Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा शेवटचा अंत आज, सोमवारी होणार आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक शिंदे सरकारने आरामात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आजच्या बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज बहुमत चाचणी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. बहुमत चाचणी झाल्यानंतर एकनाथ शिंदे विधिमंडळ वार्ताहर संघाच्या परंपरेनुसार विधानभवनात पत्रकार परिषदेला सामोरे जाणार आहेत. त्यानंतर ते हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. तसेच, ते आज चैत्यभुमी येथे भारतरत्न…

Read More

गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांचे राजकीय वर्चस्व पणाला लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात नवे सरकार स्थापन झाले मात्र आता एकीकडे मंत्रीपदावरून वादावादी आणि दुसरीकडे पालकमंत्रीपदावरून संघर्ष सुरू आहे. यात पहीलं तर जळगावचे गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन. हा पेच सोडविताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुरती दमछाक झाली आहे. आधीच सरकार असताना मंत्री असलेल्या गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. जळगाव जिल्हय़ातून महाजन, गुलाबराव हे दोघेही मंत्री झाले तर पालकमंत्री कोण हा प्रश्न उभा राहणार आहे.जुने पालकमंत्री सरसकट कायम ठेवण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. जळगावच्या पालकमंत्रीपदावरून पाटील-महाजन यांच्या गुंतागुंत निर्माण झाली.जळगावातील भाजप नेते गिरीश महाजनही मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात रविवारी, दि. 3 ते 6 जुलै असे चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले दोन दिवस राज्यात पाऊस मुसळधार नाही. पावसाची एक जोरदार सर येते व काही वेळात जाते, हवामान खात्याने व्यक्‍त केलेल्या अंदाजानुसार, रविवारी, 3 रोजी जोरदार पाऊस पडतो. येत्या 5 जुलै पासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची देखील हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी, 4 पासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे दि.3 ते 6 जुलै या काळात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेले काही दिवस पाऊस शहरी भागात तुरळक हजेरी लावत असून, ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यातील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली, भाजपचे उमेदवार असलेले राहुल नार्वेकर यांचा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजय झाला आहे. यासाठी ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थक यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता होती.निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी आणि एम आय एम चे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या राजन साळवी यांना 107 मते मिळाली. प्रथम आवाजी आणि त्यानंतर शिरगणती पद्धतीने मतदान घेण्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतला. या निवडणुकीत भाजपच्या विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांचा विजय झाला. त्यांना 164 मते मिळाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीनं आपल्या उमेदवारांची नावं घोषित केली आहेत. भाजपाकडून राहुल नार्वेकर तर…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरच या सरकारचा खरा चेहरा कसा असेल याकडे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री तर आता चंद्रकांत पाटील यांच्यावर काय जबाबदारी याची चर्चा सुरु झाली. पक्षाच्या ध्येय-धोरणानुसार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा सहभाग होणार आणि कुणाला बाजूला व्हावे लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पहिल्या फळीतील नेते असले तरी सर्वकाही पक्ष श्रेष्ठींकडून सूत्र हलवली जातात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागणार तर आता चंद्रकांत पाटलांना केवळ पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रित करावे लागणार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आज जळगावात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा होता. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात जळगाव जिल्ह्यातील चार शिवसेना आमदार व एक अपक्ष आमदार यांचा सहभाग आहे. साधारण दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गुलाबराव वाघ हे आपल्या समर्थकांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आक्रोश मोर्च्यात सहभागी होत होते. एका अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात धमकी दिली. वाघांनी देखील प्रतिउत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय, तुम्ही शिंदेसाहेब आणि जळगाव जिल्ह्यातील शिंदे साहेबांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात खूप बोलताय. तुम्हाला सोडणार नाही, अशा शब्दात एकाने व्यक्तीने गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. गुलाबराव वाघहे आक्रोश मोर्च्यानंतर ते पत्रकारांसोबत…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ; सुरत, गुवाहाटी आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार तब्ब्ल ११ दिवसांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिंदे मंत्रिमंडळाचे ३ जुलै पासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होणार असून, याच पार्श्वभूमीवर आमदारांना मुंबईत बोलवण्यात येत आहे. आमदारांच्या सुरक्षतेसाठी गोव्यातील ताज कॉन्व्हेंशन हॉटेलबाहेर पोलिस तैनात करण्यात आले आहे. गोवा विमानतळावर आमदारांसाठी स्पेशल स्पाईस जेटच्या चार्टर विमानतून सर्व आमदार मुंबईला येणार आहेत. सर्व आमदार गोवा पोलीस, गोव्याची कमांडो युनिट यांच्या घेराव्यात आमदारांच्या एकूण तीन बस आहे.आमदारांच्या स्वागतासाठी मुंबईत जय्य्त तयारी सुरू आहे. मुंबई विमानतळाच्या गेट नंबर ९ च्या मार्गावर ढोल ताशे मागविण्यात आले आहेत. भाजप…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज गौरव पाटील :भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित केले आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली.जळगावात शिवसेनेतील बंडखोरीने शिवसैनिक नाराज आहेत. पक्षाशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या विरोधात शिवसैनिकांनी मोर्चे काढले. राज्यामध्ये शिवसेनेत उभी फूट पडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड पुकारला होते. सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी व शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना परतण्याचे आवाहन केले होते.काही कारणांनी परतले नाही. भाजपने नवीन खेळी खेळून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. यामुळे बंडखोरांबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण झाली आहे. तसेच आपण सर्व शिवसेना आणि सेनाप्रमुख उद्धव ठाकरे…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव येथील महापालिकेतही सत्तासंघर्ष होऊन शिंदे गटाने भाजपमधून 27 नगरसेवकांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी हात पुढे दिला. त्यामुळे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली. पाठिंबा देणार्‍या सहा नगरसेवकांनी आता शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातून जळगावातील नगरसेवकांची ही पहिलीच फाटाफूट आहे. ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या समवेत अंबरनाथ येथील नगरसेवक सुनील चौधरीदेखील उपस्थित होते. आणखी नगरसेवक संपर्कात नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सांगितले की, आम्ही भाजपतून बाहेर पडलो, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर शहरातील ढेकू रोडवरील हरिओम नगरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ५३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास केली आहे. या संदर्भात ज्ञानेश्वर यशवंत सोमवंशी (वय ६१, रा.हरिओम नगर) यांच्या मुलाचा लग्न सोहळा शिंदखेडा जि.धुळे ३० जून रोजी होता. त्यामुळे सोमवंशी हे आपल्या परिवारासह घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेर होते. दि. ३० जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांचा घराचे दरवाजाचे कुलुप व कडीकोंडा तोडुन अज्ञात चोरट्याने ५३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांसह ८० हजाराची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि अनिल भुसारे हे करीत आहेत.

Read More