धरणगावात शिवसेनेला धक्का; अन्….दोन ओळीत राजीनामा ! गौरव पाटील प्रतिनिधी :शिंदे गटात बंडखोर सुरू झाल्यानंतर शिवसेनेत फूट पडली आणि अनेक आमदारांनी खासदार यांनी आपला राजीनामा शिवसेनाला दिला आहे. धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते तथा धरणगाव शहरप्रमुख, राजेंद्र महाजन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचा हा सर्वात मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. राजेंद्र महाजन यांनी विष्णू भंगाळे यांना अगदी दोन ओळीत मजकूर लिहून राजीनामा दिला आहे.तर आणखी काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मार्गावर आहे. राजेंद्र महाजन यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. राजेंद्र महाजन हे शिवसेनेचे एकनिष्ठ पदाधिकारी होते. तर शिंदे गटात सामील होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
ओळख पटविण्याचे रामानंदनगर पोलिसांचे आवाहन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या अनोळखी महिलेचा आज सकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जूनला रोजी भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे अनोळखी महिला बेवारसरीत्या पडलेल्या स्थितीत आढळून आली होती. त्यामुळे महिलेला शासकीय रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले होते. दरम्यान शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय सपकाळे हे करीत…
धरणगाव प्रतिनिधी । येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. टी एस बिराजदार हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. २००३ मध्ये महाविद्यालयात राज्यशास्त्र (पॉलिटिक्स) ह्या विषयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले, ते राज्यशास्त्र विषयात पारंगत होते. धरणगाव सारख्या ग्रामीण भागातुन त्यांनी विवीध शाखेतून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्चपदावर कार्यरत आहेत. यावेळी प्रा.बी.एल खोंडे यांनी डॉ बिराजदार सरांबद्दल गौरवोद्गारपर सांगितले की, प्राचार्य म्हणून कार्य करताना डॉ. टी एस बिराजदार एक कुशल प्रशासक व संघटक म्हणून प्रचलित…
जळगाव प्रतिनिधी । अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तूवर लागू केलेले जीएसटी केंद्र सरकारने रद्द करावी, अशी मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना युवासेनेतर्फे देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने २०१७ मध्ये जीएसटी प्रस्तावित असतांना अन्यधान्यासह इतर खाद्य पदार्थ वस्तूंना जीएसटी कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले होते. शिवाय वस्तू व्हॅट मधूनही वगळण्यात आल्या होत्या. ह्या सर्व वस्तूंचे उत्पादन देशातील छोटे छोटे शेतकरी करत असतात लहरी निसर्ग व उत्पादित शेतमालाला मिळणारी किंमत याचा मेळ बसवणे कठीण आहे. सुरवातीस फक्त रजिस्टर ब्रँडमधील विक्री होणाऱ्या अन्नधान्ये, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तू समाजातील सधन वर्गच वापरतात असे सांगून त्यावर कर आकारणी केली गेली. आता त्यात बदल करून अन्नधान्यासह गूळ,आटा, रवा, मैदा, पोहा, मुरमुरे, डाळी, कडधान्ये, दही, लस्सी, ताक इत्यादी सर्वच…
बळीरामपेठेत समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकमांची पत्रकार परिषद… लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयामधील उपचारार्थ दाखल रुग्णांना ‘आहार सेवा’ पुरविण्याचे १२३ कोटीचे कंत्राट मिळाले असून या आहार सेवेच्या नाशिक मंडळातील कामात मोठा अपहार झाला आहे. असा आरोप समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम यांनी बळीरामपेठे येथे शुक्रवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी विजय निकम म्हणाले की, नाशिक मंडळातील पाच जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना करण्यात आलेल्या आहार सेवा पुरवठा कामात मोठा अपहार झाला असून या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्था, नाशिक कारवाई होतांना उपसंचालक कार्यालयाकडून…
जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या नराधमाला जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि ३० हजार रूपयांचा दंडांची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात रविंद्र उर्फ रितेश बापु निकुंभ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रविंद्र निकुंभ याला अटक केली होती. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्या. बी.एस. महाजन यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. या खटल्यात एकुण १२ साक्षिदार तपासण्यात आले. खटला…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांना विमा हप्त्याची रक्कम कर्ज म्हणून देण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकने घेतला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी दिली. रिंगरोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, माजी मंत्री आ. एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतिष पाटील, संचालक संजय पवार, प्रतापराव पाटील, महितापसिंग नाईक, कार्यकारी संचालक तथा व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. जिल्हा बॅकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यात कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करण्यात आली होते. ती सक्ती आता बँकेने ऐच्छीक केली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील बुस्टर डोसचे मोफत लसीकरण सुरू झाले आहे. या अनुषंगाने शहरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात शुक्रवार १५ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून मोफत लसीकरणास प्रारंभ झाला आहे. शासनाकडून जेष्ठ नारीकांसाठी मोफत बुस्टर डोस देण्यात येत होता.याच धर्तीवर राज्य शासनाने १८ वर्षावरील नागरिकांना आज शुक्रवार दि. १५ जूनपासून बुस्टर डोसचे मोफत लसीकरणास प्रारंभ करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयांने कोरोनाचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर ९ महिन्यांवरुन ६ महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. महापालिकेच्या केंद्रांवर कोविशील्ड आणि…
चाळीसगाव प्रतिनिधी । वडगाव ते रहिपूरी दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने मागुन जोरदार धडक दिल्याने सासऱ्याचा मृत्यू झाला तर सुन जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तुलसीदास शंकर वाघ (वय-३४) रा. भोरस, ता. चाळीसगाव हे त्यांचे वडील शंकर वाघ आणि पत्नी मिना वाघ यांच्यासोबत गुरूवारी १४ जुलै रोजी दुचाकी (एमएच १९ डब्ल्यू ३६५५) ने सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात वडगाव ते रहिपूरी रस्त्याने जात होते. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात शंकर वाघ हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील राहणाऱ्या महिलेला व्हॉटस्ॲपवर अश्लिल मॅसेजेस पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आली आहे. या गुन्ह्याचा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ३६ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून ती आपला उदरनिर्वाह करते. १३ जुलै रोजी रात्री जेवण करून झोपलेली असतांना तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी नंबरवरून तिला मॅसेजेस पाठविले. त्यानंतर अश्लिल फोटो व्हॉटसॲपवर पाठविले. यासंदर्भात गुरूवार १४ जुलै रोजी तरूणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

