यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील ग्रामदेवता कुलदैवत श्री एकविरा देवी प्राणप्रतिष्ठा सोहळा शनिवार 9 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन नुसार सर्व प्रथम एकविरा देवीची ग्राम प्रदक्षिणा उत्साहात आनंदात काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व समाजाचे, पंथाचे ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. तुळशी कळस घेऊन चालणाऱ्या महिला,भजनी मंडळ, वही गायनाचा कार्यक्रम मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते. या ग्राम प्रदिक्षणेते ग्रामस्थ देवीच्या दर्शनाचा लाभ घेत होते.या नंतर दुसरे दिवशी गणपती पूजन, पुण्याहवाचन पिठस्थ देवता स्थापना विविध धार्मिक विधी भाव भक्तीने पार पडले. तिसरे दिवशी देवी मूर्तीची दशविधीस्नान व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी देवतांना महाअभिषेक, सप्तपाठ हवन व संध्याकाळी आरती…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ल्याचा निषेध करत यास गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भुसावळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भुसावळ विभागाचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे साहेबांनी चर्चा करून परिस्थितीनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, जिल्हा सरचिटणीस अतुल चव्हाण, सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष सरजू तायडे, पदवीधर जिल्हा सरचिटणीस गोपाळ पाटील, युवक भुसावळ शहराध्यक्ष रणजित चावरिया, उपाध्यक्ष राहुल वाघ, संघटक सचिन पाटील, कार्याध्यक्ष विशाल ठोके, तुषार चौधरी, तुषार हडप, प्रदीप कोळी, नितीन…
जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी इकेवायसी करण्यासाठीची ३१ मार्च पर्यंत मुदत होती, त्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून ३१ मे पर्यंत इकेवायसी करता येणार आहे, लाभार्थ्यांनी नजीकच्या सीसीसी सेंटरमध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शुक्रवार ८ एप्रिल रोजी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यासाठी गेल्या २०१९ पासून योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात ८-अ नुसार सुमारे ६ लाख ४६ हजार ४०० शेतकरी खातेदार आहेत. या योजनेंतर्गत एप्रिल २०२० पर्यंत ४ लाख ९० हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नोंद होती, त्यापैकी जिल्ह्यात १३ हजाराहून अधिक शेतकरी करपात्र उत्पन्न असणारे…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सोनवद येथे किरकोळ कारणावरून दोन कुटूंबामध्ये झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील रहिवाशी पुरूषोत्तम भानुदास ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुरूषोत्तम हे त्यांची पत्नी सुमन ठाकूर सोबत आपसात बोलत असतांना गल्लीतील अर्जुन नागो कोळी, पंकज अर्जून कोळी, चावदास नागो कोळी, दिनेश नागो कोळी, हर्षल दिनेश कोळी, गौरव दिनेश कोळी, वसंत चिंतामन कोळी, सुग्रीव चिंतामन कोळी आणि चेतन कोळी सर्व रा. सोनवणे ता. धरणगाव यांनी पुरूषोत्तम व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तर…
जळगाव प्रतिनिधी । तांबापूरा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव प्रतिनिधी । तरसोद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर खान्देश अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटीच्या थकबाकीदारांना निवडणूकीस अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी तक्रारदार अनिल पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खान्देश अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी जळगाव यामधील थकबाकीदार तीन कर्जदार यांनी सोसायटीमधून कर्ज घेतले आहे. परंतू अद्यापपर्यंत मुद्दल रकमेसह व्याजाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. यात किशोर भाऊराव पाटील, अशोक रूपसिंग अलकरी आणि छायाबाई अशोक अलकरी यांचा समोवश आहे. तिघांना तरसोद विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूकीसाठी अपात्र करण्यात यावे अशी मागणी तक्रारदार अनिल संभाजी पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी…
जळगाव प्रतिनिधी । काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानासमोरून एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश दिवानचंद वलभाणी रा. सीटी कॉलनी, चेतनदास मेहता हॉस्पीटल समोर जळगाव हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ९ ते १० वाजेच्या दरम्यान ते शहरातील भाऊंचे उद्यानासमोर दुचाकी (एमएच १९ बीपी ६६६०) ने आले होते. त्यावेळी उद्यानासमोर दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून लंपास केल्याचे उघड झाले. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर – बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेलसमोरून गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या वरणगावातील तरुणाला अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. अनुराग लक्ष्मण सूनगत वय 20 राहणार वरणगाव ग्रामीण रुग्णालय कर्मचारी क्वार्टर वरणगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई जामनेर-बोदवड रस्त्यावरील राजकमल हॉटेल समोर सार्वजनिक रस्त्यावर संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत हा तरुण हातात गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. मंगळवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी अनुराग लक्ष्मण सुनगत (वय-२०) रा.…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील दादा वाडी येथे लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका महिलेला चप्पलने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, कविता भगवान पाटील (वय-४५) रा. दादा वाडी जळगाव ह्या महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार ३ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास लहान मुलांचे खेळण्याच्या कारणावरून भांडण झाले. या कारणावरून लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कविता पाटील यांना लक्ष्मी विनोद (पुर्ण नाव माहित नाही.) यांनी तोंडावर चप्पल मारली व शिवीगाळ करून मारहाण केली. यात कविता पाटील ह्या जमीनीवर पडल्याने त्यांच्या डोक्यालाख मुक्का मार बसला आहे. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ…

