पायावर उभे आहे. आज खर्या अर्थाने समाजाला याच दिशादर्शक ठरणार्या प्रबोधनाची गरज असून ज्ञानाई वारकरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून हे काम होईल असा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. संस्थेच्या कार्यालयाच्या भूमिपुजन प्रसंगी बोलतांना ना.गुलाबराव पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम महत्वाचे असून यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील दिली. वारकरी संप्रदायाशी आपली पहिल्यापासून नाळ जुडलेली असून या माध्यमातून आपल्याला कायम उर्जा मिळत असल्याचेही पालकमंत्र्यांनी नमूद केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते…
जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या आवारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या आवारात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. प्रशासकीय इमारतीजवळ या मिरवणूकीचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या सुरूवातील सुप्रसिध्द विचारवंत डॉ. अशोक राणा यांनी “पुरोगामी चळवळीच्या दृष्टिकोनातून विकसनशील भारत” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.म.सु.पगारे, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.दीपक दलाल, एस.आर.गोहिल, प्रा.राकेश रामटेके, प्रा. किशोर पवार, प्रा.रमेश सरदार, अजमल जाधव, राजू सोनवणे, मनोज वराडे, जगदीश सुरळकर, संजय सपकाळे, अरुण सपकाळे, जयंत सोनवणे, भीमराव तायडे, भैय्या पाटील, दुर्योधन साळुंखे, अमृत दाभाडे, वैशाली वराडे, अशेाक पाटील, आदी शिक्षक,…
जळगाव प्रतिनिधी । यावल येथील भाजपा कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातील मान्यवरांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सर्व उपस्थितांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे , भाजपा शिक्षक आघाडीचे पी. एस. सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपालसिंग पाटील, सरचिटणीस परिस नाईक, भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, अनुसूचित जाती जमाती जिल्हा उपाध्यक्ष बबलू घारू, ललित परमार्थी, सागर मोरे, सोशल मीडिया सेलचे तालुकाध्यक्ष स्नेहल फिरके…
यावल प्रतिनिधी । शहरातील खरेदी विक्री संघात काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नाना बोदडे यांनी त्रिशरण पंचशिल म्हटले तर अतुल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वावर व त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे गौरव केला. याप्रसंगी प्रभाकर सोनवणे, विजय पाटील यांनी ही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते अतुल पाटील, राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, राष्ट्रवादीचे विजय पाटील, राष्ट्रवादी सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष नाना बोदडे , वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे,…
जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात समाज कल्याण विभागाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते द्विपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारांचा व जीवनमुल्यांचा अंगीकार करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. राकेश पाटील, उपायुक्त, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी वैधता प्रमाणपत्र समितीच्या कामकाजाच्या बदलेल्या स्वरुपाबददल माहिती…
मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील थेरोळा शेत शिवारात गावठी हातभट्टी दारूवर मुक्ताईनगर पोलीसांनी धाड टाकून १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची गोपनिय माहिती नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मंगळवारी १२ एप्रिल रोजी मिळाली. त्यानुसार स्वत: मैदानात उतरून शेळके यांनी पथकासह आज सकाळी ६.३० वाजता छापा टाकून दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. यात एकुण १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या…
जळगाव प्रविण पाटील । तालुक्यातील जळके येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जळगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशनपत्र विक्री व दाखल करण्याची तारीख १३ एप्रिल २०२२ ते २१ एप्रिल २०२२ पर्यंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच प्राप्त झालेले नामनिर्देशनपत्र प्रत्येक दिवशी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येतील. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव निवडणूक कार्यालय येथे होईल. त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची यादी २५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ६० लाखांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, महेंद्र सतिषचंद्र ललवाणी रा. डेमला कॉलनी जळगाव यांचे जी. एस. ग्राऊंडजवळ समर एजन्सीज नावाचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान निलेश शांताराम पाटील व दिनेश पाटील या दोघांनी सन २०१३ मध्ये श्री इलेक्ट्रॉनिक्स शॉपी नावाने नाथप्लाझा येथे दुकान सुरु केले होते. हे दोघ ललवाणी यांच्याकडून होलसेल भावात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेवून जात होते. त्यांनी ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेवून रोख व उधारीने घेवून जात होते. काही वेळा रोख तर…
जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवित नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महिने वेळावेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून अत्याचार करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत माहिती अशी की, पिडीत तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये तीची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश खान मुबारक खान (वय-१९) रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्यासोबत ओळखी झाले. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजाच्या तरुणासोबत लग्न ठरले. यादरम्यान दानिश याने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील…

