Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौकात चोरीची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी पोलिस स्थानकातील शोध पथकातील पोलिस नाईक किशोर पाटील व पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील हे मंगळवार २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अजिंठा चौकात पेट्रोलिंग करत असताना संशयित आरोपी ज्ञानेश्वर शिवाजी पाटील (वय-२५) रा. गोहरी ता.जामनेर ह. मु. कमल पॅराडाईज मंगल कार्यालय, जळगाव हा दुचाकी घेऊन संशयास्पद हालचाल करत असतांना आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन…

Read More

जळगाव प्रतिनिधी ।शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घर फोडून घरातील लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांनी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनीतील साधना आश्रमजवळील कंवरनगरातील रोहीत इंद्रकुमार मंधवानी हे कुटुंबियांसह त्यांच्या आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी अमरावती येथे गेले होते. दरम्यान २६ रोजी ते लग्नकार्य आटोपून घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर त्यांना घरातील लोखंडी कपाटातून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने आणि मिक्सरच्या मोटार असा एकूण ४ लाख ९४ हजारांचा ऐवज लांबविल्याचे दिसून आले. या गुन्ह्यातील…

Read More

जळगाव प्रतिनिधी । भरधाव दुचाकीच्या धडकेत कोळन्हावी येथील ४३ वर्षीय मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव श्रावण सोळंके वय ४३ असे मयत मजुराचे नाव आहे. यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील नामदेव सोळंके हे मजुरीकाम करुन त्यांचा उदरनिर्वाह भागवित होते. ९ एप्रिल रोजी कामानिमित्ताने ते विदगाव कोळन्हावी रोडने पायी जात असतांना त्यांना समोरुन एम.एच. १९ बी.पी.९९६४ या क्रमाकांच्या दुचाकीने धड‍क दिली होती. या धडकेत नामदेव सोळंके यांच्या डोक्यास तोंडावर गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला होता. मयत नामदेव सोळंके यांच्या पश्चात पत्नी मंगलाबाई तसेच…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी २२ वर्षीय तरूणीवर अल्पवयीन असतांना आठ वर्षांपासून सतत अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळातील २२ वर्षीय तरूणी सध्या जळगावात राहत आहे. ८ वर्षांपूर्वी म्हणजे तिचे वय १४ वर्ष असतांना ती भुसावळातील एका शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी भुसावळातील रितेश सुनील बाविस्कर याची ओळख मुलीशी झाली. त्याने शाळेत होणारे विविध कार्यक्रमांचे वेळी केव्हातरी मोपिंग केलेले अश्लिल फोटो व व्हिडीओ मुलीला दाखवले आणि धमकी दिली की, ‘तुला जसे सांगेन तसे कर नाहीतर तुझे फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल’ अशी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हाडदे शिवारात शेतातून गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉटसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव कुऱ्हाडदे येथील सागर दादाजी नरोटे वय २८ यांचे कुऱ्हाडदे शिवारात ३ एकर शेती आहे. या शेतात त्यांनी मका लावलेला आहे. सोमवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेतावरुन गेलेल्या महावितरणच्या वीजतारांवर शॉर्टसर्किट होवून शेतातील मक्याला आग लागली. नेहमीप्रमाणे सकाळी शेतकरी सागर नरोटे हे शेतात येत असताना त्यांना मक्‍याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील इतर कामगारांची सोबत पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । द्रौपदी नगरातील बंद घर फोडून घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील दौप्रदी नगरातील भगवान भोमा पाटील हे एका खासगी कंपनीत मार्केटींग मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते मुळचे पारोळा येथील रहिवाशी असून ते पत्नी जयश्री व मुलगा अंश अशांसह वास्तव्यास आहेत. त्यांचे सासरे कृष्णा पाटील हे शहरातील अयोध्या नगरात राहतात. भगवान पाटील यांच्या सासूचा हात फ्रॅक्चर झाल्यामुळे बुधवारी २० एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून ते पत्नी व मुलाला घेऊन अयोध्यानगरात आले होते. याच दरम्यान, गुरुवारी २१ एप्रिल रोजी सकाळी…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । विवाहितेला तिच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत शरीरसंबध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहिता पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान विवाहिता ही बकऱ्यांसाठी चारा आणत असतांना संशयित आरोपी नितीन एकनाथ जाधव याने विवाहितेला तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. विवाहितेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी विवाहितेचा पती संशयित आरोपी नितीन जाधव याच्याकडे गेला असता सोनाली जाधव, संदीप जाधवी, नितीनचा पाहुणा, नितीनीची आत्या जिजाबाई,…

Read More

मुंबई प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून फोन टॅपींग प्रकरण सुरू आहे. दरम्यान याच प्रकरणातील चौकशीत अजून एक मोठा गौप्यस्फोट समोर आला असून खा. संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे याची टोपण नावे वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना राज्यातील काही राजकारण्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचे प्रकरण आता गंभीर वळणावर गेल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात आधीच कुलाबा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून यात तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचाही समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत संजय राऊत आणि एकनाथराव खडसे यांनी आपले जबाब नोंदविले असून सोबत सहा साक्षीदारांचेही जबाब घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सुरू…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, निलेश जीवन भाट (वय-३०) रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी, जळगाव हा चालक असून खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करतो. १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील टॉवर चौकात दुचाकी (एमएच १९ बीझेड ३७१५) आले. त्यांनी त्यांची दुचाकी काँग्रेस भवन समोर पार्क करून बाजारात खरेदीसाठी निघून गेला. अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. निलेश भाट याने दुचाकीचा शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर मंगळवार १९ एप्रिल रोजी…

Read More

यावल प्रतिनिधी । गिरडगावजवळील केळीच्या बागेला मंगळवारी १९ एप्रिल रोजी दुपारी आग लागून साडेपाच हजार केळी खोड जळाल्याने दोन शेतकर्‍यांचा सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. चार तासानंतर यावल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील गिरडगाव येथील आदीवासी पावरा वस्तीला लागून गोरख पाटील व बापू ठाकूर रा. किनगाव ता. यावल यांची शेती आहे. यंदा या दोघांनी शेतात केळीची लागवड केलेली आहे. मंगळवारी १९ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतातील केळीच्या बागाला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच पोलिस पाटील अशोक पाटील, एस.टी. चालक भैय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापू पाटील, मधुकर पाटील यांनी तातडीने…

Read More