Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । पोस्ट ऑफीस कार्यालयातून वृध्दाची पिशवी कापून एक लाख रूपयांची रोकड लांबविणाऱ्या दोन जणांना जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत दोघांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल अलीम मोहम्मद सलीम (वय-५८) रा. जलालनगर ता. सदर जि. शहाँजहापुर, उत्तर प्रदेश आणि बाबुलाल कस्तुरीलाल अग्रवाल (वय-६६) रा. बरेली, उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, मजूरी काम करणारे रामेश्वर कॉलनीत राहणारे देवराम बाबुराव चौधरी (वय-७२) यांनी जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या पोस्टाच्या खात्यात त्यांनी दीड लाख रूपयांची बचत केली होती. गुरुवारी २ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता नातवासोबत जळगाव शहरातील मुख्य पोस्ट…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; जळगावातून मुसक्या आवळल्या जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दुचाकीची चोरी करणारा सराईत चोरट्याला जळगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून त्याच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात आल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोकॉ. विजयसिंग पाटील, अनिल देशमुख, सुधाकर आंभोरे, पो.ना. राहूल पाटील, किरण चौधरी, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील आणि चालक प्रमोद ठाकूर यांनी…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. के.एम. पाटील यांची नियुक्त करण्यात आली आहे. डॉ. के.एम.पाटील यांनी महाविद्यालयात सलग २० वर्ष मराठी विभाग प्रमुख म्हणून काम बघितले आहेत. १० वर्ष उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासात मंडळावर होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आधारित एकूण १८ पुस्तके प्रकाशित केले आहेत. सन २०१९ मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांनी पाच वेळा आंतरराष्ट्रीय परिषेदेचे आयोजन केले असून ५ वर्षांपासून उपप्राचार्य म्हणून कार्यरत होते. १ जुलै पासून त्यांनी धरणगाव महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. के.एम. पाटील पदभार स्विकारला आहे. अन् संधीच सोन करेन…. हे पद मिळाले…

Read More

देशी विदेशी दारूसह ३ लाख ९० हजाराचा मुद्देमाल लंपास लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: अकलूद शिवारातील परमिटरूम व बिअरबारचे हॉटेल फोडून देशी, विदेशी दारूचे बॉक्स व इतर समान असा एकुण ३ लाख ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत बुधवार ६ जुलै रोजी सायंकाळी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन प्रल्हाद पवार (वय-४०) रा. नालंदा नगर, भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे यावल तालुक्यातील दुसखेडा रोडवरील अकलूद शिवारात आनंद परमिटरूम व बिअर बार नावाचे हॉटेल आहे. हॉटेल चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी ५ जूलै रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले असून आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थाच्या परिसरात बुधवार ६ जुलै रोजी दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तापी नदी पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे हतनुर धरणाचे ३० दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे ३० दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून हतनुर धरणातून तापी नदी पात्रात ४२ हजार ३७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता सर्वांच्या नजरा मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागल्या आहेत. अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी काही मंत्र्याचा शपथविधी तर निवडणुकीनंतर काही मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीची निवडणूक होणार असून २२ जुलै रोजी देशाचा नवा राष्ट्रपती निश्चित होईल. विशेष म्हणजे जरी दोन टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सर्वच खाती लगेच भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रिपद रिक्त ठेवली जाणार आहे. दादा भुसेंकडे पूर्वीचेच…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज बुधवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पायावर मोठी शस्त्रक्रिया झाली. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सदा सरवणकर यांनी आज सकाळी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. राज ठाकरेंच्या शस्त्रक्रियेनंतर शिवतीर्थावर त्यांना भेटीसाठी राजकीय नेत्यांची रांग लागली. एकनाथ शिंदे समर्थक आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांची विचारपूस करण्यास राज्यातील चालू घडामोडींवर…

Read More

मुंबई वृत्तसेवा । माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी बुधवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. विधान परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विजयी झाले आहेत आमदारकीचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मध्येच राज्यात सत्तांतर झाल्यामुळे तूर्तास त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर एकनाथराव खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये राज्यातील स्थापन झालेले सरकार हे अल्पजीवी ठरणार असल्याचा दावा केला होता. राज्यात लवकरच मध्यवादी निवडणुका लागू शकतात असे देखील ते म्हणाले होते.

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव रेल्वे स्टेशन सल्लागार समितीची निवड खासदार उन्मेश पाटील यांच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. स्टेशन वरील नागरीकांची समस्या व गरजा सल्लागार समिती मार्फत शासनापर्यत पोहचविण्यासाठी या सदस्याची मदत होईल असे प्रतिपादन खा. उन्मेषदादा पाटील यांनी केले आहे. नवनिर्वाचित सल्लागार समितीत सुनिल एकनाथ चौधरी, योगेश श्रावण ठाकरे, किरण मधुकर वाणी, आनंद नरेंद्र वाजपेयी, अँड.संदीप चत्रभुजसा सुतारे, अनिल जगन्नाथ महाजन, किशोर ब्रिजलाल झंवर, घनश्याम एकनाथ पाटील, समाधान विक्रम पाटील, हिमालय सिकरवार यांची निवड करण्यात आली आहे. सर्व निवड झालेल्या सदस्यांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते सुभाष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित…

Read More

धरणगाव पोलीसांना दिले निवेदन… धरणगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पीए बोलत असल्याचे सांगून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात यावी आणि गुलाबराव वाघ यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीचे निवेदन धरणगाव पोलीसांना देण्यात आले. गुलाबराव वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेना ह्या संघटनेचे काम करीत आहे. शिवसेना या संघटनेचे कार्यालय प्रमुख पासून ते जळगाव जिल्हा प्रमुख म्हणुन काम करतोय. सद्या शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणुन काम करीत आहे. शिवसेनेत काम करीत असतांना अनेकदा संघटनेची ध्येय धोरण राबवित असतांना अनेक लोकांच्या विरोधात काम…

Read More