Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या अश्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून जीव गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एक मृत्यू विहीरीत पडून तर दोन जणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. नजीकच्या पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात साक्षी सुरेश कापडणे (वय १८) या तरुणीचा विहिरीत पाय घसरुन मृत्यू झाला आहे.पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहन सोनवणे करीत आहेत. तर भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या बराच वेळ पाण्यात बुडल्याने मुर्त्यू झाला आहे. ग्रामस्थांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मागील गेल्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. वाढत्या इंधन किंमतीत वाहन चालविणे महाग झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. महाराष्ट्रातील अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. सरकार सतत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या या विधानाचा संबंध वाहनांमुळे होणारे प्रदूषण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्याशी जोडला जात आहे. इंधनाचे दर दोन रुपयांनी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नितीन गडकरी यांना विद्यापीठातर्फे ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. पेट्रोलच्या…

Read More

मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्याने सरकार स्थापन झाल्याने आता नगरपालिकांच्या निवडणूकांची उत्सूकता लागून होतो. या साठीच्या प्रारूप याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांची घोषणा केली आहे. यात १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगस्टला मतमोजणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. असा राहणार निवडणूक कार्यक्रम ७ जुलै अंतीम प्रारूप याद्या जाहीर, २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर२२ ते २८ जुलै दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, स्विकारण्याची मुदत२९…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । धरणगव शहरातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलीचे आईवडील हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार ५ जूलै रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना किरण अशोक चव्हाण याने तिचे अपहरण करून करून फूस लवून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या कुटुंबियांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनी किरण चव्हाण याच्यावर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरात देशमुख हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वतीने रविवारी १० जुलै रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कॉलनी परिसरात देशमुख हेल्थकेअर हॉस्पिटलच्या वतीने रविवारी १० जुलै रेाजी सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान नागरीकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. या आरोग्य शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. त्याप्रमाणे अल्पदरात एक्स-रे आणि ईसीजी देखील तपासणी करण्यात येणार आहे. इच्छक व गरजूंनी रविवारी १० जुलै रोजी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्य मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नवीन जोशाने तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शुक्रवारी दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे उद्या 8 जुलैला रात्री 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ते शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्ली दौऱ्यात त्यांच्यासोबत असतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत.या दौऱ्यात…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन करून नवीन सरकार उभे केले आहे. यातच शिवसेने कडून एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अनेक टीका आणि शब्दाचा भडीमार होत आहे. यावरच पलाटवार करताना बंडखोर आमदारांमध्ये सहभागी दिपक केसरकर ठाकरेवर निशाणा साधला आहे. आम्हीही खूप बोलु शकतो, पण आम्ही बोलणार नाही, केसरकर भडकले दिपक केसरकर यांनी ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय वातावरण उफाळून आले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराआधी दीपक केसरकर हे गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता माध्यमातून सडकून टीका केली. दरम्यान, शिवसेनेच्या आदित्य ठाकरे ,गद्दार हे गद्दारच आहेत. ज्यांना वाटते त्यांनी अजूनही…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: मंत्रालयात शपथविधीनंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. यातच आज मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांकरता निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याच्या दिशेने सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली, बैठकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये दोन वर्ष पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होत असल्याने पूराचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा येणार आहे. त्यानुसार सरकारकडून उपाययोजना करण्यात येणार असून हे निर्णय घेतले जाणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार असून या प्रकल्पाला निधी देण्याकरता जागतिक बँकेने सहमती दिली आहे.या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील…

Read More

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेले प्रतिभाताई शरदचंद्र पवार महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपक साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिभाताई शरदचंद्र पवार महाविद्यालयात विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. यात विज्ञान शाखेचे झुलॉजी, बॉटनी, केमीस्ट्री, इलेक्ट्रॉनीक्स, मॅथेमॅटीक्स, फिजीक्स, कॉम्प्यूटर सायन्स, इंर्न्फामेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये शहराच्या मध्यवर्ती निसर्गरम्य परिसर, मुलींसाठी सुरक्षित परिसर (सीसीटीव्हीच्या निगराणती), प्रशस्त इमारत व सुजज्ज ग्रंथालय, इंटरनेट सुविधा उपलब्ध, सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीची सुविधा, थंड व शुध्द पाण्याची व्यवस्था, नाममात्र प्रवेश फी आणि ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी फी मध्ये सवलत…

Read More

प्रतिनिधी प्रविण पाटील: जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे पुलाच्या बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आढळून आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीनुसार गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी वाळू साठ्यावर कारवाई करून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा साठवणूकीचा ठेका देण्यात आला आहे. शासकीय कामासाठी वापरण्यात येणारी वाळू ही जळगाव शहरात अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी व महसूल विभागाला ईमेलद्वारे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे…

Read More