“काळ आला पण वेळ आली नाही” लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पहाटे इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळून दुर्घटना घडली. “काळ आला पण वेळ आली नाही” कळमसरे येथील दर्शन मोतीलाल चौधरी हा युवक देखील अपघात झालेल्या इंदोर -अमळनेर याच बसने प्रवास करणार होता. काळजी घेणाऱ्या बहिणीच्या वेडी मायेने दर्शन चौधरीचे जीव वाचवला.सकाळी पाऊस सुरू असल्याने त्याला बहिणीने थांबविले नसते तर वाईट घटना दर्शनसोबत झाली असती. कळमसरे येथील रहिवासी दर्शन चौधरी हा गेल्या एक आठवडा इंदोर येथे असलेल्या बहिणीला भेटायला गेला होता. बरेच दिवस झाल्याने त्यानुसार अमळनेर- इंदोर बसने सकाळी येतो; असे…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.रामदास कदम यांनी शिवसेनेबद्दल आपली नाराजी पत्रात दाखवली आहे. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज शिवसेनेला रामराम केला आहे. कदम यांनी एक पत्र लिहून आपण नेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली. शिवसेना नेत्यांना विश्वासात घेऊन काम…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, ४ स्त्रिया व एका बालकाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी जळगाव व जळगाव जिल्हा प्रशासन हे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अपघातस्थळी मदत व बचाव कार्य सुरू आहे. एसटी महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार 1.चेतन चे वडील राम गोपाल जांगिड़ निवासी नांगल कला गोविंदगढ़ जयपुर राजस्थान,2.जगन्नाथ यांचे वडील हेमराज जोशी उम्र 70 वर्ष निवासी मल्हारगढ़ उदयपुर राजस्थान,3.प्रकाश यांचे वडील श्रवण चौधरी वय 40 वर्षे निवासी शारदा कॉलोनी अमलनेर जलगांव महाराष्ट्र,4.नीबाजी यांचे वडील आनंदा पाटिल उम्र 60 साल निवासी पीलोदा अमलनेरगां,5. कमला भाई पति…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर डेपोची बस इंदूरहून अमळनेर कडे येत असतांना नर्मदा नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ४० प्रवासी असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत इंदूरकडून अमळनेरकडे येणारी बस क्रमांक (एमएच ४० एन ९८४८) ही नदीपात्रात रात्री कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, एस.टी. खात्याचे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी या अपघाताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जितेंद्र रवींद्र सरोदे यांची महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध शासकीय विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणेकामी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सेवा, मार्गदर्शन, सहकार्याची भावना आणि महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क जितेंद्र सरोदे यांचा आहे. त्यांच्या या कार्यात अधिक भर पडावी याकरिता आपल्या कार्याची दखल घेत आमच्या महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शेतकरी संघटनेला मजबूत करण्यासाठी संघटनेच्या ध्येय, धोरणे व विचार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गापर्यंत पोहचवून…
प्रविण पाटील प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची चेअरमन जाहीर करण्यात आली. सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोधत निवड करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील जळके येथील दुध उत्पादक सहकारी सोसायटीची कार्यकारिणी रविवारी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सोसायटीच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रशांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्रल्हाद मोतिराम पाटील, नेमिचंद ताराचंद जैन, काशिनाथ दशरथ पाटील, रमेश जगन्नाथ पाटील, धनराज वसंत पाटील, तुकाराम भगवान पाटील, गंगाधर आनंदा पाटील, अजित मोतिलाल पाटील, सुभाष ओंकार पाटील, शिवाजी काशिराम पाटील, भिमराव शामराव बोरसे,भिकन रामु चिमणकारे , ज्ञानेश्वर सिताराम पटवळे तसेच नवनियुक्त चेअरमन प्रशांत आशोक…
धरणगाव प्रतिनिधी । समाजकारणाचे ध्येय घेऊन शिवसेनेची वाटचाल सुरू असून यात सर्वसामान्य शिवसैनिकांना न्याय मिळाला आहे. आपल्याला पक्षाने खूप दिले असून आता पक्षाला देण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचे भगवा फडकावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. धरणगाव येथे शिवसेना बैठकीत ते बोलत होते. शिंपी समाज मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजनधरणगाव येथील शिंपी समाज मंगल कार्यालयात शिवसेनेची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारने मागील कालखंडात विविध शेतकऱ्यांचा योजना व पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र चे संवेदनशील माजी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.…
शपथविधी कुठे आणि कसा होणार, मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री ठरवणार ! लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून दोन आठवडे उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं विरोधक टीका करू लागले आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिंडळाचा विस्ताराकडे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेगानं हालचाली सुरू झाल्या असून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार येऊन 15 दिवस झाले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. येत्या 20 किंवा 21 जुलै रोजी मुंबईत मंत्रिमंडळात शपथ होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. पण, काही मंत्र्यांना…
धरणगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी शिवसेना पदाचा राजीनामा देण्याची सुरुवात झाली आहे. राजीनामे देऊन समर्थकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे आम्ही माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील यांचा खंदे समर्थक असून गुलाबभाऊंनी आमच्या गावासाठी मागितली ती विकासकामे व मदत केलेली आहे. आमच्या सर्व सुखदुःखात माजी मंत्री आ. गुलाबरावजी पाटील, त्यांचे चिरंजीव जिप सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे सदैव हजर असतात. त्यामुळे आम्ही राजीनामा देत आहे सर्वांनी सांगितले
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं आहे. शिंदे फडणवीस हे सरकार आल्यानंतर आता शिंदे गटाच्या बंडाच्या काळातील नवीन कहाणी समोर आली. शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून ऑफर दिली. ठाकरे सरकारच्या गौप्यस्फोट करण्यात आला आहे. एकनाथ शिंदेसह 26 आमदार सुरतला गेले नंतर उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या फडणवीस यांना संपर्क साधून डील करण्याचाही प्रयत्न केला होता.उद्धव ठाकरे यांनी फडवीसांना फोन केला होता आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा, शिंदे यांना बाजूला ठेवा,…

