लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करून नवीन सरकार उभे केले आहे. यातच शिवसेने कडून एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अनेक टीका आणि शब्दाचा भडीमार होत आहे. यावरच पलाटवार करताना बंडखोर आमदारांमध्ये सहभागी दिपक केसरकर ठाकरेवर निशाणा साधला आहे. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही, केसरकर भडकले दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय वातावरण उफाळून आले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता माध्यमातून सडकून टीका केली. दरम्यान, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे ,गद्दार हे गद्दारच आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मंत्रालयात शपथविधीनंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. यातच आज मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांकरता निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याच्या दिशेने सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली, बैठकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्ष पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होत असल्याने पूराचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा येणार आहे. त्यानुसार सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे निर्णय घेतले जाणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार असून या प्रकल्पाला निधी देण्याकरता जागतिक बँकेने सहमती दिली आहे.या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील…
जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेले प्रतिभाताई शरदचंद्र पवार महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपक साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिभाताई शरदचंद्र पवार महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. यात विज्ञान शाखेचे झुलॉजी, बॉटनी, केमीस्ट्री, इलेक्ट्रॉनीक्स, मॅथेमॅटीक्स, फिजीक्स, कॉम्प्यूटर सायन्स, इंर्न्फामेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये शहराच्या मध्यवर्ती निसर्गरम्य परिसर, मुलींसाठी सुरक्षित परिसर (सीसीटीव्हीच्या निगराणती), प्रशस्त इमारत व सुजज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा उपलब्ध, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीची सुविधा, थंड व शुध्द पाण्याची व्यवस्था, नाममात्र प्रवेश फी आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये सवलत…
प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे पुलाच्या बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आढळून आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी वाळू साठ्यावर कारवाई करून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा साठवणूकीचा ठेका देण्यात आला आहे. शासकीय कामासाठी वापरण्यात येणारी वाळू ही जळगाव शहरात अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व महसूल विभागाला ईमेलद्वारे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे…
जळगाव प्रतिनिधी । पोस्ट ऑफीस कार्यालयातून वृध्दाची पिशवी कापून एक लाख रूपयांची रोकड लांबविणाऱ्या दोन जणांना जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) यांनी जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. गुरुवारी २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट…
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; जळगावातून मुसक्या आवळल्या जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीची चोरी करणारा सराईत चोरट्याला जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून त्याच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात आल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोकॉ. विजयसिंग पाटील, अनिल देशमुख, सुधाकर आंभोरे, पो.ना. राहूल पाटील, किरण चौधरी, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील आणि चालक प्रमोद ठाकूर यांनी…
धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. के.एम. पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. डॉ. के.एम.पाटील यांनी महाविद्यालयात सलग २० वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून काम बघितले आहेत. १० वर्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासात मंडळावर होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आधारित एकूण १८ पुस्तके प्रकाशित केले आहेत. सन २०१९ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांनी पाच वेळा आंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन केले असून ५ वर्षांपासून उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. १ जुलै पासून त्यांनी धरणगाव महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. के.एम. पाटील पदभार स्विकारला आहे. अन् संधीच सोन करेन…. हे पद मिळाले…
देशी विदेशी दारूसह ३ लाख ९० हजाराचा मुद्देमाल लंपास लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अकलूद शिवारातील परमिटरूम व बिअरबारचे हॉटेल फोडून देशी, विदेशी दारूचे बॉक्स व इतर समान असा एकुण ३ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत बुधवार ६ जुलै रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन प्रल्हाद पवार (वय-४०) रा. नालंदा नगर, भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे यावल तालुक्यातील दुसखेडा रोडवरील अकलूद शिवारात आनंद परमिटरूम व बिअर बार नावाचे हॉटेल आहे. हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ५ जूलै रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी…
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले असून आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थाच्या परिसरात बुधवार ६ जुलै रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हतनुर धरणाचे ३० दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे ३० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात ४२ हजार ३७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागल्या आहेत. अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काही मंत्र्याचा शपथविधी तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीची निवडणूक होणार असून २२ जुलै रोजी देशाचा नवा राष्ट्रपती निश्चित होईल. विशेष म्हणजे जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सर्वच खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवली जाणार आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच…

